person holding leafed plant

हायड्रोपोनिक फार्मिंग साठी बिया अधिक योग्य का?

घरातल्या घरात, मातीशिवाय आणि हवामानासह संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात ठेवता येणारी हायड्रोपोनिक फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय आणि ती कशी काम करते याची माहिती करून घेतल्यानंतर काही जणांनी हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात केली असेल. काही जणांची कदाचित  पहिली ग्रो सिस्टम यशस्वी ही झाली असेल आणि आता त्यांना या सिस्टीमचा विस्तार वाढवायचा आहे त्यांनी हा लेख अवश्य वाचायला हवा. अर्थात हायड्रोपोनिक सिस्टीम उभी करताना संबंधितानी दीर्घ संशोधन, वाचन, रोपवाटिका, स्थानिक बाजार, बागकामासाठी आवश्यक साहित्याची विक्री करणारी दुकाने यांची माहिती मिळवूनच ही सिस्टीम उभारलेली असणार. हायड्रोपोनिक सिस्टीममध्ये तुम्ही लावलेल्या पहिल्या वनस्पतीची वाढ योग्य तऱ्हेने झाली की हे सारे कष्ट सार्थकी लागले असे नक्कीच म्हणता येईल. हे पाहिले रोप तुम्ही कदाचित रोपवाटिका किंवा तयार रोपे विकणाऱ्या दुकानदारांकडून खरेदी केलेले असेल आणि हायड्रोपोनिकची सुरवात करताना तयार रोप आणणे किंवा अंकुरलेली छोटी रोपे आणणे हा चांगला पर्याय आहे. पण दीर्घकाळ तुम्ही हायड्रोपोनिक फार्मिंग करण्याचा विचार करत असाल तर मात्र तुम्ही स्वतः बियांपासून रोपे तयार करणे अधिक व्यवहार्य …

हायड्रोपोनिक फार्मिंग साठी बिया अधिक योग्य का? .

आणखी वाचा
person holding white plastic spoon in black and silver steel cup

घरी मेणबत्ती बनविण्याचा फायदेशीर व्यवसाय

काही तरी नवीन उद्योग करायचा विचार आहे किंवा घरबसल्या काहीतरी व्यवसाय सुरु करावा असे वाटत असेल तर बाजारात चांगली मागणी असलेल्या मेणबत्या, ते ही घरच्या घरी आणि फार भांडवल न गुंतवता करण्याचा व्यवसाय तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता. मेणबत्त्या हे उत्पादन नेहमी मागणी असलेले व्यावहारिक उत्पादन म्हणता येतील. यात सुद्धा तुम्ही किती कौशल्य प्राप्त करू शकता आणि खास तुमचा ठसा असलेल्या विविध प्रकारच्या, आकर्षक मेणबत्त्या बनवू शकता त्यावर तुम्ही किती कमाई या व्यवसायातून करू शकाल याचे प्रमाण ठरणार आहे. अर्थात कमाईचे हे प्रमाण केवळ तुमच्या मेणबत्त्या आकर्षक आहेत म्हणून ठरणार नाही तर त्यांचे मार्केटिंग योग्य प्रकारे करणे हाही महत्वाचा भाग आहेच. आज बाजारात अक्षरशः शेकडो प्रकारच्या मेणबत्त्या उपलब्ध आहेत. पारंपारिक मेणबत्त्या आहेत त्याचप्रमाणे डेकोरेटीव्ह म्हणजे सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या, अरोमा थेरपी मध्ये वापरल्या जाणाऱ्या, गिफ्ट देण्यासाठीचे विविध प्रकार सुद्धा बाजारात चांगले खपत आहेत. ज्यांना मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे, ते यातील अनेक प्रकार सहज बनवू शकतात. नवशिके व्यावसायिक सुद्धा …

घरी मेणबत्ती बनविण्याचा फायदेशीर व्यवसाय .

आणखी वाचा
Members area

हायड्रोपोनिक यंत्रणेत वाढविता येणाऱ्या काही वनस्पती

हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये कोणत्या वनस्पती वाढविता येतात या प्रश्नांचे उत्तर खरे तर कोणत्याही प्रकारच्या वनस्पती असे आहे. मात्र पाण्याच्या माध्यमातून ही शेती केली जात असल्याने सर्व वनस्पती चांगल्याच वाढतील असे नाही. त्यामुळे हायड्रोपोनिक फार्मिंग साठी कोणत्या वनस्पतींची निवड करावी याच्या काही टिप्स येथे देत आहोत. निदान सुरवात करताना योग्य वनस्पती निवडाव्यात. एकदा अनुभव आला की मग ही यादी सहज वाढविता येते. कारण हायड्रोपोनिक लागवडीसाठी योग्य अश्या अनेक वनस्पती आहेत. सुरवात करताना काही भाज्या, फळे आणि मुळे यांची माहिती आपण घेऊ. १)लेट्युस – ( थंड हवा आणि पीएच लेव्हल ६.० ते ७.० ) सॅलड, सँडविच साठी लेट्युस ही एक आदर्श भाजी मानली जाते. जगभर लेट्युसचा वापर केला जातो आणि हायड्रोपोनिक पद्धतीत वाढविल्या जाणाऱ्या भाज्यात ही मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते. वेगाने वाढणारी ही वनस्पती काळजी घेण्याच्या दृष्टीने सोपी आहेच पण एनएफटी, एरोपोनिक्स, एब अँड फ्लो अश्या कोणत्याही हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये चांगल्या प्रकारे वाढविता येते. ज्यांना हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात करायची आहे त्याच्यासाठी …

हायड्रोपोनिक यंत्रणेत वाढविता येणाऱ्या काही वनस्पती .

आणखी वाचा
Members area

हायड्रोपोनिक फार्मिंगचे २० फायदे आणि तोटे

तुम्ही व्यवसाय म्हणून किंवा छंद म्हणूनही हायड्रोपोनिक किंवा विना मातीच्या शेतीचा विचार करत असाल तर हे आधुनिक शेती तंत्रज्ञान माझ्यासाठी योग्य आहे काय हा पाहिला प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारायला हवा. याचे मुख्य कारण म्हणजे हायड्रोपोनिक शेतीचे सर्वांगीण स्वरूप पाहताना त्यात काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हे फायदे काय आणि तोटे काय आहेत हे अगोदरच समजावून घ्यायला हवेत. हायड्रोपोनिक शेतीचे फायदे आणि तोटे या विषयी माहिती या लेखात वाचायला मिळेल. हायड्रोपोनिक शेतीचे फायदे काय याची माहिती प्रथम घेऊ १)मातीची गरज नाही जेथे उपजाऊ जमीन मर्यादित आहे, किंवा अजिबात जमीन नाहीच किंवा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्याने नापीक झाली आहे तेथेही हायड्रोपोनिक पद्धतीने पिके घेता येतात. १९४० सालीच हायड्रोपोनिक पद्धतीचा यशस्वी वापर करून वेक आयलंड येथे तैनात असलेल्या चमूसाठी ताज्या भाज्या आणि फळे पिकविली गेली होती. पॅन अमेरिकन एअरलाइन्स या विमान कंपनीची विमाने येथे इंधन भरण्यासाठी थांबत असत. प्रशांत महासागरात हा भाग जिरायती जमिनीचा भाग …

हायड्रोपोनिक फार्मिंगचे २० फायदे आणि तोटे .

आणखी वाचा
Members area

अनुलंब म्हणजे व्हर्टिकल किंवा बहुमजली शेती

बहुमजली इमारती असतात त्याप्रमाणे उभ्या प्रकारात केलेली शेती किंवा बाग याना अनुलंब म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग असे म्हटले जाते. अशी शेती करण्याचे मुख्य कारण म्हणजे विशेषतः शहरी भागात उपजाऊ जमिनीचे कमी झालेले प्रमाण आणि दुसरे म्हणजे घरच्याघरात, कमी जागेत चांगले उत्पादन घेण्याची सुविधा. उंच सांगाडे उभारून त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे झुडपे, भाज्या, फळे पिकविण्याची ही पद्धत. आता त्याला मातीशिवाय म्हणजे हायड्रोपोनिक शेती तंत्राची साथ मिळाल्यामुळे याकडे भविष्यातील अन्न गरजा पुरविणारी शेती म्हणूनही पाहिले जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ही आधुनिक हायड्रोपोनिक व्हर्टिकल शेती घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा घरातल्या घरात सुद्धा करता येते. दाट लोकवस्तीच्या शहरात जेथे जागा कमी आहे तेथे तर अशी शेती हे वरदान ठरू शकते. व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स म्हणजे नक्की काय व्हर्टिकल फार्मिंगचा अर्थ आहे बहुमजली पद्धतीने पिके घेणे. व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स या नावावरून बोध होतो तो मातीविना आणि बहुमजली शेती यांचा संयोग करून केलेली शेती. शहरी, नागरी भागात अनेक पातळ्यांवर वनस्पती वाढवून माती शिवाय केलेली शेती असेही म्हणता येतील. …

अनुलंब म्हणजे व्हर्टिकल किंवा बहुमजली शेती .

आणखी वाचा
plant leaves on plate

घरी बनविता येणारी नैसर्गिक कीडनाशके

पिकांचे धोकादायक किडी आणि कीटकांपासून संरक्षण व्हावे पण त्याचबरोबर जमिनीचे नुकसान होऊ नये आणि हे खाद्यान्न सेवन करणाऱ्या लोकांच्या पोटात कोणतेही विषारी किंवा शरीरावर दुष्परिणाम करणारे घटक जाऊ नयेत या साठी आजकाल नैसर्गिक कीड आणि कीटक नाशकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अशी नैसर्गिक कीडनाशके घराच्या घरी बनविता येतात. आणि त्याचा प्रयोग करण्यासाठी घरातलीच बाग सर्वात उत्तम असे म्हणता येईल. त्यातून जे उत्साही शेतकरी घरच्या घरी स्वतःपुरते धान्य किंवा शेत उत्पादन घेतात त्याच्यासाठी तर हे वरदान म्हणता येईल. घरातल्या बागेत किंवा परसात पिकविलेल्या धान्यापासून बनविलेल्या पदार्थांची रुची घेण्यात नक्कीच एक प्रकारचे सुख आणि समाधान मिळते. शिवाय एक वेगळा अनुभव गाठीशी बांधता येतो ते वेगळेच. यातही आणखी जे सेंद्रीय शेती करत आहेत त्यांना सेंद्रिय शेतीच्या प्रोटोकॉल किंवा नियम आणि उद्दिष्टांना सांभाळून असे उत्पादन मिळवणे नैसर्गिक कीडनाशकांचा वापर करून शक्य होते. जलद उत्पादन मिळविण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर म्हणजे तणनाशके, कीडनाशके आणि रासायनिक किंवा कृत्रिम खते वापरण्यापेक्षा घरच्या घरी बनविता …

घरी बनविता येणारी नैसर्गिक कीडनाशके .

आणखी वाचा
Youtube application

युट्युबच्या माध्यमातून कशी कराल कमाई? जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण माहिती

युट्युबच्या माध्यमातून कशी कराल कमाई? जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण माहिती या आधुनिक काळात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. इंटरनेटमुळे संपूर्ण जग एकमेकांशी जोडले गेले आहे. त्यामुळे इंटरनेटवरून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमावण्याच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. युट्युब हा त्यातीलच एक प्रकार आहे. युट्युबच्या माध्यमातून खुप कमाई करता येईल. शिक्षण, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान यांसह अनेक क्षेत्रातील माहिती युट्युबवर प्रकाशित करून आज अनेकजण कमाई करत आहेत. युट्युबवर सर्वात जास्त पैसे कोण कमवतात ?फोर्ब्स च्या माहितीनुसार, 2017 ते 2018 या कालावधीत पुढील 10 युट्युब चॅनल्सनी सर्वात जास्त पैसे कमवले आहेत.1) रयान कि दुनिया – 22 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 22.4 मिलियन)2) जॅक पॉल – 21.5 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 19.7 मिलियन)३) यार परफेक्ट – 20 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 47.1 मिलियन)4) Dan TDM – 18.5 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स 22.3 मिलियन)5) जेफरी स्टार – 18 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 16.5 मिलियन)6) मार्कीनियर – 17.5 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 24.5 मिलियन)7) वानोसगेमिंग …

युट्युबच्या माध्यमातून कशी कराल कमाई? जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण माहिती .

आणखी वाचा
green leaf vegetable

शेतीमालाची थेट विक्री

शेतकर्‍यांना स्वावलंबी करणारा व्यापार  थोडी पार्श्‍वभूमी शेतकरी हा पिढ्यान्पिढया नाडला गेलेला वर्ग आहे. मुळात तो अशिक्षित, असंघटित तर आहे त्यामुळे व्यापारी, अडते आणि दलाल त्याला अनेक प्रकारे लुबाडत असतात. त्याचा माल स्वस्तात खरेदी करण्यासाठी त्याची कोंडी करीत असतात. त्याचा माल स्वस्तात घेऊन तो किती तरी महागात विकण्याची त्यांची प्रवृत्ती असते. याचा अनुभव शेतकरी नेहमीच घेत असतात. पण या पिळवणुकीतून आपली सुटका कशी करून घ्यावी याचा मार्ग काही त्यांना सापडत नाही. सरकारचेही धोरण शेतकर्‍यांचाच घात करणारे असते. कारण शेतीत पिकणारा माल हा जीवनावश्यक असतो आणि तो शहरातल्या गरिबांना स्वस्तात मिळाला पाहिजे यासाठी सरकार शेती मालाच्या किंमती वाढू देत नाही. त्यांच्या किंमती वाढल्या की शहरात महागाई वाढली म्हणून आरडा ओरडा केला जातो आणि परिणामी  सरकार शेतीमालाच्या किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतेे. शेतीमालाच्या किंमती बाबत असा एक सिद्धांत मांडला जातो की, त्या किंमती केवळ मागणी पुरवठा किंवा उत्पादन खर्च यावर आधारलेल्या नसतात. तो माल खरेदी करणार्‍यांच्या ऐपतीवरही त्या ठरत असतात. देशातल्या जनतेची क्रयशक्ती

आणखी वाचा
chocolates with box on white surface

घरगुती चॉकलेटस बनवून करा भरपूर कमाई

आजकाल कोणताही आनंदाचा प्रसंग, उत्सव चॉकलेट शिवाय साजरा होत नाही असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वाढदिवस, व्हेलेंटाईन डे सारखे विविध डेज, लग्नाचे वाढदिवस, कार्पोरेट कार्यक्रम, सणाउत्सवानिमित् दिल्या जाणाऱ्या गिफ्ट, परीक्षेतील यश, दिवाळी, राखी सारखे सण, शाळेतल्या पार्टी असा कोणताही कार्यक्रम चॉकलेटच्या आस्वादाने साजरा करण्याची जणू प्रथा पडते आहे. ज्यांना थोडे भांडवल गुंतवून काही व्यवसाय उद्योग करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी घरी बनविलेली चॉकलेट्स हा चांगला फायदेशीर पर्याय ठरू शकतो. आज बाजारात सहज चक्कर टाकली तर अक्षरशः शेकडो प्रकारची चॉकलेट दिसतात. अगोड, कडू चवीची, मध्यम गोड, डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, कोका पावडर- शुगर फ्री चॉकलेट असे अनेक प्रकार जगभर लोकप्रिय ठरले आहेत त्यामुळे त्यांना सततची मागणी आहे. आता त्यात हेल्थ कॉन्शस म्हणजे आरोग्याबत जागरूक प्रजेची भर पडते आहे. आरोग्यपूर्ण जीवनासाठी विविध प्रकारची डाएटस, ऑर्गेनिक फूडचा वापर करणारे या विविध प्रकारच्या डाएटला अनुरूप अशा चॉकलेटला पसंती देताना दिसतात. त्यात केटो, वेगन, शुगर फ्री, ऑर्गनिक चॉकलेट आपला जम बसवू पाहत आहेत. …

घरगुती चॉकलेटस बनवून करा भरपूर कमाई .

आणखी वाचा
man in red polo shirt and blue denim jeans sitting on brown wooden bench during daytime

सेंद्रिय खते म्हणजे काय/ कसा करावा त्यांचा वापर

शेती, बागकाम किंवा उद्यान कलेत जमिनीमधील पिकाऊपणा, तिचा पोत, प्रत यावर जमिनीतून मिळणारे उत्पन्न किती आणि कसे मिळणार हे अवलंबून असते. अशावेळी जमिनीतील पोषकमूल्यांचे प्रमाण योग्य राखून पिकांच्या वाढीसाठी त्याचा वापर करून घेतला जातो. जमीन सुपीक या सदरात मोडणारी नसेल तर त्या जमिनीला खतांचा पुरवठा करून तिची प्रत सुधारता येते हे आपल्याला माहिती असते. वनस्पतींची वाढ सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनही योग्य प्रमाणात होत नसेल तर जमिनीतील पोषण द्रव्यांचा तोल बिघडला आहे असे लक्षात येते. अशा वेळी खतांचा वापर उपयुक्त ठरतो आणि त्यामुळे वनस्पतीची वाढ योग्य प्रमाणात होऊ शकते.  ज्या भागात नैसर्गिक रित्याच जमीन सुपीक आहे, तेथेही पिके वाढत असताना, जमिनीतील पोषण द्रव्ये शोषून घेत असतात आणि ही शोषलेली पोषण द्रव्ये जमिनीला पुन्हा मिळावीत यासाठी सुद्धा खतांचा वापर करावा लागतो. जमिनीत आवश्यक असणारी पोषण द्रव्ये खतांच्या माध्यमातून देता येतात. फुले येणारी किंवा बहारणाऱ्या वनस्पतींना, झाडांना पोषण द्रव्यांची गरज जास्त प्रमाणात असते. या वनस्पतींना चांगला बहर यावा आणि उन्हाळ्यात सुद्धा तो …

सेंद्रिय खते म्हणजे काय/ कसा करावा त्यांचा वापर .

आणखी वाचा
Members area

मसाले उद्योग कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा निरंतर मागणी असलेला उद्योग

  थोडी पार्श्‍वभूमी   हा कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. तो कोणालाही करता येतो. अगदी घरगुती उद्योग म्हणूनही तो करता येतो आणि मोठा उद्योग म्हणूनही करता येतो. मसाल्याशिवाय जेवण बेचव वाटते त्यामुळे ती सर्वांची गरज झाली आहे म्हणून हॉटेल्स मधून मसाल्यांना चांगली मागणी असते. मसाले तयार करण्यासाठी अनेक प्रकारचा कच्चा माल वापरला जात असतो आणि त्यांचे मसाल्यातले प्रमाण कमी जास्त करून अनेक प्रकारचे मसाले तयार करता येतात. या व्यवसायात विविधतेला मोठा वाव आहे. मसाले तयार करण्याचे कौशल्य भारतीयांनी पिढ्यान्पिढ्या जतन केलेले असल्यामुळे कोणताही भारतीय उद्योजक मसाल्याच्या उद्योगात यशस्वी होऊ शकतो .   भारतात हळद, धने, जिरे, मिरे, बडीशेप यांचा मसाले म्हणून चांगलाच वापर होत असतो. आणि त्यातले बहुतेक प्रकार भारतातच पिकतात. त्यामुळे तो मसाले तयार करणारा सर्वात मोठा देश मानला जातो. जगात वापरल्या जाणार्‍या मसाल्यांपैकी ७५ टक्के मसाले एकट्या भारतात तयार होतात ते अमेरिका, चीन, व्हिएतनाम, मलेशिया, बांगला देश, श्रीलंका या देशात प्रामुख्याने पाठवले जातात.    भारतात मसाले तयार करणारांना जगाचें …

मसाले उद्योग कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा निरंतर मागणी असलेला उद्योग .

आणखी वाचा
Members area

हायड्रोपोनिक्स, या तंत्राने मातीशिवाय करा शेती

जगभरात वाढती लोकसंख्या आणि तिच्या पालनपोषणासाठी लागणारे प्रचंड प्रमाणावर धान्य उत्पादन हा गहन प्रश्न आहे. ओसाड जमिनी, पाण्याचे अपुरे प्रमाण आणि टोकाचे हवामान अश्या भागात शेती दुरापास्त असते तर काही वेळा अति पाणी म्हणजे दलदलीच्या जागेत शेती होऊ शकत नाही. अश्या वेळी नवीन तंत्रज्ञानाने शेती कशी वाढविता येईल हे जसे महत्वाचे संशोधन आहे तसेच निसर्गावर अवलंबून न राहता शेती उत्पादन कसे घेता येईल या क्षेत्रात झालेले संशोधनही महत्वाचे ठरते. कमी जागेत सहजपणे करता येणारी, धूळ विरहित, जमीन आणि माती शिवायही माणसाला आवश्यक असलेल्या वनस्पती वाढविता येण्याची किमया हायड्रोपोनिक्स या तंत्राने साध्य करता येते हे आता स्पष्ट झाले आहे. हायड्रोपोनिक्स ही संकल्पना नवी नाही. आज जगभरात अनेक ठिकाणी हरितगृहे आणि घराघरातून या पद्धतीने शेती केली जात आहे. गेली ३० वर्षे या प्रकारे वनस्पती वाढविल्या जात आहेत. मात्र या पद्धतीने वनस्पती वाढविण्याचा इतिहास फार प्राचीन म्हणजे ख्रिस्तपूर्व ६०० काळात सुद्धा सापडतो. अर्थात त्या वेळची पद्धत आणि आता अनेक संशोधनानंतर विकसित झालेली पद्धत …

हायड्रोपोनिक्स, या तंत्राने मातीशिवाय करा शेती .

आणखी वाचा
rooster on white flower field during daytime

कुक्कुट पालन व्यवसाय

शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री फार्म असे म्हणतात.  शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात.   घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक …

कुक्कुट पालन व्यवसाय .

आणखी वाचा
assorted-color bar soap lot on white surface

असा करू शकता घरी बनविलेल्या साबणाचा व्यवसाय

एकंदरीत आज जीवनमान उंचावल्याने तसेच वाढत्या महागाईमुळे पती पत्नी दोघांनाही कमाई करावी लागते. अर्थात काही महिला अनेक कारणांनी घराबाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करू शकत नाहीत. मात्र घरबसल्या, घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून फावल्या वेळात घरीच काही उद्योग, व्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावू शकतात. कमी भांडवल आणि कमी जागेत आणि कमी मनुष्यबळ वापरून करता येणारे असे अनेक व्यवसाय आहेत. येथे आम्ही असाच एक व्यवसाय- घराच्या घरी नैसर्गिक साबण कसा बनविता येईल याची माहिती देत आहोत. साबण ही रोजच्या वापराची वस्तू आहे. आज बाजारात अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे, अनेक सुगंधाचे आणि अनेक किमतींचे स्नानासाठी वापरले जाणारे साबण उपलब्ध आहेत. घरी बनविलेल्या साबणाच्या तुलनेत त्यांच्या किमती स्वस्त आहेत. पण मुख्य फरक असा आहे की हे साबण पेट्रोलियम पदार्थ आणि अन्य कृत्रिम रसायने वापरून बनविले जातात. त्यामुळे ते अधिक काळ टिकणारे, वापरल्यावर दीर्घ काळ सुगंध देणारे असले तरी हे साबण दीर्घकाळ वापरात राहिले तर त्वचेला नुकसान पोहोचवितात हे आता लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे नैसर्गिक …

असा करू शकता घरी बनविलेल्या साबणाचा व्यवसाय .

आणखी वाचा
white goat wearing orange and gray shirt

शेळी : शेतकर्‍यांचे ए टी एम (Goat farming)

सध्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडू शकणारा एक व्यवसाय म्हणजे शेळीपालन. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांजच्या आत्महत्यांमागच्या कारणाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या नरेन्द्र जाधव यांच्या एक सदस्यीय अभ्यास गटाने आत्महत्यांवर जोड धंदा हा एक उपाय सुचविला आहे. तसे जोडधंदे अनेक आहेत पण त्यातल्या त्यात सोपा व्यवसाय आहे शेळीपालन. हा धंदा कमीत कमी पैशातही सुरू करता येतो आणि लाखो रुपये गुंतवूनही करता येतो. शिवाय तो फार गुंतागुंतीचा नाही आणि त्याचे मार्केटिंगही सोपे आहे. एका शेती तज्ज्ञाने असे म्हटलेले आठवते की, ज्या शेतकर्‍याच्या घरात शेळी पाळलेली असेल त्या शेतकर्‍यावर आत्महत्या करण्याची वेळ कधीही येणार नाही. महात्मा  गांधी  शेळीला गरिबांची गाय म्हणत असत. कारण शेळी गायीप्रमाणेच दूध देते पण गाय महाग असते. गोपालन करायला मोठी गुंतवणूक करावी लागते. जर्सी गायी तर हजारो रुपयांना विकल्या जात आहेत आणि म्हशींचे तर विचारूच नका. त्यामुळे अगदी गरीब शेतकर्‍यांना आणि शेतमजुरांना तेवढाले पैसे गुंतवून गाय किंवा म्हैस खरेदी करणे परवडत नाही. अशा लोकांना करता येणारा सर्वात …

शेळी : शेतकर्‍यांचे ए टी एम (Goat farming) .

आणखी वाचा
clear glass cruet bottle

तेल घाणा व्यवसाय, कोल्ड प्रेस घाणा

केवळ भारतातच नाही तर जगभरातील सर्व देशात आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात, कोणत्या ना कोणत्या तेलाचा वापर केला जातो. आहाराशिवाय अन्य कारणांसाठी सुद्धा तेल वापरले जाते. यंत्रांसाठी वंगण म्हणून, मसाज साठी, औषधे बनविण्यासाठी तसेच साबण, डिटर्जंट उद्योगात सुद्धा तेलाचा वापर केला जातो. वनस्पती पासून मिळणारे आणि प्राण्यांपासून मिळणारी चरबी व त्यापासून काढले जाणारे तेल असे याचे प्रामुख्याने दोन प्रकार मानता येतात. आपण येथे वनस्पतीपासून मिळणाऱ्या तेलाचा विचार करणार आहोत.  आपण सर्वसाधारणपणे जी खाद्य तेले आहारात वापरतो ती गळीत धान्ये, तेलबिया पासून मिळविली जातात. आजकाल आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागृती होत असल्याने लोक खाद्य तेलाची निवड करताना अनेक बाबी विचारात घेऊ लागले आहेत. सर्वसाधारण जीवनमान उंचावले असल्याने महाग असले तरी चांगले तेल घेण्याकडे लोकांची प्रवृत्ती वाढते आहे. अशा तेलांसाठी जादा पैसे मोजण्याची मानसिकता वाढली आहे. यापुढेही चांगल्या प्रकारच्या आणि पोषक तेलाची मागणी वाढती राहणार आहे हे लक्षात घेऊन छोट्या स्वरुपात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना तेल घाण्याचा व्यवसाय विचारात …

तेल घाणा व्यवसाय, कोल्ड प्रेस घाणा .

आणखी वाचा
woman leaning on food truck

फूड ट्रक व्यवसाय सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन

शहरांची वाढती लोकसंख्या फूड ट्रक व्यवसायासाठी फायद्याची ठरत असते याचा अनुभव आता भारतात सुद्धा येऊ लागला आहे. भारतात फूड ट्रक किंवा रेस्टॉरंट ऑन व्हील्स म्हणजे फिरती उपहारगृहे चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहेत. त्यामुळे ज्यांना या व्यवसायात उतरण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक चांगली व्यवसाय संधी निर्माण झाली आहे असे नक्की म्हणता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे फूड ट्रकला ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. यामुळेच गेल्या काही वर्षात या व्यवसायाची वाढ वेगाने होताना दिसते आहे. त्याचा थेट परिणाम खाद्यान्न उद्योगात फूड ट्रक व्यवसायाची हिस्सेदारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे. तुम्हाला जर या व्यवसायात उतरण्याची इच्छा असेल तर त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन या लेखातून करण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखातून काय माहिती मिळेल? या लेखातून फूड ट्रक व्यवसाय संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तुम्हाला फूड ट्रक इतिहास आणि व्यवसायाचे व्यूह शास्त्रभारतात फूड ट्रक व्यवसाय सुरु करण्यासाठी १० महत्वाची मार्गदर्शक तत्वेफूड ट्रक साठी आवश्यक स्वयंपाक उपकरणे व आवश्यक कच्चा मालव्यवसाय …

फूड ट्रक व्यवसाय सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन .

आणखी वाचा
assorted bread store display

असा सुरु करू शकता घरगुती बेकरी उद्योग

बेकरी उत्पादनांना आज चांगली मागणी असून या व्यवसायाची वाढ वेगाने होत आहे. विशेष म्हणजे बेकरी उद्योग घरच्या घरीही सुरु करता येतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरात बेकिंग सुरु करण्याची कल्पना अनेकांना वेडगळपणाची वाटू शकेल. पण आज प्रत्यक्षात मात्र अनेकांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून हा व्यवसाय सुरु केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे. या मागे अनेक कारणे देता येतील. घरगुती पातळीवर हा व्यवसाय सुरु केलेल्या अनेकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की वैवाहिक जीवन, मुलाबाळांचे संगोपन आणि आपली आवड किंवा पॅशन जपणे यामुळे त्याना हे सहज शक्य झाले आहे. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या मागणीत दिवसेनदिवस होत असलेली वाढ, तसेच मोठ्या प्रमाणावर सुरु झालेल्या नामवंत बेकरी चेन्स किंवा शाखा आणि स्वतंत्रपणे चालविल्या जात असलेल्या बेकरी यापासून प्रेरणा घेऊन अनेक महिला उद्योजकांनी घरच्या घरी बेकरी व्यवसाय सुरु करण्यात आघाडी घेतली आहे. घरच्या घरी हा व्यवसाय सुरु करण्यासाठी फारसे मनुष्यबळ लागत नाही तसेच प्राथमिक गुंतवणूक खुपच कमी लागते. शिकत असलेले विद्यार्थी, गृहिणी या सुद्धा बेकरी …

असा सुरु करू शकता घरगुती बेकरी उद्योग .

आणखी वाचा
closeup photo of silver iMac