कमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग

माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे उत्पादन ठरते. ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी फार भांडवल गुंतवायचे नाही, तसेच मोठी जागा नाही अश्यांसाठी अन्न प्रक्रिया उद्योग हे आदर्श व्यवसाय ठरू शकतात. विविध प्रकारे अन्न धान्य वापरून टिकाऊ खाद्यपदार्थ बनविणे असे या उद्योगाचे स्वरूप असते. येथे आपण ज्या अन्न प्रक्रिया उद्योगांची माहिती करून घेत आहोत ते सहज सुरु करता येणारे, कमी भांडवलाची गरज असलेले आणि फायदेशीर होतील असे उद्योग आहेत. भारताचा विचार केला तर आपल्याकडे खाद्यान्न क्षेत्राची वाढ प्रचंड वेगाने होत असून यात नफा होण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. भारतीय अन्न आणि किराणा बाजार हा जगातील सहा नंबरचा मोठा बाजार असून अन्न प्रक्रिया उद्योग एकूण खाद्यान्न बाजाराच्या ३२ टक्के इतका आहे असे आकडेवारी सांगते. आपला देश मोठ्या लोकसंख्येचा आहे आणि त्यामुळे दाट लोकवस्तीच्या देशात तुमच्या उत्पादनांना नेहमीच बाजार उपलब्ध होतो. शिवाय बँका आणि इतर वित्तीय संस्था

आणखी वाचा

पापड उद्योग

पापडाची आता फॅक्टरी झाली धंदा कोणता करावा असा प्रश्‍न अनेक तरुण विचारतात. एखादा व्यवसाय करून श्रीमंत व्हावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात असते पण नेमका कोणता धंदा करावा याबाबत ते संभ्रमात असतात. खरे तर असा संभ्रम असण्याचे काही कारण नाही. आपल्या आसपास नजर टाकली तर लक्षात येईल की, काही तरी करून बाजारात विकले जाते किंवा कसली तरी सेवा बहाल केली जाते त्या सर्व सेवा आणि ती उत्पादने हा धंदाच असतो. पण कोणत्या धंद्यात कोणती आणि किती आव्हाने आहेत, कोणत्या धंद्यात नेमकी किती स्पर्धा असेल आणि तिला आपण तोंड देऊ शकू की नाही असा प्रश्‍न असतो.  त्याशिवाय आपण असेही पहातो की काही धंदे छान चालतात पण काही वर्षांनी पहावे तर त्याचा मागमूसही रहात नाही. काही दिवसांपूर्वी एस टी डी सेंटर हा छान धंदा होता पण तो आता बंदच पडला आहे कारण फोनशी संबंधित तंत्रज्ञान बदलले आहे. काही धंद्यात काही दिवस चलती असते पण काही दिवसांनी त्यातल्या मालाची मागणीच आटून जाते. म्हणजे धंदा …

पापड उद्योग .

आणखी वाचा
brown beverage in clear mason jar with sstirrer

मधाचा धंदा अनेक प्रकारे हितकर (Honey Processing)

सध्या कृत्रिम आणि बाजारातल्या अन्नाचे परिणाम लोकांना जाणवायला लागले आहेत आणि शक्यतो नैसर्गिक अन्न खाल्ले पाहिजे अशी भावना जागी होत आहे. निसर्गाने दिलेले अन्न पदार्थ तसेच खावेत म्हणजे ते औषधाप्रमाणे गुणकारी ठरतात असाही अनुभव लोकांना येत आहे. त्यातला सर्वाधिक वापरला जाणारा गुणकारी पदार्थ आहे मध. वजन कमी करणे, पचन शक्ती वाढवणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे अशा अनेक प्रकारे उपयुक्त असल्याने मधाची मागणी वरचेवर वाढत आहे. त्यामुळे मध गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे हा फारच किफायतशीर व्यवसाय झाला आहे.  मध काही कारखान्यात तयार होत नाही. तो निसर्गात मधमाशांकडून तयार केला जातो. त्याचा  कच्चा माल आपण आणलाय आणि त्यावर मोठी प्रक्रिया केलीय असा काही प्रकार मधात नाही. निसर्गात आपोआप तयार होणारे हे अन्न आपल्याला केवळ गोळा करायचे आहे आणि साफ सफाई करून विकायचे आहे. तेव्हा मार्जिन ऑफ प्रॉफिटचा काही प्रश्‍न नाही. पूर्वीच्या काळी झाडांना मधमाशांचे पोळे लटकलेले दिसायचे. गुराखी त्यावर नजर ठेवायचे आणि योग्यवेळी ते झोडपून गावात लोकांना आणून द्यायचे किंवा …

मधाचा धंदा अनेक प्रकारे हितकर (Honey Processing) .

आणखी वाचा
bun, lettuce, and chips served on white ceramic plate

सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips)

आपण आसपास नजर टाकली तर बटाट्याचे चिप्स हा खाद्य प्रकार किती लोकप्रिय आहे याचे दर्शन  आपल्याला घडते. त्यावरून आपल्याला त्याला असलेली मागणी तर कळेलच पण ही मागणी पुरी करताना किती प्रकारचे चिप्स तयार केले जात असतात याचीही कल्पना येईल. बाजारात साध्या चिप्स बरोबरच आकाराने आणि चवीने किती प्रकारची विविधता साधली जाते हे बघण्यासारखे आहे. बसस्टँड, रेल्वे स्टेशन, चित्रपट नाट्यगृहे, करमणुकीचे अन्य कार्यक्रम करणारी सभागृहे, अनेक प्रकारच्या पार्ट्या, विवाह समारंभातले भोजनाचे समारंभ, निरनिराळ्या प्रकारच्या बैठका, पर्यटन स्थळे,  पिकनिक स्पॉटस्, मद्यपान गृहे आणि उपाहारगृहे अशा अनेक ठिकाणी बटाट्याच्या कापांना मागणी असते.  एरवी तर हे काप खाल्ले जातातच पण विशेष करून उपवासाला ते चालत असल्याने धार्मिक स्थळांवर आणि मंदिरांत त्यांना विशेष मागणी असते. भारतात बटाट्याच्या चिप्सची फार मोठी बाजारपेठही आहे आणि अनेक लोक चिप्स तयार करून, विकून त्यातून मोठा नफाही मिळवत असतात. बटाटा हा या प्रकारातला सर्वात मोठा कच्चा माल. शिवाय तळण्याचे तेल हाही उत्पादन खर्चातला मोठा घटक असतो. हा उद्योग आपण घरगुती …

सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips) .

आणखी वाचा
three cherry tomatoes

टोमॅटो प्रक्रिया उद्योग

खरे तर आपल्याला टोमॅटो ही भाजी दुसर्‍या महायुद्घापर्यंत फारशी माहिती नव्हती पण आता तिचा आपल्या जेवणातला आणि त्यातल्या त्यात न्याहरीतला वापर फार वाढला आहे. फळभाज्यात ती सर्वाधिक पिकवली जाणारी दुसर्‍या क्रमांकाची भाजी ठरली आहे. वांगे आणि टोमॅटो यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. असे असले तरी वांग्यांवर कसलीही प्रक्रिया केली जात नाही.टोमॅटो मात्र अनेक प्रकारची प्रक्रिया करून वापरले जात. टोमॅटोची प्रक्रिया काहीशी अवघड आहे आणि तिच्यासाठी गुंतवणूकही मोठी करावी लागते. त्यामुळे टोमॅटो सॉस, केचप, पावडर, टोमॅटोचे काप इत्यादी प्रक्रियाकृत उत्पादने म्हणावी तेवढी मिळत नाहीत. त्यांचा वापर मात्र वाढत आहे. विशेषत: टोमॅटो सूपसाठी लागणारी पावडर आणि सॉस या गोष्टी आपल्या खाण्यात अगदी सामान्य तसेच नित्याच्या झाल्या आहेत. म्हणजे कच्चे टोमॅटो भरपूर उपलब्ध होत असतील आणि बर्‍यापैकी गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर हा उद्योेग करायला काही हरकत नाही. या व्यवसायात पाळावयाच्या दोन गोष्टी म्हणजे तयार होणार्‍या पदार्थांची चव आणि तो तयार करतानाचे आरोग्याचे नियम. यावर संबंधित शासकीय अधिकार्‍यांची करडी नजर असते. …

टोमॅटो प्रक्रिया उद्योग .

आणखी वाचा
people near balloons

इवेंट डेकोरेशन व्यवसाय

इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्याच्या व्यवसायाला आज प्रचंड मागणी आहे. साध्या साध्या, अगदी घरगुती कार्यक्रमासाठी सुद्धा आज काल इव्हेंट मॅनेज करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकांना बोलावले जाते. एक तर वेळेची कमतरता शिवाय कार्यक्रम तयारीसाठी द्यावा लागणारा वेळ, अनेकदा जागेची अडचण असल्यास हॉल बुकिंग पासून करावी लागणारी तयारी हे सारे व्याप इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिकांवर सोपविणे अनेक अर्थानी सोयीचे ठरते असा अनुभव येतो व त्यामुळेच या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे. अर्थात या व्यवसायात पैसे भरपूर मिळतात हे खरे असले तरी कामाचा प्रचंड ताण असतो त्यामुळे हा व्यवसाय तसा दगदगीचा आहे. त्यासाठी खूप प्लॅनिंग व नियंत्रण क्षमता आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा या क्षेत्रात काही व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे आणि शक्यतो घरच्या घरी तो मॅनेज करता येत असेल तर अधिक योग्य ठरणार आहे तर तुम्ही तो नक्की करू शकता. फक्त सुरवात करताना संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट घेण्यापेक्षा त्यातील एखाद्या कॅटेगरी पासून करावी. उदाहरण द्यायचे तर तुम्हाला डेकोरेशन मध्ये रुची आहे, त्यात चांगले …

इवेंट डेकोरेशन व्यवसाय .

आणखी वाचा
assorted-color flowers on brown wicker basket

फ्लोरीस्ट व्यवसाय कसा कराल

शतकानुशतके भावना व्यक्त करण्यासाठी फुलांचा वापर जगभर केला जात आहे. त्यामुळे फुले ही कालातीत म्हणजे वेळकाळाचे बंधन नसणारी मानली जातात. लग्नसमारंभ असो. डोहाळजेवण असो, बारसे असो, एखादी घरगुती पार्टी असो, वाढदिवस असो, अॅनिव्हार्सरी असो, व्हेलेंटाईन डे सारखे कोणतेही डे असोत, परीक्षेच्या यशाचा आनंद असो किंवा एखाद्या घरात मृत्यू घडला असेल तर त्या लोकांचे सांत्वन करणे असो, फुले हे काम न बोलता उत्तम पद्धतीने करतात. शिवाय ज्यांना फुले दिली जातात त्यांच्या मनाला आनंद सुद्धा देतात. या मुळेच जगभर फ्लोरल इंडस्ट्री सातत्याने व्यवसाय वाढ नोंदविताना दिसते आहे. या उद्योगात प्रचंड स्पर्धा आहे पण तेवढ्याच संधी सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही घरबसल्या एखादा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर फ्लोरीस्ट व्यवसाय सुरु करण्याचा विचार नक्की करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी विशेष पदवी किंवा प्रशिक्षणाची गरज नाही हे खरे असले तरी तुम्हाला फुलांची मनापासून आवड हवी आणि त्याच्या विविध रचना करता येण्याचे कौशल्य हवे. कोणत्याही व्यवसायाप्रमाणे येथेही भरपूर कष्ट करावे लागतात पण त्याला आवडीची …

फ्लोरीस्ट व्यवसाय कसा कराल .

आणखी वाचा
potato chips in bowl

केळी वेफर्स व्यवसाय

 केळीचे वेफर्स ही एक सतत मागणी असणारी खाद्य वस्तू आहे. असे वेफर्स तयार करण्याचा धंदा चांगला चालतो आणि त्यात फायदाही मोठा होतो. मात्र फायदा मिळवण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे.  १. स्वस्त कच्चा माल २. सुलभ आणि यांत्रिक उत्पादन पद्धती  ३. ग्राहकांच्या मागणीनुसार माल तयार करणे १. कच्चा माल महाराष्ट्रात केळी बर्‍याच प्रमाणात पिकतेे. पूर्वी केळीच्या उत्पादनासाठी ख़ानदेशातला जळगाव जिल्हा विशेष नावाजला गेला होता पण आता जळगावची मक्तेदारी राहिलेली नाही. मराठवाड्यातले  नांदेड, हिंगोली हे जिल्हे आणि प. महाराष्ट्रातले सोलापूर, नाशिक आदि जिल्ह्यातही केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. मी या जिल्ह्यांचा विशेष उल्लेख करीत असलो तरी महाराष्ट्रातल्या इतरही अनेक जिल्ह्यात केळीचे उत्पादन होत आहे आणि वेफर्स तयार करण्याचा उद्योग करण्यास पुरेल एवढे ते आहे.  वेफर्स तयार करण्यास कच्ची केळी लागते. आपण मोठ्या प्रमाणावर वेफर्स तयार करणार असू तर स्वत: शेतात जाऊन शेतकर्‍यांकडून थेटच खरेदी करावी. त्यामुळे मुख्य कच्चा माल फारच माफक दरात मिळतो. व्यापार्‍याकडून खरेदी केल्यास केळी फार महाग मिळतात.  आपल्याला …

केळी वेफर्स व्यवसाय .

आणखी वाचा
assorted food in socks

मिनी दाळ मिल

 भारतातल्या गरीब लोकांना स्वस्तात प्रथिनांचा पुरवठा करण्याची क्षमता असलेले पीक म्हणून दाळीकडे पाहिले जाते. अगदीच दारिद्य्र रेषेच्या खालचे जीवन जगणारा माणूस त्या रेषेच्या वर आला की आधी डाळींची मागणी करायला लागतो. म्हणूनच भारतात डाळींची मागणी सतत वाढत आहे. विशेष म्हणजे भारताच्या सगळ्या राज्यांत, शाकाहारी आणि मांसाहारी लोकही डाळींचे सेवन करीत असतात. त्यातल्या त्यात शाकाहारात डाळ जास्त वापरली जाते. भारतात  अगदीच गरीब लोक डाळींचे सेवन फारसे करीत नाहीत पण त्यांचा डाळींचा वापर जसजसे जीवनमान सुधारत आहे तसतसा वाढत जाणार आहे.  भारतात गहू आणि तांदूळ ही दोन पिके घेतली जातात आणि याच पिकांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत पण त्यांच्या खालोखाल डाळींच्या उत्पादनाचाच क्रमांक लागतो.  मध्य प्रदेशात डाळींचा व्यवसाय सर्वात मोठा आहे. देशातल्या एकूण डाळींपैकी २३ टक्के डाळी एकट्या मध्य प्रदेशात तयार होतात. त्या पाठोपाठ महाराष्ट्र आणि राजस्थानात हा उद्योग मोठा आहे. हा उद्योग अगदी लहान प्रमाणावरही करता येतो आणि कोट्यवधी रुपये गुंतवून मोठ्या प्रमाणावरही करता येतो मात्र आपण शेतकर्‍यांना जोड …

मिनी दाळ मिल .

आणखी वाचा
white strainer

पिठांचा व्यवसाय

मित्रांनो, निरनिराळ्या धान्यांची पिठे विकण्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने मला तुम्हाला व्यवसायाचे एक सूत्र सांगायचे आहे. ते सूत्र असे आहे. “जी वस्तू तयार करणे सोपे असते ती वस्तू विकणे अवघड असते. आणि जी वस्तू तयार करणे अवघड असते ती वस्तू विकणे सोपे असते”. या सूत्राचा अर्थ उलगडून सांगतो. जी वस्तू तयार करणे सोपे असते ती वस्तू अनेक लोक तयार करायला लागतात आणि अनेकांनी उत्पादन सुरू केले की बाजारात तिचा सुळसुळाट होतो. तो एवढा होतो की या वस्तूच्या विक्रीत स्पर्धा वाढते आणि ती विकणे अवघड होऊन बसते. उदाहरणार्थ, लोणची, मसाले, पापड हे तयार करणे काही फार अवघड नसते. त्यामुळे बाजारात अनेक प्रकारचे मसाले आलेले आपण पहात असतो. मग त्यांची विक्री करणे अवघड होते. याउलट खूप कलाकुसर करून तयार होणार्‍या काही वस्तू असतात. त्या तयार करणारे कारागीर कमीच असतात. त्यामुळे त्यांचे उत्पादन अवघड असते आणि अशा वस्तू तयार करणारे काही मोजकेच लोक बाजारात असतात. त्यामुळे त्या तयार करणार्‍या लोकांना विकण्यासाठी काही करावे लागत नाही.  त्यांच्याकडे ग्राहक आपणहून …

पिठांचा व्यवसाय .

आणखी वाचा
person holding white plastic spoon in black and silver steel cup

घरी मेणबत्ती बनविण्याचा फायदेशीर व्यवसाय

काही तरी नवीन उद्योग करायचा विचार आहे किंवा घरबसल्या काहीतरी व्यवसाय सुरु करावा असे वाटत असेल तर बाजारात चांगली मागणी असलेल्या मेणबत्या, ते ही घरच्या घरी आणि फार भांडवल न गुंतवता करण्याचा व्यवसाय तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता. मेणबत्त्या हे उत्पादन नेहमी मागणी असलेले व्यावहारिक उत्पादन म्हणता येतील. यात सुद्धा तुम्ही किती कौशल्य प्राप्त करू शकता आणि खास तुमचा ठसा असलेल्या विविध प्रकारच्या, आकर्षक मेणबत्त्या बनवू शकता त्यावर तुम्ही किती कमाई या व्यवसायातून करू शकाल याचे प्रमाण ठरणार आहे. अर्थात कमाईचे हे प्रमाण केवळ तुमच्या मेणबत्त्या आकर्षक आहेत म्हणून ठरणार नाही तर त्यांचे मार्केटिंग योग्य प्रकारे करणे हाही महत्वाचा भाग आहेच. आज बाजारात अक्षरशः शेकडो प्रकारच्या मेणबत्त्या उपलब्ध आहेत. पारंपारिक मेणबत्त्या आहेत त्याचप्रमाणे डेकोरेटीव्ह म्हणजे सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या, अरोमा थेरपी मध्ये वापरल्या जाणाऱ्या, गिफ्ट देण्यासाठीचे विविध प्रकार सुद्धा बाजारात चांगले खपत आहेत. ज्यांना मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे, ते यातील अनेक प्रकार सहज बनवू शकतात. नवशिके व्यावसायिक सुद्धा …

घरी मेणबत्ती बनविण्याचा फायदेशीर व्यवसाय .

आणखी वाचा
woman leaning on food truck

फूड ट्रक व्यवसाय सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन

शहरांची वाढती लोकसंख्या फूड ट्रक व्यवसायासाठी फायद्याची ठरत असते याचा अनुभव आता भारतात सुद्धा येऊ लागला आहे. भारतात फूड ट्रक किंवा रेस्टॉरंट ऑन व्हील्स म्हणजे फिरती उपहारगृहे चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहेत. त्यामुळे ज्यांना या व्यवसायात उतरण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक चांगली व्यवसाय संधी निर्माण झाली आहे असे नक्की म्हणता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे फूड ट्रकला ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. यामुळेच गेल्या काही वर्षात या व्यवसायाची वाढ वेगाने होताना दिसते आहे. त्याचा थेट परिणाम खाद्यान्न उद्योगात फूड ट्रक व्यवसायाची हिस्सेदारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे. तुम्हाला जर या व्यवसायात उतरण्याची इच्छा असेल तर त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन या लेखातून करण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखातून काय माहिती मिळेल? या लेखातून फूड ट्रक व्यवसाय संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तुम्हाला फूड ट्रक इतिहास आणि व्यवसायाचे व्यूह शास्त्रभारतात फूड ट्रक व्यवसाय सुरु करण्यासाठी १० महत्वाची मार्गदर्शक तत्वेफूड ट्रक साठी आवश्यक स्वयंपाक उपकरणे व आवश्यक कच्चा मालव्यवसाय …

फूड ट्रक व्यवसाय सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन .

आणखी वाचा
clear glass cruet bottle

तेल घाणा व्यवसाय, कोल्ड प्रेस घाणा

केवळ भारतातच नाही तर जगभरातील सर्व देशात आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात, कोणत्या ना कोणत्या तेलाचा वापर केला जातो. आहाराशिवाय अन्य कारणांसाठी सुद्धा तेल वापरले जाते. यंत्रांसाठी वंगण म्हणून, मसाज साठी, औषधे बनविण्यासाठी तसेच साबण, डिटर्जंट उद्योगात सुद्धा तेलाचा वापर केला जातो. वनस्पती पासून मिळणारे आणि प्राण्यांपासून मिळणारी चरबी व त्यापासून काढले जाणारे तेल असे याचे प्रामुख्याने दोन प्रकार मानता येतात. आपण येथे वनस्पतीपासून मिळणाऱ्या तेलाचा विचार करणार आहोत.  आपण सर्वसाधारणपणे जी खाद्य तेले आहारात वापरतो ती गळीत धान्ये, तेलबिया पासून मिळविली जातात. आजकाल आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागृती होत असल्याने लोक खाद्य तेलाची निवड करताना अनेक बाबी विचारात घेऊ लागले आहेत. सर्वसाधारण जीवनमान उंचावले असल्याने महाग असले तरी चांगले तेल घेण्याकडे लोकांची प्रवृत्ती वाढते आहे. अशा तेलांसाठी जादा पैसे मोजण्याची मानसिकता वाढली आहे. यापुढेही चांगल्या प्रकारच्या आणि पोषक तेलाची मागणी वाढती राहणार आहे हे लक्षात घेऊन छोट्या स्वरुपात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना तेल घाण्याचा व्यवसाय विचारात …

तेल घाणा व्यवसाय, कोल्ड प्रेस घाणा .

आणखी वाचा

मसाले उद्योग कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा निरंतर मागणी असलेला उद्योग

  थोडी पार्श्‍वभूमी   हा कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. तो कोणालाही करता येतो. अगदी घरगुती उद्योग म्हणूनही तो करता येतो आणि मोठा उद्योग म्हणूनही करता येतो. मसाल्याशिवाय जेवण बेचव वाटते त्यामुळे ती सर्वांची गरज झाली आहे म्हणून हॉटेल्स मधून मसाल्यांना चांगली मागणी असते. मसाले तयार करण्यासाठी अनेक प्रकारचा कच्चा माल वापरला जात असतो आणि त्यांचे मसाल्यातले प्रमाण कमी जास्त करून अनेक प्रकारचे मसाले तयार करता येतात. या व्यवसायात विविधतेला मोठा वाव आहे. मसाले तयार करण्याचे कौशल्य भारतीयांनी पिढ्यान्पिढ्या जतन केलेले असल्यामुळे कोणताही भारतीय उद्योजक मसाल्याच्या उद्योगात यशस्वी होऊ शकतो .   भारतात हळद, धने, जिरे, मिरे, बडीशेप यांचा मसाले म्हणून चांगलाच वापर होत असतो. आणि त्यातले बहुतेक प्रकार भारतातच पिकतात. त्यामुळे तो मसाले तयार करणारा सर्वात मोठा देश मानला जातो. जगात वापरल्या जाणार्‍या मसाल्यांपैकी ७५ टक्के मसाले एकट्या भारतात तयार होतात ते अमेरिका, चीन, व्हिएतनाम, मलेशिया, बांगला देश, श्रीलंका या देशात प्रामुख्याने पाठवले जातात.    भारतात मसाले तयार करणारांना जगाचें …

मसाले उद्योग कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा निरंतर मागणी असलेला उद्योग .

आणखी वाचा
मी आत्मनिर्भर बनणार

माहिती मिळविण्यासाठी सबस्क्राइब करा

प्रत्येक आठवड्यला नवीन माहिती 

closeup photo of silver iMac