person writing on white paper

डिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे

तुम्ही कधी Zomato वरून तुमच्या आवडीचे पदार्थ मागवले आहेत का? हो, अनेकदा.. तुम्ही कधी Uber किंवा Ola च्या माध्यमातून कॅब बुक करून प्रवास केला आहे का? हो, हे तर आम्ही नेहमीच करतो. ऑफिसमध्ये बसून सुद्धा तुम्ही कधी BookMyShow द्वारे सिनेमाची तिकिटे बुक करून त्या सिनेमाचा आनंद लुटला आहे का? हो, हे तर शुक्रवारच आमच ऑफिस मधील पहिल काम असत… तर मग अभिनंदन… तुम्ही डिजिटल युगात जगत आहात जिथे बरीच कामे ही चुटकीसरशी साध्य होतात. पण या सर्व गोष्टी आज आपल्याला एवढ्या सहज उपलब्ध का झाल्या आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर याला दोन प्रमुख कारणे आहेत आणि ती म्हणजे इंटरनेटचा वाढता प्रसार आणि डिजिटल मार्केटिंगचा योग्य वापर. यातील इंटरनेट आणि मोबाईल तर आता माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांनंतच्या तयार झालेल्या आधुनिक गरजा होऊन बसल्या आहेत, मग ती व्यक्ती शहरातील असो किंवा गावातील, विश्वास बसत नसेल तर हे पटवून देणारी ही आकडेवारी पहा:

डिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे
डिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे 3

(Source: https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/for-the-first-time-india-has-more-rural-net-users-than-urban/articleshow/75566025.cms)

म्हणजेच आज भारताची अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ही विविध डिजिटल माध्यमांवर सक्रिय आहे आणि यातून डिजिटल मार्केटिंगला असलेले महत्व नक्कीच अधोरेखित होते. कमी किंमतीत उपलब्ध असलेले स्मार्टफोन आणि त्याच्या जोडीला मिळणारी जलद इंटरनेट सुविधा यामुळे डिजिटल माध्यमे वापरणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. कोणी गेम खेळण्यासाठी, कोणी शॉपिंग करण्यासाठी, कोणी मनोरंजनासाठी तर कोणी आर्थिक व्यवहारांसाठी विविध डिजिटल माध्यमांचा आपल्या मोबाईलद्वारे उपयोग करत आहेत.

डिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे
डिजिटल मार्केटिंगचे महत्वाचे १३ फायदे 4

(Source: https://www.xakbox.com/growth-of-digital-marketing-in-india-2019/)

ही एवढी सगळी माहिती आणि आकडेवारी सांगायचे तात्पर्य एकच – जर तुम्ही व्यावसायिक बनून ऑनलाईन माध्यमातून पैसे कमवायचा विचार करत असाल तर डिजिटल मार्केटिंगशिवाय हे कदापि शक्य होणार नाही. तुम्ही व्यवसाय ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा – डिजिटल मार्केटिंग ही काळजी गरज आहे याची पक्की खूणगाठ तुम्हाला बांधून ठेवावी लागेल आणि त्यासाठीच डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे, आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि डिजिटल संधींची अनेक दारे तुमच्यासाठी खुली करून घ्या. पण तत्पूर्वी डिजिटल मार्केटिंगचे हे महत्वाचे फायदे समजून घ्या:

 • स्थानिक ते जागतिक पातळीवर (Local to Global) तुमची उत्पादने प्रदर्शित करण्याचा सोपा मार्ग 
 • पारंपरिक साधनांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चिक
 • पारंपरिक मार्केटिंगच्या तुलनेत उत्तम आणि खात्रीशीर ROI
 • तुमचे उत्पादन ज्या ग्राहक वर्गाला लागू होते (महिला, पुरुष, युवक, वृद्ध ई.) त्यांनाच ते दाखविण्याचे पर्याय उपलब्ध
 • ऑनलाईन जगात व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्केटिंग पर्यायांची उपलब्धता
 • तुमच्या स्पर्धकांबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिक वर उपलब्ध
 • केलेल्या जाहिरातीचे मोजमाप करणे अत्यंत सोपे – सहज समजेल अशी आकडेवारी तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळोवेळी मिळविता येते
 • प्रत्यक्ष चालू वेळेत जाहिरातीचा प्रभाव समजणे सोपे
 • ग्राहकांना लगेच प्रतिसाद देणे अत्यंत सोपे
 • हवी तशी जाहिरात बनविणे किंवा त्यात बदल करणे यासाठी अनेक सोपे टूल्स उपलब्ध
 • तुमच्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यावसायिकांशी थेट स्पर्धा करण्याची संधी

काय मग, येतंय ना लक्षात डिजिटल मार्केटिंगचे महत्व. आम्ही या लेखात अगदी सोप्या भाषेत म्हणजे तांत्रिक गोष्टींचे कोणतेही ज्ञान नसलेल्या व्यक्तीला सुद्धा समजेल अशा पद्धतीने डिजिटल मार्केटिंग या संकल्पनेची महत्वाची माहिती दिली आहे. छोटे-मोठे व्यावसायिक, ऑनलाईन नवउद्योजक आणि अगदी डिजिटल मार्केटिंग शिकू पाहणारे विद्यार्थी या सर्वांसाठी हा लेख नक्कीच उपयुक्त असाच आहे.

चला तर मग ‘डिजिटल मार्केटिंग’ या विषयाची सविस्तर माहिती समजून घेऊ:

 अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा..

माहिती शेअर करा

आधुनिक शेती,घरबसल्या करता येणारे डिजिटल व्यवसाय,तसेच व्यापार आणि अर्थकारण विषयांची बरीच माहिती वाचण्यासाठी आजच वार्षिक सभासद बना फक्त १० रुपये प्रति महिना

आपल्या माहितीसाठी
सतत विचारले जाणारे प्रश्न

आपली सदस्यता हि ३६५ दिवस म्हणजे १ वर्षासाठी असेल

आपण आम्हाला info@miatmanirbhar.com या पत्यावर ई-मेल करू शकतात. तसेच आम्हाला 7385571649 या नंबर वर फोन करू शकतात

आपण क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, ७०+ बँकांचे नेट बँकिंग तसेच गूगल पे,पेटीम,फोन पे अशा विविध पद्धतीने पैसे भरू शकतात.

आम्ही दिवसेन दिवस जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. तरीही आपल्याला काही विशिष्ट माहिती पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क करा

closeup photo of silver iMac
error: Alert: Content is protected !!