तुम्ही व्यावसायिक, उद्योजक आहात तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग अशा कोणत्याही श्रेणीमध्ये करण्यासाठी जो विशिष्ट नंबर घ्यावा लागतो त्याला उद्योग आधार असे म्हटले जाते. हा उद्योग आधार नंबर कसा मिळवायचा याची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.
वरील श्रेणीतील कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी नोंदणी करावी लागते याची माहिती अनेकांना असेल. ही नोंदणी करण्यासाठी पूर्वी जी प्रक्रिया होती ती अतिशय क्लिष्ट, वेळ खाणारी आणि अनेक कागदपत्रांची आवश्यकता असलेली अशी होती. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागत असे आणि लाल फितीच्या कारभाराला तोंड द्यावे लागत असे. मात्र आता सरकारने नव्याने आणलेली उद्योग आधार प्रक्रिया अतिशय सुलभ, सोपी, मोजक्या कागदपत्रांची गरज असलेली अशी आहे.
तुमचा उद्योग किंवा व्यवसाय सूक्ष्म, लघु किंवा मध्यम श्रेणीतील असेल आणि तुम्ही तशी नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही अनेक सरकारी फायदे घेण्यास मुकता आहात हे लक्षात घ्यायला हवे. योग्य त्या श्रेणीत आपल्या उद्योगाची नोंदणी करून उद्योग आधार मसुदा (उद्योग आधार मेमोरँडम) करून तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता.
त्यासाठी अगोदर ही पद्धती काय याची माहिती घ्यायला हवी:-
उद्योग आधार पद्धती अस्तित्वात येण्यापूर्वी ईएम १/२ (आन्त्रेप्रेन्यूअर मेमोरँडम) ही पद्धत वापरात होती. अर्थात त्यासाठी संबंधित व्यक्तीला म्हणजे उद्योजक, व्यावसायिकाला भिन्न प्रकारची पद्धत वापरावी लागत असे. त्यात काही जणांना राष्ट्रीय पोर्टलचा तर काही जणांना त्या त्या राज्याच्या स्वतंत्र पोर्टलचा वापर नोंदणी करण्यासाठी करावा लागत असे आणि त्यात हातानेच मोठे पेपरवर्क किंवा कागदपत्र करण्यावर अवलंबून राहावे लागे. ही जुनी व्यवस्था आता काढून टाकल्याने खूपच फरक पडला आहे.
उद्योग आधार म्हणजे नेमके काय?
जे नव्याने काही उद्योग व्यवसाय सुरु करत आहेत त्यांच्या मनात पाहिला प्रश्न येतो तो उद्योग आधार म्हणजे काय हाच. त्याचे उत्तर येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्योग आधार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तुमच्या उद्योगाची सरकारी नोंदणी करणे आहे. या नोंदणी बरोबर एक ओळख प्रमाणपत्र व एक युनिक नंबर दिला जातो. त्यानुसार तुमचा व्यवसाय/ उद्योग सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग किंवा संस्थात्मक, उपक्रम अश्या श्रेणीमध्ये समाविष्ट होतो यालाच एमएसएमई नोंदणी असेही म्हटले जाते.
उद्योग आधारचा मुख्य उद्देश सुक्ष्म, लघु, मध्यम श्रेणीतील जे उद्योग नोंदले गेले आहेत त्यांना जास्तीत जास्त सरकारी फायदे, सवलती मिळवून देण्याचा एक मार्ग म्हणूनही याकडे पाहिले पाहिजे. ज्यांनी अशी नोंदणी करताना त्यांच्या आधार कार्डचा नंबर दिला आहे अशा व्यावसायिक उद्योजकांना ही सुविधा मिळते. त्यासाठी व्यवसाय किंवा उद्योगाचा मालक, संचालक, प्रोप्रायटर यांना त्यांचा १२ आकडी आधार कार्ड नंबर द्यावा लागतो.
जर उद्योग एकट्याच्या मालकीचा, भागीदारीतील, प्रायव्हेट लिमिटेड अथवा अन्य प्रकारचा असेल तर त्यांना एमएसएमई नोंदणी प्रमाणपत्र हवेच.
कोण घेऊ शकतो उद्योग आधार नंबर?
सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचा व्यवसाय, उद्योग असला तरी उद्योग आधार घेता येते. हिंदू अविभक्त कुटुंब, प्रोप्रायटर म्हणजे एकल मालक, भागीदारी फर्म, उत्पादन कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे खासगी मर्यादित कंपनी, मर्यादित जबाबदारी भागीदारी म्हणजे लिमिटेड लायबिलीटी पार्टनरशिप (एलएलपी), सहकारी सोसायटी अथवा अन्य प्रकारची, उदाहरणार्थ काही लोकांनी एकत्र येऊन सुरु केलेला व्यवसाय याना उद्योग आधार मिळू शकते.
तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा उद्योग सुक्ष्म, लघु, मध्यम अश्या कोणत्या श्रेणी मध्ये नोंदवू शकता यासाठी काही निकष आहेत. त्यासाठी एमएसएमई अॅक्ट २००६ नुसार तुमची पात्रता तपासून घेतली पाहिजे.
उद्योग आधार नोंदणी प्रक्रिया
ही प्रक्रिया अतिशय सोपी, सुलभ असून त्यासाठी करावयाचा अर्ज अतिशय स्पष्ट आणि सुलभ आहे. जुन्या प्रक्रियेच्या तुलनेत यामध्ये खूपच कमी माहिती द्यावी लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे एमएसएमई नोंदणी मोफत करता येते. वेबसाईटसाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज लागत नाही तसेच नोंदणी परवाना देताना कोणत्याही प्रकारचे अधिकृत शुल्क आकारले जात नाही. ही नोंदणी करण्यासाठी फार वेळ लागत नाही. ही नोंदणी करताना काही निकष किंवा कसोट्या आहेत त्याची माहिती करून घेऊ.
पहिली पायरी
ही नोंदणी करण्याची पहिली पायरी म्हणजे अधिकृत वेबसाईट किंवा संकेतस्थळाला भेट देणे. ऑनलाईन नोंदणीसाठी
Udyog Aadhar Registration या संकेत स्थळाला भेट द्यावी.
दुसरी पायरी
येथे तुम्ही प्राथमिक माहिती भरायची आहे. नाव, आणि १२ आकडी आधार नंबर द्यायचा आहे. त्यानंतर व्हॅलीडेट अँड जनरेट ओटीपी (प्रमाणित करा आणि एकवेळचा वेळचा पासवर्ड निर्माण करा) तेथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदविलेल्या मोबाईल वर ओटीपी मिळेल. हा ओटीपी भरून नंतर श्रेणी निवडायची आहे. त्यासाठी पर्याय दिले गेले आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य( जनरल), अनुसूचित जाती, जनजाती आणि ओबीसी अश्या श्रेणी असून त्यातून तुम्ही योग्य ती निवडायची आहे.
विशेष सूचना
सर्वात प्रथम हे लक्षात घ्यायला हवे- ज्यांचा स्वतःचा उद्योग/ व्यवसाय आहे आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड ही आहे त्यांनाच उद्योग आधार साठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करता येते. पण समजा एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तर तो किंवा ती तरीही उद्योग आधारसाठी नोंदणी करू शकतात. फक्त त्यासाठी त्यांना जिल्हा उद्योग केंद्र (डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रीज सेंटर- डीआयसी) मध्ये जनरल मॅनेजर कडे जावे लागते.
तिसरी पायरी
या फेज मध्ये उद्योगाची सविस्तर माहिती द्यायची आहे. तुम्ही अर्जदार आहात तेव्हा तुमचा उद्योग ग्राहक किंवा सार्वजनिक पातळीवर कोणत्या नावाने ओळखला जावा हे स्पष्ट करण्यासाठी उद्योगाचे नाव भरायचे आहे. समजा एकच व्यक्ती किंवा भागीदारांचे अनेक उद्योग असतील तर प्रत्येक उद्योगासाठी वेगळे उद्योग आधार घ्यावे लागेल. त्यात संस्था १, संस्था २ असे भरू शकता. तुमचा व्यवसाय कोणत्या स्वरूपाचा आहे त्याची निवड दिलेल्या पर्यायातून करून तशी माहिती भरावी लागते.
चवथी पायरी
वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर या स्टेपमध्ये तुमचा पूर्ण पत्ता, कंपनी/ संस्था अथवा व्यवसायाचा पत्ता, जिल्हा, पिनकोड, राज्य, ईमेल व मोबाईल नंबर सह भरावा लागतो.
पाचवी पायरी
यात तुम्ही तुमचा व्यवसाय/ उद्योग कोणत्या तारखेला सुरु झाला याची माहिती द्यायची आहे. त्यासाठी तेथे कॅलेंडर दिले गेले आहे. तसेच यापूर्वी तुम्ही तुमचा व्यवसाय कोणत्या श्रेणीत नोंदविला होता( एसएसआय, ईएम १, ईएम २) त्याची माहिती उद्योग आधार रजिस्ट्रेशन सह द्यायची आहे.
सहावी पायरी
या ठिकाणी तुम्ही तुमच्या व्यवसाय उद्योगाचे खाते ज्या बँकेत आहे तो खाते नंबर, त्या बँक शाखेच्या आयएफएससी कोड सह भरायचा आहे. तुम्हाला तुमच्या बँक शाखेचा आयएफएससी कोड माहिती नसेल तर तो तुम्हाला बँकेच्या वेबसाईट म्हणजे संकेतस्थळावर मिळू शकतो.
सातवी पायरी
यात तुम्हाला तुमच्या व्यवसाय/उद्योगाचे वर्गीकरण करावयाचे आहे. तुमाच्या उद्योगात होणारे मुख्य काम उदाहरणार्थ सेवा किंवा उत्पादन असे स्वरूप द्यायचे आहे. ही पायरी थोडी गोंधळाची आहे. उदाहरण द्यायचे तर तुमचा उद्योग सेवा आणि उत्पादन असा दोन्ही स्वरूपाचा असू शकतो. अश्या वेळी तुम्ही पर्यायाची निवड करताना तुमच्या व्यवसाय किंवा उद्योगाचा मोठा भाग कोणता हे पाहून पर्याय द्यायचा आहे. म्हणजे समजा तुमच्या व्यवसायात सेवा ८० टक्के आणि उत्पादन २० टक्के अशी विभागणी असेल तर तुम्ही सेवा असे वर्गीकरण करायला हवे.
आठवी पायरी
वरील सर्व माहिती योग्य भरल्यावर तुम्हाला तुमच्याकडे काम करणारया एकूण कर्मचाऱ्यांची संख्या तसेच तुम्ही व्यवसायात केलेली एकूण गुंतवणूक याची माहिती भरायची आहे.
नववी पायरी
ही तुमच्या अर्जातील शेवटची पायरी आहे. यात तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राची निवड करायची असून त्याची यादी दिली गेलेली आहे त्यातून निवड करायची आहे. त्यानंतर डिक्लेरेशन स्वीकारून तुमचा अर्ज दाखल करायचा आहे. या नंतर तुम्हाला पोच पावती नंबर म्हणजे अॅक्नॉलेजमेंट नंबर दिला जातो.
उद्योग आधार मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे
तुमच्या व्यवसायासाठी उद्योग आधार मिळविण्यासाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण करत असताना लागणाऱ्या कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे*
उद्योग आधार मध्ये भरलेली माहिती दुरुस्त कशी करायची?
तुम्ही अगोदरच उद्योग आधार नंबर मिळविलेला असेल तर काही प्रश्न येत नाही. पण अनेकदा असे होते की ऑनलाईन अर्ज भरताना काही चुका होऊ शकतात पण समजा अश्या काही चुका किंवा त्रुटी राहिल्या असतील तर त्याची दुरुस्ती करता येते.
त्यासाठी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने नुकतीच एक नवी तरतूद केली आहे. त्यानुसार अर्जदार उद्योग आधार मसुदा बदलू शकतो. केवळ क्लिक करून चुकीची भरलेली माहिती दुरुस्त करता येते. त्यासाठी एक लिंक दिली गेली आहे.
Update your Udyog Aadhar Details या लिंक वर तुमचा आधार नंबर, नाव आणि मिळालेला ओटीपी टाकला की तुम्ही तुमची माहिती अपडेट करू शकता.
उद्योग आधारचे फायदे
आपल्या व्यवसाय उद्योगासाठी उद्योग आधार घेण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ही सारी प्रक्रिया सुलभ आणि कमी कागदपत्रे पूर्तता अशी आहे.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने या श्रेणीत येणाऱ्या उद्योगांना संरक्षण, प्रोत्साहन मिळावे आणि या उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सहाय्य द्यावे यासाठी अनेक योजना सादर केल्या आहेत. त्यातील १० महत्वाचे फायदे येथे देत आहोत.
याशिवाय एमएसएमई योजनाची सविस्तर माहिती भारत सरकारच्या कागदपत्रातून मिळते.
——————
This post was last modified on November 26, 2020 4:03 AM
स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…
तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…
तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…
व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…
आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…
माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…