
पिठांचा व्यवसाय
मित्रांनो, निरनिराळ्या धान्यांची पिठे विकण्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने मला तुम्हाला व्यवसायाचे एक सूत्र सांगायचे आहे. ते सूत्र असे आहे. “जी वस्तू तयार करणे सोपे असते ती वस्तू विकणे अवघड असते. आणि जी वस्तू तयार करणे अवघड असते ती वस्तू विकणे सोपे असते”. या सूत्राचा अर्थ उलगडून सांगतो. जी वस्तू तयार करणे सोपे असते ती वस्तू अनेक लोक तयार करायला लागतात आणि अनेकांनी उत्पादन सुरू केले की बाजारात तिचा सुळसुळाट होतो. तो एवढा होतो की या वस्तूच्या विक्रीत स्पर्धा वाढते आणि ती विकणे अवघड होऊन बसते. उदाहरणार्थ, लोणची, मसाले, पापड हे तयार करणे काही फार अवघड नसते. त्यामुळे बाजारात अनेक प्रकारचे मसाले आलेले आपण पहात असतो. मग त्यांची विक्री करणे अवघड होते. याउलट खूप कलाकुसर करून तयार होणार्या काही वस्तू असतात. त्या तयार करणारे कारागीर कमीच असतात. त्यामुळे त्यांचे उत्पादन अवघड असते आणि अशा वस्तू तयार करणारे काही मोजकेच लोक बाजारात असतात. त्यामुळे त्या तयार करणार्या लोकांना विकण्यासाठी काही करावे लागत नाही. त्यांच्याकडे ग्राहक आपणहून …