ड्रॉपशिपिंग – अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय

आजच्या या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य हवे आहे, त्यासाठी कोणी सरकारी नोकरीला प्राधान्य देत आहे तर कोणी उच्च पगाराच्या खाजगी नोकरीला प्राधान्य देत आहे आणि ज्यांना नोकरीमध्ये स्वारस्य नाही ते व्यावसायिक बनू पाहत आहेत. प्रत्येकजण जमेल त्या मार्गाने पैसे कमवीत आहे पण वाढत्या महागाईमुळे आज प्रत्येकाला एका अतिरिक्त कमाईच्या मार्गाचीही गरज भासू लागली आहे आणि यातील सर्वात खात्रीशीर आणि सोपा मार्ग म्हणजे ऑनलाईन व्यवसाय. तुमची नोकरी किंवा सुरु असलेला व्यवसाय सांभाळून जर तुम्हाला अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळाली तर? उत्तमच ना. बाजारात कोणत्या वस्तूंना चांगली मागणी आहे हे तुम्ही हेरू शकता का? हो नक्कीच. मग या ऑनलाईनच्या दुनियेतील एक अजब आणि जबरदस्त व्यवसाय संकल्पना म्हणजे ड्रॉपशिपिंग. हे नाव कधी ऐकलाय का ? नाही ना.. मग हा लेख नीट वाचा कारण यामुळे तुमच्यासाठी एका नवीन संधीच दार नक्कीच उघडल जाईल जे तुम्हाला खात्रिशीर कमाई सोबतच स्वावलंबी होण्यासही मदत करेल.          

पूर्वी खरेदी-विक्री ही प्रत्यक्ष दुकानात जाऊनच करावी लागत असे परंतु आज तंत्रज्ञानातील अफाट बदलांमुळे आपण घर बसल्या हव्या त्या वस्तू खरेदी करू शकतो आणि तेही अगदी आकर्षक किमतींमध्ये. विश्वास बसत नाही – तर ही पहा ऑनलाईन खरेदी-विक्रीची जगभरातील आकडेवारी.

ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय 11

ऑनलाईन खरेदी -विक्रीच्या व्यवसायाने मागील ५ वर्षात खूप मोठी मजल मारली आहे आणि येणाऱ्या काळात जगातील ४०% व्यवसाय हे फक्त ऑनलाईनच्याच माध्यमातून केले जातील असेल भाकीत या क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे. म्हणजे आज जर तुम्ही या क्षेत्रात पाऊल टाकले आणि यातील बारकावे व्यवस्थितरित्या समजावून घेतले तर तुम्हीही इतर लोकांप्रमाणे फक्त ड्रॉपशिपिंगच्या व्यवसायातून महिना लाखो रुपये नक्कीच कमावू शकाल. काय? महिना लाखो रुपये? हो हे म्हणतोय असे नाही तर या लोकांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलाय:

  • राहुल पाटील या तरुणाने ड्रॉपशिपिंगच्या माध्यमातून ३ ऑनलाईन स्टोअर्स चालू केली आहेत आणि त्याद्वारे तो महिन्याला $२००० पेक्षा अधिक नियमित कमाई करीत आहे.
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय 12
  • फिनलँडचा रहिवासी असणाऱ्या अहमद हादी या कॉलेज शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणाने लॉकडाऊनच्या काळातसुद्धा भन्नाट सोशल मीडिया मार्केटिंग करून ड्रॉपशिपिंगद्वारे फक्त दीड महिन्यात आपला संपूर्ण शैक्षणिक खर्च वसूल केला आणि आता नोकरी लागायच्या आधीच त्याच्याकडे एक उत्तम व्यवसाय आणि कमाईचे साधन तयार झाले आहे.
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय 13
  • शिल्पी यादव नावाची तरुणी ‘खरा कापस’ या तिच्या ड्रॉपशिपिंग स्टोअरद्वारे फॅशन आणि डिजाईन संबंधित विविध उत्पादने विकून $४५००० पेक्षा जास्त उलाढाल करत आहे.
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय 14

ही तर फक्त प्रातिनिधिक उदाहरणे झाली पण या उद्योजकांसारखेच आज जगभरातून अनेक तरुण-तरुणी, विवाहित पुरुष व महिला आणि अगदी ज्येष्ठ नागरिकसुद्धा ड्रॉपशिपिंगच्या माध्यमातून उत्तम अर्थार्जन करून आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत. तुम्हालाही आर्थिक सुबत्ता उपभोगायची आहे का? पैश्याअभावी अपुरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करायची आहेत का? तर मग आजच या व्यवसायाबद्दल सखोल माहिती मिळवा आणि कामाला लागा कारण कोणी तरी म्हणाले आहे – ‘उद्योगाचे घरी, रिद्धी–सिद्धी पाणी भरी’, म्हणजेच जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. पण कुठे मिळेल याची सविस्तर माहिती? इथेच..या संपूर्ण लेखात.. हा लेख तुम्हाला ड्रॉपशिपिंग म्हणजे काय? ड्रॉपशिपिंगचे फायदे व तोटे, ड्रॉपशिपिंगद्वारे कोणत्या वस्तू विकता येऊ शकतात? ड्रॉपशिपिंग कसे करावे? ड्रॉपशिपिंगसाठी खात्रीशीर उत्पादन पुरवठादार कसे ओळखावे? ड्रॉपशिपिंगसाठी लागणारी गुंतवणूक, ड्रॉपशिपिंगद्वारे किती पैसे कमविता येऊ शकतात? या सगळ्याची अगदी सविस्तर माहिती देईल. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ड्रॉपशिपिंगच का करावे? तर हे आहेत ड्रॉपशिपिंगचे काही महत्वाचे फायदे:

  • कोणत्याही प्रकारच्या मोठ्या गुंतवणुकीची जोखीम नाही
  • व्यवसाय सुरुवात करण्यास अगदी सहज आणि सुलभ 
  • उत्पादने साठवणुकीसाठी जागेची गरज नाही 
  • एकाच वेळेस अनेक उत्पादने विकण्याची संधी 
  • उत्पादने वितरित करण्याची जबाबदारी नाही
  • जगभरात कुठेही तुमची उत्पादने विकू शकता – कोणत्याही परवानगीची गरज नाही
  • खात्रिशीर आणि कायदेशीर कमाईचा उत्तम मार्ग 

काय मग.. आहात ना तयार या नवीन वाटेवर यशाची चव चाखण्यासाठी. काळजी करू नका कारण केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आहोतच. ई -कॉमर्स व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अश्याच प्रकारच्या अनेक व्यवसायांचे सविस्तर लेख आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. या उपयुक्त खजिन्यासाठी आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि अश्याच नवनवीन उद्योगधंद्याची संपूर्ण माहिती मिळवा.

चला तर मग जाणून घेऊयात या ड्रॉपशिपिंग व्यवसायाचे बारकावे.
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय

Table of Content:

  • ड्रॉपशिपिंग म्हणजे काय? 
  • ड्रॉपशिपिंगचे फायदे व तोटे
  • ड्रॉपशिपिंगद्वारे कोणत्या वस्तू विकता येऊ शकतात? 
  • ड्रॉपशिपिंग कसे करावे? 
  • ड्रॉपशिपिंगसाठी खात्रीशीर उत्पादन पुरवठादार कसे ओळखावे? 
  • ड्रॉपशिपिंगसाठी लागणारी गुंतवणूक
  • ड्रॉपशिपिंगद्वारे किती पैसे कमविता येऊ शकतात?
  • ड्रॉपशिपिंग म्हणजे काय? 

ड्रॉपशिपिंग हे रिटेल व्यवसायाचे एक नवीन ऑनलाईन स्वरूप आहे ज्यामध्ये ड्रॉपशिपर स्वतः कोणत्याही उत्पादनाची साठवणूक आणि निर्मिती न करताही आपल्या ग्राहकांच्या मागण्या थेट उत्पादन पुरवठाद्वारे पूर्ण करतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ड्रॉपशिपिंग म्हणजे तुमच्याकडे आलेल्या विविध उत्पादनांच्या मागण्या या तुम्ही ज्या उत्पादन पुरवठादारासोबत जोडलेले असाल त्याच्याकडे ड्रॉप करता आणि मग तो ती उत्पादने तुमच्यातर्फे त्या ग्राहकांना थेट घरपोच वितरित (शिप) करतो. अजूनही समजले नाही.. तर या चित्राद्वारे ड्रॉपशिपिंगची कार्यपद्धत अजून सोप्या पद्धतीने समजून घेऊ:

ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय 15

आता नक्कीच तुम्हाला समजले असेल ड्रॉपशिपिंग म्हणजे काय आहे ते. मग आता जाणून घेऊयात या भन्नाट व्यवसाय प्रकारचे तसेच भन्नाट फायदे.       

  • ड्रॉपशिपिंगचे फायदे व तोटे :

नवउद्योजकांसाठी ड्रॉपशिपिंग हे अतिशय फायद्याचे आहे कारण याद्वारे विक्री करण्यापूर्वीच विविध उत्पादनांना कश्या प्रकारची मागणी आहे हे तुम्ही पडताळून पाहू शकता आणि मग या अनुभवातून तुम्ही स्वतःच्या नानाविध युक्त्या वापरून ग्राहकांना तुमच्या उत्पादनांकडे आकर्षित करू शकता. 

ड्रॉपशिपिंगचे काही महत्वाचे फायदे हे खालीलप्रमाणे:

  • अत्यंत कमी गुंतवणूक:

ज्याप्रकारे कोणत्याही रिटेल व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या भांडवलाची किंवा गुंतवणुकीची गरज लागते अगदी त्याच्या विरुद्ध ड्रॉपशिपिंग व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी गुंतवणूक करावी लागते आणि हाच याचा सगळ्यात मोठा फायदा आहे कारण अनेक नवउद्योजक सुरुवातीची गुंतवणूक रक्कम जमा न करता आल्यामुळे आपले उद्योजक होण्याचे स्वप्न गुंडाळून नाईलाजाने नोकरीचाच मार्ग स्वीकारतात. पण या व्यवसायात ना तुम्हाला कुठले मोठे गोडाऊन घ्यायचे आहे ना की कुठल्या उत्पादनाचा निर्मिती खर्च करायचा आहे ना ऑर्डर वितरित करण्याची जबाबदारी स्वीकारायची आहे.

  • सुरुवात करण्यासाठी अतिशय सोपे:

कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष उत्पादनांची निर्मिती आणि त्याची साठवणूक करायची नसल्यामुळे ड्रॉपशिपिंग सारखा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करणे हे खूपच सहज आणि सोपे आहे. तुमच्या डोक्यावर खालीलपैकी कोणत्याही बाबींचे ओझे नसेल:

  • गोडाऊनचे भाडे किंवा त्याची खरेदी आणि इतर देखभाल खर्च 
  • हिशोब व ताळेबंदीसाठी वेळोवेळी ठेवावी लागणारी उत्पादनांची यादी
  • उत्पादनांचे पॅकिंग व त्यांचे वितरण 
  • रिटर्न आलेल्या वस्तूंची व्यवस्था व हाताळणी 
  • मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादनांचा स्टॉक करून ठेवणे
  • कमीत कमी खर्च – जास्तीत जास्त नफा: 

ड्रॉपशिपिंग या व्यवसायासाठी कोणत्याही दुकानाची किंवा गोडाऊनची गरज नाही कारण हे तुमचे ऑनलाईन स्टोअर असून यासाठी तुम्हाला फक्त संगणक / लॅपटॉप, इंटरनेट आणि व्यवसाय चातुर्य यावरच खर्च करावा लागणार आहे. अनेक यशस्वी ड्रॉपशिपर तर घरबसल्या आपला हा व्यवसाय चालवीत असून त्याद्वारे मोठी बचत तर करत आहेतच शिवाय या बचतीचा योग्य वापर करून आपला व्यवसायही वृद्धिंगत करत आहेत.

  • जागेचे बंधन नाही: 

हा व्यवसाय तुम्ही जगात कुठेही बसून करू शकता अगदी पुण्यातील तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये बसूनसुद्धा तुम्ही अमेरिकेतील तुमच्या एखाद्या ग्राहकाची तुमच्या उत्पादनासाठी आलेली मागणीही पूर्ण करू शकता. जोपर्यंत तुमच्याकडे जलद इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे आणि तुम्ही पुरवठादारांच्या तसेच ग्राहकांच्या उत्तमरीत्या संपर्कात आहात तोपर्यंत तुमचा ड्रॉपशिपिंगचा व्यवसाय अविरत चालू राहील अगदी तुम्ही झोपलेला असेल तेव्हा सुद्धा.

ई-स्टोअर

ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ?

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

  • अगणित उत्पादनांची उपलब्धता: 

ड्रॉपशिपिंग मध्ये तुम्हाला कोणतेही उत्पादन नव्याने तयार करायचे नसून तुमच्या पुरवठादारांकडे उपलब्ध असलेली विविध उत्पादनेच तुम्हाला तुमच्या ऑनलाईन स्टोअरच्या माध्यमातून ग्राहकांना दाखवायची आहेत. एकाच वेळेस तुम्ही अनेक पुरवठादारांसोबत चांगले हितसंबंध प्रस्थापित करून बाजारात मागणी असलेली  अनेक उत्पादने तुमच्या ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकता.

  • उत्पादनांच्या मागणीची पडताळणी करणे अगदी सोपे:

ड्रॉपशिपिंग व्यवसाय सुरु करण्यापूर्वी ग्राहकांचा विविध उत्पादनांप्रती असलेला कल ओळखणे ही गरज असून यामुळेच तुम्हाला आपल्या स्टोअरमध्ये कोणत्या उत्पादनांना प्राधान्य द्यायचे आहे हे निश्चितच कळेल. विविध पुरवठादारांकडून तुम्ही स्वतः उत्पादने उपलब्ध करून देऊन तुमच्या संभाव्य ग्राहकांच्या मागणीची पडताळणी करू शकता आणि यासाठी अनेक पुरवठादार हे सुरुवातीचे काही प्रॉडक्ट्स मोफत उपलब्ध करून देतात. याद्वारे पुरवठादारांनासुद्धा येणाऱ्या काळात कोणती उत्पादने निर्माण करावी लागू शकतात याची कल्पना येते.

  • व्यवसाय वाढविणे सोपे:

तुमचे काम हे फक्त ग्राहकांची ऑर्डर तुमच्या पुरवठादारापर्यंत पोहचविणे इथेपर्यंतच मर्यादित असल्याने मार्केटिंगच्या विविध क्लुप्त्या वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी अधिक मेहनत घेऊ शकता. ग्राहकाला प्रॉडक्ट घरपोच वितरित करण्याचे काम हे पुरवठादाराचे असल्याने तुमचा वाचणारा बराच वेळ तुम्ही व्यवसाय वाढीच्या तुमच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वापरू शकता.

कसे वाटले फायदे.. जबरदस्त ना.. अहो हा व्यवसाय प्रकारच भारी आहे म्हणून तर आम्ही याची शिफारस तुम्हाला करत आहोत. पण नाण्याला जश्या दोन बाजू असतात तसेच जिथे फायदा आला तिथे तोटा हा येणारच. पण घाबरू नका या व्यवसायातील तोटे तुमचे कोणतेही नुकसान करणारे नसून ते आम्ही फक्त तुम्हाला व्यवसाय सुरु करताना कोणती काळजी घ्यावी लागेल यासाठी दर्शवित आहोत. 

ड्रॉपशिपिंग व्यवसायाचे काही न टाळता येण्यासारखे तोटे:

  • अतिशय कमी खर्चात हा व्यवसाय सुरु करता येत असल्याने जगभर अनेक लोक यात नव्याने उतरत आहेत, त्यामुळे यातील स्पर्धा ही वाढली आहे आणि पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी अनेक जण अगदी नगण्य किमतीत सुद्धा उत्पादने विकत असून यामुळे इतर ड्रॉपशिपरला सुद्धा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी नफा ठेवून आपले प्रॉडक्ट्स विकावे लागतात.
  • तुमच्या पुरवठादाराची उपलब्ध उत्पादनांची यादी अद्ययावत नसेल आणि तीच उत्पादने तुम्ही उपलब्ध आहेत असे जर ग्राहकांना सांगत असाल तर त्या उत्पादनांचे वितरण होण्यास नक्कीच उशीर होतो म्हणून तुम्ही या व्यवसायात पुरवठादाराच्या कार्यपद्धतीवर अवलंबून राहता.
  • प्रत्येक पुरवठादाराचे वितरण शुल्क हे वेगळे असल्याने एकाच प्रकारच्या उत्पादनांसाठी तुमच्या ग्राहकाला वेगवेगळे वितरण शुल्क द्यावे लागते यातून कधीकधी विश्वासाहर्तेबरोबरच अंतिम शुल्क आकारणीत गुंतागुंत निर्माण होते. 
  • तुमच्या पुरवठादाराकडून उत्पादनांची निर्मिती अथवा वितरणामध्ये काही चूक झाल्यास याचा फटका तुमच्या या व्यवसायातील प्रतिमेला बसू शकतो. 
  • तुम्ही स्वतः उत्पादनाची निर्मिती करणार नसल्याने तुमचा पुरवठादार देईल तसेच प्रॉडक्ट्स तुम्हाला विकावे लागतात म्हणजेच प्रिंट-ऑन-डिमांड व्यवसायात ज्याप्रकारे तुम्ही ग्राहकांच्या आवडीचे प्रॉडक्ट्स त्यांच्या सोयीनुसार बनवून देता तसे इथे करू शकणार नाहीत.  

चला फायदे-तोटे तर झाले, पण ड्रॉपशिपिंग मध्ये नक्की काय विकावे हे ज्याला कळेल त्याची नौका किनाऱ्यापलीकडे गेलीच म्हणून समजा. या ऑनलाईन व्यवसायात आपण काय विकू शकतो ते समजून घेऊ.

  • ड्रॉपशिपिंगद्वारे कोणत्या वस्तू विकता येऊ शकतात?

ज्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात त्याप्रमाणेच ग्राहक तशी मागणी, म्हणजेच प्रत्येक ग्राहकाची प्रॉडक्टची आवड आणि निवड ही वेगवेगळी असते. ड्रॉपशिपिंगमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या उत्पादनांना चांगली मागणी असते – १. कमी किमतीची आणि आकर्षक उत्पादने २.बाजारात शोधूनही न मिळणारी उत्पादने आणि ३. दैनंदिनी गरजांसाठी लागणारी उत्पादने. या व्यवसायात तुम्ही काय विकले पाहिजे यावर कोणतीही बंधने नाहीत अगदी पाळीव कुत्र्याच्या पट्ट्यापासून ते बहुउपयोगी विजेच्या उपकरणापर्यंत तुम्ही काहीही विकू शकता. नवउद्योजकांनी जे प्रॉडक्ट्स मागणीमध्ये आहेत किंवा ज्यांची चांगली चलती आहे त्यांची प्राधान्याने निवड करावी.

वर्षांगणिक ड्रॉपशिपिंगचा ट्रेंड कसा बदलत गेला ते पहा:

ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय 16

म्हणजेच जसजसे लोकांना कळत गेले की ड्रॉपशिपिंगच्या माध्यमातून त्यांच्या अनेक गरजा पूर्ण होत आहेत तसतसे त्यांच्या उत्पादनांच्या मागणीचा कल हा बदलत जात आहे. उद्योजकांना अश्या आकडेवारीचा किंवा माहितीचा निश्चितच फायदा होतो आणि त्यानुसार ते आपले स्टोअर अद्ययावत करू शकतात.

ड्रॉपशिपिंगद्वारे तुम्ही कोणती उत्पादने विकू शकता हे आपण श्रेणींनुसार पाहू. आपण आधी २०२० या वर्षात सर्वात जास्त मागणी असलेल्या श्रेणी पाहू आणि मग त्यानंतर अश्या श्रेणी पाहू ज्यांना कायमच चांगली मागणी असते.

  • तंत्रज्ञान श्रेणी:

दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचे अविष्कार आपण अनुभवत आहोत आणि हे शक्य झाले आहे ते विज्ञानातील अफाट बदलांमुळे. अनेक कुशल लोक आपल्या सर्वांचे भविष्य अजून जलद व सुखकर व्हावे म्हणून अहोरात्र झटत आहेत आणि त्यामुळेच नवनवीन उत्पादने रोज बाजारात येत आहेत. या श्रेणीमधील विविध उत्पादनांना अगदी किशोरवयीन तरुणांपासून ते प्रसिद्ध उद्योजकांकडून उच्च मागणी आहे. या श्रेणीमध्ये विविध प्रकारची उत्पादने सहज विकली जातात, त्यातीलच ही काही उदाहरणे पहा:

  • वाय-फाय उत्पादने (राउटर, कार्ड अडाप्टर, वायफाय अँटेना)
  • वायरलेस उत्पादने (ब्लुटूथ हेडफोन, ब्लुटूथ इअरफोन, इयरबड्स)
  • वेअरलेबल्स आणि ऍक्सेसरीज (फिटबँड, स्मार्टवॉच, ट्रॅकर्स)
  • ३६० डिग्री कॅमेरा आणि ऍक्सेसरीज (वेबकॅम, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट कॅमेरा)
  • व्ही आर उत्पादने
  • संगणक, लॅपटॉप आणि त्यांच्या ऍक्सेसरीज
  • स्मार्टफोन आणि त्याच्या ऍक्सेसरीज

ही श्रेणी अफाट असून यात असलेल्या प्रत्येक उत्पादनाचा ग्राहकवर्ग हा याच प्रकारातील इतर अद्ययावत उत्पादनांच्या नेहमी शोधात असतो आणि सध्याच्या घडीला या श्रेणीमध्येच अनेक ड्रॉपशिपर्स नव्याने उतरत आहेत. 

  • लाईफस्टाईल श्रेणी:

दैनंदिनी जीवनात आपण अनेक वस्तू व उपकरणे वापरतो आणि त्याचा आपल्या जीवनशैलीवर नकळत प्रभाव पडत असतो. अनेक नवनवीन उपकरणांमुळे तसेच आपल्या जीवनशैलीशी निगडित उत्पादनांमुळे आपले जीवन हे अतिशय सुकर आणि सुरक्षित झाले आहे. तरुणवर्ग, गृहिणी आणि अगदी वयोवृद्धसुद्धा या श्रेणीतील विविध उत्पादनांचा उपभोग घेत आहेत आणि म्हणूनच यातील अनेक उत्पादनांना अतिशय चांगली मागणी आहे. या श्रेणीमधील मागणी असलेली काही उत्पादने पहा:

  • स्मार्ट होम ची उत्पादने (स्वयंपाक घरातील अद्ययावत उपकरणे, स्पर्शविरहित उपकरणे, ऑटोमॅटिक होम कंट्रोल उपकरणे ईत्यादी)
  • भटकंतीसाठी किंवा साहसी पर्यटनासाठी लागणारे उत्पादने (ऍथलेटिक शूज, दोरखंड, फोल्डेबल तंबू, ऑल-इन-वन उपकरणे)
  • घरातील बाग-बगीच्यासाठी लागणारी उपकरणे (हँगिंग कुंड्या, छोटी खुरपे, इर्रीगेशनचे साहित्य)
  • वॉटर बॉटल्स

याशिवाय तुम्ही स्वतः वापरत असलेल्या किंवा तुम्हाला कोणत्या वस्तू व उपकरणे गरजेच्या वेळी हाताशी असाव्यात असे वाटते त्याही या श्रेणीत उत्तम व्यवसाय देऊ शकतात.

  • फॅशन श्रेणी:

आजच्या झगमगटाच्या दुनियेत प्रत्येकालाच कोणती न कोणती फॅशन स्टाईल आपल्यासाठीच बनली आहे असे वाटते आणि म्हणूनच ही श्रेणी कोणत्याही एका वयोगटासाठी मर्यादित नसून यातील लाखो उत्पादने ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी तर ठरतातच पण त्याही पेक्षा ते उत्तम नफाही मिळवून देतात. नोकरदार वर्ग, मालकवर्ग, गृहिणी, कॉलेज युवक-युवती, निवृत्त प्रौढ वर्ग आणि एवढेच काय तर शाळकरी मुलांचा वर्ग या प्रत्येकाची स्टाईलची व्याख्या ही वेगळी आणि त्यानुसारच त्यांची फॅशन उत्पादनांची मागणीही निरनिराळी आहे. या श्रेणीत उत्तमरीत्या व्यवसाय देणारी ही काही वेगळी उत्पादने पहा:

  • महिलांसाठी बनविलेल्या डिजायनर पर्स
  • पुरुषांची पाकिटे 
  • आकर्षक हेअर क्लिप्स व हेअर बँड्स
  • डिजाईन केलेले खास कपडे
  • पुरुष व महिलांसाठी शॉर्ट्स
  • जुन्या काळाशी सुसंगत कपडे 
  • ज्वेलरी उत्पादने

ही श्रेणी खूप अफाट असून यात लाखो पुरवठादार रोज नवनवीन युक्त्या वापरून ग्राहकांच्या पसंतीस पडतील अशी फॅशन संबंधित उत्पादने निर्माण करीत आहेत आणि त्यामुळेच तुमचे स्टोअर तुम्ही अश्या आकर्षक उत्पादनांनी कशा प्रकारे सजविता यावर तुमची व्यवसाय वाढ व समृद्धी अवलंबून असेल.

वरील श्रेणींमध्ये २०२० या वर्षातील सर्वात जास्त मागणी असलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. आता आपण वर्षभर चांगली मागणी असलेल्या विविध श्रेणी व त्यातील उत्पादने पाहू.

  • लहान मुलांचे कपडे, खेळणी व इतर ऍक्सेसरीज :

जिथे कुटुंब आले तिथे लहान मुले ही आलीच आणि प्रत्येक कुटुंबातील लहान मुले ही त्या कुटुंबाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. लहान मुलांसाठी लागणारे कपडे, त्यांची खेळणी तसेच त्यांचे संगोपन सोयीस्कर व सोप्या पद्धतीने करता यावे म्हणून पालकांना लागणारे इतर साहित्य याची खरेदी जगभर मोठया उत्साहात सुरु असते आणि त्यासाठी खर्च करायला लोक कचरत नाहीत म्हणूनच नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून ते ४ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांना वर्षभर उत्तम मागणी असते.

  • पाळीव प्राण्यांसाठी लागणारे साहित्य:

पाळीव प्राण्यांची आवड असणारा वर्ग जगभरात मोठया संख्येने वाढत आहे आणि हा वर्ग आपल्या प्राण्यांची अगदी आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेत असतो. याच गोष्टीला हेरून अनेक कारखानदारांनी अशी काही भन्नाट उत्पादने बनविली आहेत की जी या वर्गाला आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहेत. कुत्र्यांचे आकर्षक पट्टे, मांजराचे कपडे, त्यांच्या मनोरंजनासाठीची खेळणी, त्यांची छोटोशी घरे ही यातील काही हमखास मागणी असलेली उत्पादने आहेत.

  • महिलांचे कपडे:

महिला आणि त्यांचे कपडे यांचे एक अनोखे नाते आहे आणि त्याची शॉपिंग हे न उलगडणारे कोडे आहे. स्वस्त आणि स्टाईलिश कपड्यांची आरामात खरेदी करणे हे महिलांना प्रत्यक्ष दुकानात आव्हानात्मकच वाटते आणि म्हणूनच ऑनलाईन शॉपिंगमध्ये वरील सर्व फायदे मिळत असल्याने महिलावर्गाकडून अश्या उत्पादनांना प्रचंड मागणी आहे.

  • इको -फ्रेंडली उत्पादने:

जास्त काळ टिकणाऱ्या तसेच नैसर्गिक वस्तूंना लोक दैनंदिनी जीवनात प्राधान्य द्यायला लागले आहेत आणि म्हणूनच अश्या प्रकारच्या विघटनशील व पुनर्वापर करता येऊ शकणाऱ्या विविध उत्पादनांना जगभरातून चांगली मागणी येत आहे.   

वर नमूद केलेलीच उत्पादने तुम्ही विकली पाहिजेत असे काहीही नसून तुम्हाला ज्या श्रेणीमध्ये रस आहे आणि ज्याला बाजारात चांगली मागणी आहे किंवा मागणी येऊ शकते आणि जी पुरवठादारांकडून सहजरीत्या उपलब्ध होऊ शकतील अश्या उत्पादनांचा योग्य अभ्यास करून ती विकूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. 

आता तुम्ही म्हणाल ड्रॉपशिपिंग काय आहे, त्याचे फायदे-तोटे आणि त्याद्वारे विकता येणारी उत्पादने हे सगळं कळाल, पण प्रत्यक्षात ड्रॉपशिपिंग करतात कसे ? काळजी करू नका, यापुढील भागात आपण ते सविस्तर पाहू.

  • ड्रॉपशिपिंग कसे करावे? 

एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी जे काही लागेल ते सगळे आपल्या देशात उपलब्ध आहेच पण त्याचबरोबर भारतातच हा व्यवसाय का सुरु करावा यासाठी ही थक्क करणारी आकडेवारी पहा:

ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय 17

म्हणजेच भारतासारखी विविधतेत एकता जपणारी आणि वर्षभर तेजीत असणारी ऑनलाईन बाजारपेठ इतर कुठेही शोधूनही सापडणार नाही. ड्रॉपशिपिंग कसे करावे यावर एक सविस्तर लेख लिहला जाऊ शकतो कारण यातील प्रत्येक पायरी आणि त्यातील बारकावे हे समजावून घ्यावे लागतील. इथे आम्ही तुमच्या माहितीसाठी हा व्यवसाय सुरु करताना कोणकोणत्या पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतील ते क्रमाने देत आहोत:

  • सर्वप्रथम तुमचा व्यवसाय हा भारतीय व्यवसाय कायद्यांनुसार रजिस्टर करा यामुळे तुम्हाला टॅक्सचे फायदे, GSTIN नंबर व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे सोपे राहील.
  • ग्राहकांची मागणी, अमेझॉन-फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर चालणारी उत्पादने आणि पुरवठादारांचे जाळे याचा नीट अभ्यास करून तुम्ही कोणती उत्पादने उत्तमरीत्या विकू शकता याची एक यादी बनवा.
  • राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरवठादारांशी संपर्क करून तुम्ही विकू इच्छित असलेल्या प्रॉडक्टच्या किमती, वितरण पद्धती व रिटर्न पॉलिसी याबाबत सविस्तर चर्चा करून कायदेशीररित्या तुमचे पुरवठादार निश्चित करा.
  • तुमच्या नफ्याचे सूत्र ठरवून त्यानुसार तुमच्या उत्पादनांची विक्री किंमत निश्चित करा.
  • आता तुमचे ऑनलाईन स्टोअर अथवा ई-कॉमर्स वेबसाईट प्रस्थापित करा, यासाठी Shopify, Alidropship, Oberlo यासारख्या सहज आणि सोप्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करा. (अश्या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही काही तासात तुमचे ऑनलाईन स्टोअर चालू करून विक्रीही करू शकता)
  • आता तुमच्या उत्पादनांचे आकर्षक फोटो, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्याबद्दलची ग्राहकांना आकर्षित करेल अशी माहिती टाकून तुमचे ऑनलाईन स्टोअर अथवा वेबसाईट विक्रीजोगे तयार करा. 
  • सोशलमीडियाच्या माध्यमातून तुमच्या ड्रॉपशिपिंग उत्पादनांची समर्पक आणि आकर्षक जाहिरात करा त्याचबरोबर तुमच्या नातेवाइकांना आणि मित्रांनासुद्धा याची माहिती देऊन त्यांच्याही सोशल मीडिया प्रोफाइलवर तुमच्या उत्पादनांची शिफारस करण्याची विनंती करा. 

अश्याप्रकारे तुम्हाला काही दिवसात ऑर्डर्स आल्या की हे तुमचे आधुनिक स्टोअर तुम्ही भरलेल्या माहिती अनुषंगाने योग्य त्या पुरवठादाराला प्राप्त ऑर्डर देऊ करेल आणि मग तो पुरवठादार त्या प्रॉडक्टचे तुमच्या ग्राहकाला घरपोच वितरण करेल.

चला आता तर तुम्हाला ड्रॉपशिपिंग बद्दल बरीचशी महत्वाची माहिती मिळाली आहेच पण अनेक नवउद्योजकांसाठी खात्रीशीर पुरवठादार शोधणे ही एक जटिल समस्या बनते असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चला तर मग थोडक्यता पाहू खात्रीशीर पुरवठादार कसे शोधावे.

  • ड्रॉपशिपिंगसाठी खात्रीशीर उत्पादन पुरवठादार कसे शोधावे? 

पुरवठादार हा ड्रॉपशिपिंग व्यवसायातील अत्यंत महत्वाचा दुवा आहे कारण तो देणाऱ्या उत्पादनांवरच तुमचा व्यवसाय व शेवटी नफा अवलंबून आहे आणि म्हणूनच खात्रीशीर पुरवठादार शोधणे हे थोडे डोके लावून करायचे काम आहे कारण आजकाल फसवेगिरी करणाऱ्यांची कमी नाही. योग्य पुरवठादार शोधण्यासाठी खालील महत्वाच्या टिपा समजून घ्या:

  • तुम्ही जी उत्पादने विकू इच्छिता ती थेट प्रत्यक्ष मार्केटमध्ये किंवा मग ऑनलाईन माध्यमांद्वारे कोण पुरवीत आहेत याचा शोध घ्या. यासाठी तुम्ही Google तसेच विविध B2B डिरेक्टरी सारख्या प्लॅटफॉर्म्सचा (जसे की IndiaMart) योग्य वापर करू शकता.
  • तुम्हाला प्राप्त पुरवठादारांशी संपर्क करून त्यांच्याशी चांगले संबंध जोडा आणि तुम्हीही त्यांच्या उत्पादनांची विक्री करू इच्छित आहात हे त्यांना सांगा. 
  • जे पुरवठादार तुम्हाला योग्य आणि विश्वासू वाटतात त्यांच्याकडून काही सॅम्पल प्रॉडक्ट्स ऑर्डर करून त्यांच्या उत्पादनांचा दर्जा, त्यांची वितरण पद्धत, रिटर्न पॉलीसी आणि ग्राहक सेवा तपासून पहा.
  • Shopify, Oberlo किंवा Alidropship यासारखे खास ड्रॉपशिपिंगसाठीच बनविलेले प्लॅटफॉर्मस तुम्हाला त्यांच्याकडे पुरवठादार म्हणून नोंद असलेल्या खात्रीशीर मॅनुफॅक्चरर किंवा व्होलसेलर यांच्याशी थेट संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात.
  • कोणते पुरवठादार हे फसवे असू शकतात:
  • व्यवसाय करण्यासाठी किंवा त्यांची उत्पादने विकण्यासाठी मासिक किंवा वार्षिक मेम्बरशिपची अट ठेवणारे
  • सॅम्पल किंवा प्रे-ऑर्डर उत्पादनांसाठी बाजारमूल्यापेक्षा जास्त किंमत आकारणारे
  • कमीत कमी उत्पादनांच्या ऑर्डरची अट न घालता किरकोळ विक्री करणारे
  • खोटी संपर्क माहिती असलेले      

वरील गोष्टी व्यवस्थित समजून त्या वेळोवेळी अमलात आणल्यास खात्रीशीर पुरवठादार शोधणे तुमच्यासाठी नक्कीच सोपे होईल.

  • ड्रॉपशिपिंगसाठी लागणारी गुंतवणूक:

चला आता तुम्ही हा व्यवसाय कसा सुरु करून त्यात यश मिळविण्यासाठी काय काय करू शकता हे सगळे पाहिले पण त्याहीपेक्षा महत्वाची आणि सगळ्यांना ज्याची जास्त चिंता वाटते ती बाब म्हणजे यासाठी करावी लागणारी गुंतवणूक. पण काळजी करू नका, तुम्हाला करावी लागणारी गुंतवणूक ही इतर कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा कमीच असून त्याचे जलद परतावेही मिळतील. तुम्हाला खालील गोष्टींवर खर्च करावा लागेल:

  • व्यवसाय रजिस्टर करण्याचा खर्च (GSTIN नंबर सहित)
  • ई-स्टोअर किंवा ई-कॉमर्स वेबसाईटचा खर्च (डोमेन व होस्टिंग)
  • सॅम्पल प्रॉडक्ट्स किंवा प्री-ऑर्डरचा खर्च  
  • सोशल मीडिया मार्केटिंगचा खर्च

हे झाले खर्चाचे गणित, आता पाहू कमाईचे गणित…

  • ड्रॉपशिपिंगद्वारे किती पैसे कमविता येऊ शकतात ?

ड्रॉपशिपिंगद्वारे पैसे कमविण्यावर कोणतीही मर्यादा नाही, कोणी महिन्याला २० हजार कमवीत आहे तर कोणी २ लाख. तुम्ही निवडलेली उत्पादने, त्याला असलेली मागणी आणि तुमचे मार्केटिंग कौशल्य यावर तुमच्या कमाईचा आलेख अवलंबून असेल. उदाहरणासाठी खालील आकडेमोड पहा:

ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय 18

समजा एका पुरवठादाराकडून $२० किमतीचे उत्पादन तुमचा ३०% नफा पकडून $२६ या किमतीला एका महिन्यात ७० ग्राहकांना जरी विकले तरी तुम्ही महिन्याला $५०० पेक्षाही अधिक कमाई सहज करू शकाल. ही तर कमीत कमी आकडेवारी आहे विचार करा जर एका महिन्यात तुम्ही असे जास्तीत जास्त २५० प्रॉडक्ट जरी विकले तरी तुमची कमाई ही $१९०० म्हणजेच १,३०,००० रु. पेक्षाही अधिक असेल.

ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय
ड्रॉपशिपिंग - अत्यंत फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय 19

पण हे सगळे एका दिवसातही घडून येणार नाही यासाठी चिकाटी, अपार मेहनत, मार्केटचा योग्य अभ्यास, ग्राहकांची पसंती, उत्पादनांची योग्य निवड, पुरवठादारांशी असलेले संबंध आणि तुमची जिद्द या सगळ्यांची सांगड घालावी लागेल.

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेवटी काय तर…

ऑनलाईन उत्पादनांना जगभरातून होणारी मागणी ही दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ती वाढणारच आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक तगडे स्पर्धक बाजारात उपलब्ध आहेत आणि नव्याने सुद्धा उतरत आहेत. तुम्ही निवडलेले प्रॉडक्ट हे इतरांपेक्षा वेगळे आणि ग्राहकांना आवडतील असे तर पाहिजेच त्याचबरोबर मार्केटमध्ये काय चालू शकते याचा अंदाज तुम्हाला बांधता येणे गरजेचे आहे. ड्रॉपशिपिंग हा व्यवसाय अगदी कमी खर्चासहित तर सुरु करता येतोच पण या व्यवसायात यश आणि चांगला नफा मिळविण्यासाठी निदान सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी तुम्हाला नक्कीच द्यावा लागेल. या सर्वांच्या जोडीला ऑनलाईन मार्केटिंगच्या नवनवीन बाबी शिकून तुम्ही जास्तीत जास्त विक्री, समाधानकारक नफा आणि नवनवीन उत्पादनांसाठी वेगवेगळे स्टोअर्स ही प्रस्थापित करू शकता.   

शेअर करा

Leave a Comment

error: Alert: Content is protected !!