पाळीव प्राण्यांची मनापासून आवड असणारे आणि स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय असावा अशी इच्छा असणाऱ्यांनी पेट स्टोअर्स या व्यवसायाचा विचार करण्यास हरकत नसावी. आवडीचे काम शिवाय पैसे मिळविण्याची संधी यामुळे मिळू शकते. आज अनेक कारणांनी पाळीव प्राणी, पक्षी, मासे पाळले जात आहेत. एकाकीपण घालविणे, सोबत, घरातील एकट्या लहान मुलांना कंपनी अश्या अनेक कारणांनी आवडीचे प्राणी पक्षी पाळण्याची क्रेझ भारतात सुद्धा वाढली असून या पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक असलेल्या अन्न, कपडे, खेळणी व अन्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. परिणामी या व्यवसायाचा विकास वेगाने होत असल्याचे आकडेवारी सांगते. प्राणी, पक्षी, मासे यांच्या साऱ्या गरजा पेट स्टोअर्स पुऱ्या करत असते.
तुम्हाला पेट स्टोअर्स सुरु करावे असे वाटत असेल तर त्या संदर्भात तुम्ही अगोदर सर्व माहिती गोळा करायला हवी. नुसते पेट स्टोअर्स याला काही अर्थ नाही. कारण या अंतर्गत अनेक प्रकार येतात त्यातील नक्की काय तुम्हाला सुरु करायचे आहे का सर्व सेवा द्यायच्या आहेत याचा विचार करायला हवा. या मागचे मुख्य कारण म्हणजे त्यानुसार तुम्हाला करावी लागणारी गुंतवणूक, जागा, मदतनीस, सप्लायर याची गरज ठरणार आहे.
पेट स्टोअर्स मध्ये प्राणी विक्री, साहित्य विक्री करण्याबरोबर अनेक प्रकारच्या सेवा देता येतात. त्यातील काही अश्या-
प्राण्यांना प्रशिक्षण देणे – उदाहरण म्हणून आपण येथे कुत्र्याचा विचार करू. तर कुत्राना बसणे, चालणे, उड्या मारणे, खाणे, काही वस्तू आणून देण्यास सांगणे असे अनेक प्रकारचे शिक्षण देता येते.
ग्रुमिंग – प्रशिक्षणाच्या पुढचा प्रकार म्हणजे ग्रुमिंग. त्यात प्राण्यांना अंघोळ घालून स्वच्छ करणे, जास्तीचे केस कापणे, नखे कापणे, ग्राहकाच्या गरजेनुसार कान, दात साफ करून देणे अश्या सेवा येतात.
पेट फूड– पाळीव प्राण्यांना आजकाल खास त्यांच्यासाठी बनविलेले अन्न देण्याकडे ग्राहकांचा कल आहे. आपल्या पाळीव प्राण्यांना हेल्दी, नैसर्गिक अन्न मिळावे अशी अनेकांची मागणी आहे. त्यामुळे पेट फूड असे खास स्टोर सुद्धा सुरु करता येते. यात मधुमेही प्राण्यांसाठी वेगळे फूड, किडनी प्रोब्लेम असलेल्या कुत्र्यांना वेगळे फूड अशी खूप मोठी रेंज आहे अनेकदा पशु वैद्यकाने कुत्री, मांजरे याच्यासाठी डायेट दिलेले असते त्यानुसार पेट फूड ग्राहकाला उपलब्ध करून द्यावे लागते.
पेट डे केअर– हे एक प्रकारचे पाळणाघरच आहे. अनेकदा पेट मालक कामानिमित्ताने बराच काळ घराबाहेर राहत असतील तर पेट डे केअरची सुविधा त्यांना हवी असते. आपला लाडका प्राणी सुरक्षित हातात राहावा, त्याला सोशल बिहेविअरची सवय व्हावी असे अनेक हेतू या डे केअर मध्ये ग्राहक साध्या करू शकतो.
पेट क्लोदिंग– पाळीव प्राण्यासाठी आज काल अनेक वस्तू आवर्जून खरेदी केल्या जातात. त्यात सर्वात अधिक मागणी आहे ती पाळीव प्राण्यांच्या कपड्यांना. विविध पाळीव प्राण्यांसाठी विविध प्रकारचे कपडे आज उपलब्ध असून त्यात थंडीसाठी स्वेटर्स, जॅकेट्स, रेनकोट, पायमोजे, विविध प्रकारच्या टोप्या याचा समावेश आहे.
स्वच्छता– या शिवाय तुमच्या जवळपासच्या भागात ग्राहकांना पाळीव प्राण्यांची स्वच्छता करून देणे या सेवेचा अंतर्भाव तुम्ही तुमच्या व्यवसायात करू शकता. कारण यातूनही चांगला पैसा मिळविता येतो आणि त्यासाठी गुंतवणूक लागत नाही.
फिश टँक्स – आपल्या पेट स्टोअर्स मध्ये घरात, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, वकिलांची कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिस, रेस्टॉरंट, अश्या अनेक ठिकाणी बसविण्यासही खास मासे असलेले छोटे मोठे टँक्स बसविणे हे काम करता येते. विविध प्रकारचे, खास प्रकारचे मासे यासाठी तुम्ही निवडू शकता. हे टँक्स भाड्याने देण्याचा व्यवसाय सुद्धा पेट स्टोअर्सच्या जोडीला सहज करता येतो.
पेट फोटोग्राफी– तुम्हाला फोटोग्राफी अवगत असेल तर त्याचा उपयोग करून तुम्ही पेट स्टोअर्सच्या जोडीला पेट फोटोग्राफी करून जास्तीची कमाई करू शकता. कॅलेंडर्स, टीशर्ट, मग्ज, ग्रीटिंग कार्ड, हॅटस अश्या अनेक वस्तूंवर प्राण्यांचे विविध पोझ मधले फोटो प्रिंट करण्याची क्रेझ आहे. त्यासाठी असे फोटो तुम्ही पुरवू शकता.
सुरु कसे करावे-
पेट स्टोअर्स सुरु करण्याचा निर्णय घेतला पण ते सुरु कसे करायचे याची माहिती नसेल तर येथे थोडे मार्गदर्शन मिळू शकेल. तुम्हाला पेट स्टोअर्स केवढे, कुठे सुरु करायचे यावर त्यासाठी लागणारा खर्च ठरणार आहे. पण अगदी छोट्या स्वरुपात, घराच्या घरी सुद्धा असे स्टोअर्स सुरु करता येते. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पाळीव प्राण्यांना लागणारया वस्तू सोबत प्राणी विक्री सुद्धा करणार असाल तर त्यासाठी आपल्या राज्याची, शहरातील महापालिकेची काय नियमावली आणि कायदे आहेत याची पूर्ण माहिती करून घेणे आणि त्यानुसार परवाने, परवानग्या घेणे आवश्यक आहे.
घरच्या घरी प्राण्यासाठी लागणाऱ्या वस्तू विकणे शक्य आहे आणि घरातच व्यवसाय असेल तर जागेसाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही. पण भाड्याने दुकाने घेऊन सुद्धा हा व्यवसाय करता येतो. रिटेल स्टोअर सुरु करणार असला तर त्यासाठी थोडी अधिक गुंतवणूक करावी लागेल पण समजा तुम्ही फक्त पेट फूड, अन्य अॅक्सेसरिज विकणार असलात आणि त्याचे उत्पादन सुद्धा करणार असलात तर मोठी गुंतवणूक आवश्यक ठरेल.
पेट शॉप कायदा
ज्यांना पेट स्टोअर्स मध्ये प्राण्याची विक्रीही करायची आहे, त्यांनी पेट शॉप रुल २०१८ ची पूर्ण माहिती करून घ्यायला हवी. असे शॉप सुरु करण्यापूर्वी पर्यावरण मंत्रालय, वन विभाग व क्लायमेट चेंज विभाग, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट १९७२ यांचे नियम तपासून घ्यायला हवेत. संबंधित राज्याचे पशु कल्याण बोर्ड यांचे प्रमाणपत्र घेऊन तशी नोंदणी करावी लागते.
पेट स्टोअर साठी योग्य नावाची निवड
आपल्या दुकानाचे नाव आकर्षक असणे जसे आवश्यक आहे तसेच त्यातून तुमच्या व्यवसायाबद्दल ग्राहकांना नुसते नाव वाचून बोध व्हायला हवा याचीही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे नाव ठरविताना हे निकष लावावेत. काही स्टोअर्सची नावे येथे माहितीसाठी दिली आहेत-
कोणत्या वस्तूंना अधिक मागणी-
भारताचा विचार केला तर भारतात सर्वाधिक संख्येने कुत्री पाळली जातात, त्यापाठोपाठ मांजरे, पक्षी आणि मासे याना मागणी आहे. पेट स्टोअर्स मध्ये पाळीव प्राण्यांना आवश्यक त्या सर्व वस्तू हव्यात पण त्यातही सर्वाधिक मागणी आहे पेट फूडला. पेट साठी खेळणी सुद्धा चांगली खपतात. त्याचबरोबर कॉलर्स, लिश, कपडे, पिंजरे, फिश टँक्स यांचीही चांगली विक्री होते.
आजकाल डॉग बेड, डॉग सीटकव्हर, चावायची खेळणी, टूथ ब्रश, मांजराचे बिछाने, डॉग जॅकेट्स ट्रेंड मध्ये आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर खपत आहेत. आणि या वस्तूंना आणखी काही काळ तरी चांगली मागणी राहील असा या क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाज आहे.
पेट स्टोअर
तुम्ही तुमच्या पेट स्टोअर साठी होलसेलर कडून खरेदी करू शकताच पण तुम्ही स्वतः डीलर बनून सुद्धा अन्य पेट स्टोअर्सना माल पुरवू शकता. यात होलसेलर कडून पेट स्टोअर्स चालकांच्या गरजेनुसार आणि मागणीनुसार माल खरेदी करून तो पेट स्टोअर्स कडे पोहोचविणे हे काम करावे लागेल. येथे वेअर हाउसची आवश्यकता नसली तरी दुकान आवश्यक आहे.
ऑनलाईन पेट स्टोअर असे सुरु करा
तुम्ही ऑनलाईन पेट स्टोअर सुरु करायच्या विचार करत असाल तर त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती करून घेऊ. ऑनलाईन पेट स्टोअर साठी तुम्हाला दुकानाची आवश्यकता नाही पण होलसेलर तसेच उत्पादकांशी संपर्क प्रस्थापित करावे लागतील. होल सेलर किंवा उत्पादकांकडून खरेदी केलेला माल साठविण्यासाठी वेअर हाउस हवे. त्यामुळे ग्राहकाच्या मागणीनुसार वेळेत त्याला पुरवठा करणे सहज शक्य होईल. होल सेलर कडून तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता
आज ऑनलाईन ई कॉमर्स व्यवसाय प्रचंड वेगाने वाढत असून पेट स्टोअर्स सुद्धा त्याला अपवाद नाहीत. तुम्हाला ऑनलाईन पेट स्टोअर्स सुरु करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ?
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
मार्केटिंग
यापैकी कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्या प्रसिद्धी साठी प्रयत्न हवेत आणि जाहिरातीच्या माध्यमातून हे काम करता येते. ऑफलाईन किंवा ऑनलाईन जाहिराती यासाठी करता येतात.
विविध ऑनलाईन मार्केटची धोरणे लक्षात घेऊन आपला व्यवसाय कसा प्रमोट करायचा याचा निर्णय घ्यावा लागतो. आपल्या वेबसाईटला ग्राहकानी मोठ्या संख्येने भेट द्यावी यासाठी ऑनलाईन मार्केटिंग स्ट्रॅटीजी आखून राबवावी लागेल, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, क्लासिफाईड जाहिराती द्याव्या लागतील. कॅम्पेन चालवावी लागतील.
ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि ऑनलाईन मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
पेट स्टोअर्स सुरु करण्याचे काही फायदे-
स्वतःचे पेट स्टोर्स काढण्याचे काही फायदे आहेत. मुख्य म्हणजे यात कोणती उत्पादने विकायची याची निवड तुम्ही स्वतः करू शकता त्याचबरोबर तुमच्या ग्राहकांना पर्सनलाइज्ड सेवा देऊ शकता. ग्राहकांशी तुम्ही चांगले संबंध प्रस्थापित करू शकलात तर त्याचे आणखी फायदे मिळतात.
मोठ्या पेट स्टोर्स मध्ये सहज उपलब्ध न होणारी काही उत्पादने आणि सेवा पुरवून तुम्ही स्वतःचे वेगळेपण राखू शकता. उदाहरण द्यायचे तर एखाद्या पाळीव मांजराला एखादे विशिष्ट नैसर्गिक फूड लागत असेल तर ते पुरवितानाच छोट्या स्वरुपात पेट बुटिक तुम्ही चालवू शकता.
तुम्हाला पाळीव प्राण्यांबद्दल चांगली माहिती असेल तर त्याचा वापर तुम्ही ग्राहकांबरोबर संबंध वाढविण्यासाठी करू शकता. अनेक पेट स्टोअर्स मध्ये नेमलेले विक्रेते ग्राहकाला आवश्यक माल देतात आपण त्यांना प्राण्यांविषयी माहिती नसते. तुम्ही आलेलं ग्राहकाकडे कोणता प्राणी पाळला जातोय या नुसार त्याला त्याची काळजी कशी घ्या या विषयी, प्राणी आहार, त्यांचे लसीकरण या विषयी माहिती देऊ शकलात तर ग्राहक नक्कीच पुन्हा तुमच्याकडे खरेदीला येतो असा अनुभव आहे.
या व्यवसायाचे काही तोटे सुद्धा आहेत. या व्यवसायासाठी गुंतवणूक करावी लागते आणि स्टोअर्स यशस्वी झाले नाही तर नुकसान होऊ शकते. पण हा धोका सर्वच व्यवसायात असतो. मोठ्या पेट स्टोअर्स बरोबर स्पर्धा करावी लागते आणि त्यातून आपल्या व्यवसायाचा जम बसविणे हे मोठे आव्हान असते.
व्यवसायातील आव्हाने– पेट स्टोअर चालविणे यासाठी खूप कष्ट आणि काळजीपूर्वक प्लॅनिग करावे लागते. तुमच्या सेवेचा दर्जा उत्तम हवाच पण तुम्ही जी उत्पादने विकणार त्याची विश्वासार्हता जपणे हे मोठे आव्हान आहे.
उत्पादनांचे स्पर्धात्मक दर ठेऊन सुद्धा फायदा मिळावा यासाठी ग्राहक संख्या वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतील .
व्यवसायातील सध्याचे ट्रेंड कोणते, त्याचे काय चांगले वाईट परिणाम आहेत याबाबत अद्ययावत माहिती मिळविणे आणि भविष्यात कोणते ट्रेंड असतील याचा आढावा घेऊन त्यामुळे आपल्या व्यवसायाला अधिक चालना कशी देता येईल याबाबत सतत जागरूक राहुन त्यानुसार आवश्यक बदल करावे लागतील.
This post was last modified on November 26, 2020 9:06 PM
स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…
तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…
तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…
व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…
आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…
माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…