सबस्क्रिप्शन बॉक्स- एक अनोखा व्यवसाय

सबस्क्रायबर म्हणजे एखाद्या योजनेचे सदस्य होणे असे थोडक्यात म्हणता येईल. आपण वर्तमानपत्रे, मासिके ,टीव्ही चॅनल्स, पुस्तकाची लायब्ररी, मोबाईल साठी ठरविक सेवापुरवठादार, अशा अनेक गोष्टींसाठी वर्गणी भरून त्यांचे सभासद होतो. म्हणजे आपण त्या संबंधित सेवा देणाऱ्याला सबस्क्राइब करतो. या सदस्यत्व संकल्पनेचा वापर आपण व्यवसायासाठी करू शकतो आणि त्याचे नाव आहे “सबस्क्रिप्शन बॉक्स” किंवा सदस्यत्व पेटी.

सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की ऑनलाईनवर होऊ शकणारा हा व्यवसाय परदेशात त्यातही पाश्चिमात्य देशात खूप लोकप्रिय बनला आहे आणि अतिशय वेगाने विकास करत आहे. भारतात मात्र तो अजून म्हणावा त्या प्रमाणात रुळलेला नाही. मात्र आज सर्व जग ऑनलाईन मुळे जोडले गेले असताना आणि भारतात ऑनलाईन युजर्सची संख्या लक्षणीय वेगाने वाढली असल्याने या व्यवसायात मोठ्या संधी नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहेत.

ई कॉमर्स आजच्या ग्राहकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनू पाहतो आहे. आजकाल ग्राहक ट्रेंडी किंवा काही खास वस्तू खरेदीसाठी सबस्क्रिप्शन बॉक्स हा चांगला पर्याय मानत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः फॅशन, लाईफस्टाईल, सौंदर्य प्रसाधने या क्षेत्रात सध्या सबस्क्रिप्शन बॉक्स विशेष लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे ज्यांना काही छोटा मोठा व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सबस्क्रिप्शन बॉक्स हा नवीन, आकर्षक आणि चांगला फायदा देणारा व्यवसाय होऊ शकतो.

या व्यवसायामुळे तुम्ही तुमची विक्री उत्पादने लोकांनी खरेदी करावीत यासाठी त्यांना उद्युक्त करू शकता. अर्थात त्यासाठी ब्रांड अवेअरनेस हवा. हा व्यवसाय कशा प्रकारे सुरु करता येतो याचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

सबस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे नेमके काय     

ग्राहकाला खरेदीचा एक चांगला अनुभव देण्यासाठी दर महिन्यासाठी, तीन महिन्यांसाठी, सहा महिने अथवा वर्षासाठी एक ठराविक रक्कम घेऊन सभासद म्हणजे सबस्क्रायबर बनवून घ्यायचे आणि त्या किमतीत त्यांना त्या काळासाठी काही उत्तम वस्तू घरपोच द्यायच्या अशी ही सर्वसाधारण संकल्पना आहे. यात महिन्याच्या मुदतीसाठी ग्राहक समजा सदस्य झाला असेल तर त्याला नवीन उत्पादने वापरून पाहण्याची, नवीन ब्रांड जास्त पैसे खर्च न करताही अनुभवता येण्याची संधी मिळते. रिटेलर्सना त्यातून स्थिर आर्थिक मॉडेल म्हणजे दर महिना ठराविक पैसे नक्कीच मिळणार असतात.

आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या ग्राहकांनी आपले सदस्यत्व घेतले त्यांना कोणत्या वस्तू आपण पुरवू शकतो. तर त्याचे उत्तर कोणत्याही वस्तू असेच आहे. वारंवार खरेदी केली जाणारी रोजच्या वापरातील उत्पादने म्हणजे सौंदर्य प्रसाधने, फॅशन, हस्तकौशल्याच्या वस्तू, ज्या ग्राहकांकडे पाळीव प्राणी आहेत, त्यांना लागणाऱ्या वस्तू, पुस्तके, विविध प्रकारचे साबण, लहान मुलांसाठी खेळणी, नवजात बालकासाठी बदलत्या मापानुसार वेळोवेळी घ्यावे लागणारे कपडे, चॉकलेटस, विविध खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू अशी ही प्रचंड मोठी यादी आहे. ऑनलाईन किंवा ई कॉमर्स मध्ये विविध कॅटेगरी मध्ये आपण वस्तू खरेदी करत असतो. याचा वापर करून सबस्क्रायबर बेस्ड हा व्यवसाय सुरु करता येतो. फक्त त्यासाठी तुम्ही नक्की कोणत्या आणि किती प्रकारच्या वस्तू पुरविणार याची निवड योग्य प्रकारे करावी लागते.

या व्यवसायाचे काही खास फिचर्स  

  • फिजिकल आयटेम म्हणजे वैयक्तिक गरजेच्या वस्तू
  • रिकरिंग सबस्क्रीपशन म्हणजे वारंवार लागणारया वस्तू
  • काही सरप्राईज वस्तू
  • क्युरेटेड कंटेंट सबस्क्रिप्शन
  • खरेदीमध्ये सेव्हिंग होत असल्याचे अनुभवण्याची संधी
  • प्रत्यक्ष दिसणारे प्रेझेंटेशन आणि पॅकेजिंग

सबस्क्रिप्शन उत्पादने निवड आणि खरेदी कशी करावी

तुम्हाला सबस्क्रिप्शन बॉक्स व्यवसाय यशस्वीरित्या सुरु ठेवायचा असेल तर उच्च दर्जाची उत्पादने कशी मिळवयाची याची माहिती असणे आवश्यक आहे. आजकाल ई कॉमर्स मुळे हा फार अवघड प्रश्न राहिलेला नाही. कारण त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे

  • गुगल सर्च इंजिनचा वापर
  • स्थानिक किरकोळ विक्री करणारी दुकाने
  • ई कॉमर्स वेबसाईटस
  • ठोक विक्रेते (होलसेलर्स)
  • Etsy
  • अलीबाबा
  • अन्य व्हेंडर्स (विक्रेते)बरोबर संपर्क

या व्यवसायाची सुरवात करण्यापूर्वी तुम्ही मोफत मिळणारी उत्पादने देणार आहात का खरेदी करून ग्राहकांना देणार आहात याचा निर्णय करायला हवा. म्हणजे त्यानुसार वस्तूंची निवड करता येते आणि नफा मिळविता येतो. शिवाय ग्राहक समाधानी होतो.

सबस्क्रिप्शन बॉक्स साठी किती खर्च येऊ शकतो

आपण देणार असलेल्या सबस्क्रिप्शन बॉक्स साठी ठराविक खर्च किंवा ठराविक किमतीच्या वस्तू असे बंधन नसलेले चांगले. व्यावसायच्या सुरवातीला प्रत्येक बॉक्स किमान ७०० ते ३००० रुपये या सर्वसाधारण रेंज मध्ये ठेवावी. या रेंज मध्ये तुम्ही कोणता ग्राहक वर्ग टार्गेट करू शकता हे प्रथम स्पष्ट व्हायला हवे. कारण त्यानुसार वस्तू कमी किमतीच्या की जास्त किमतीच्या द्यायच्या, त्यातून नफा किती मिळणार हे ठरणार आहे. किंमत कमी न करताही नफा मिळायला हवा. जे विक्रेते मोफत बॉक्स देतात त्यांचा वापर या कामी केला तर हे सहज परवडू शकते. याचा उपयोग आपले क्लायंट वाढविण्यासाठी करून घेता येतो. हे एकदा साध्य झाले किं तुम्ही पेड सर्विस सुरु करू शकता.

ही सेवा सुरु करण्याचा काही पायऱ्या अशा:-

सबस्क्रिप्शन बॉक्स कंपनी कशी सुरु करायची, त्याची तयारी कशी करायची याची थोडी कल्पना येथे देत आहोत

१)युनिक म्हणजे अनन्यसाधारण कल्पना

व्यवसाय सुरु करताना आपल्या आवडी कोणत्या याचे भान सर्वप्रथम हवे. त्या लक्षात घेऊन बाजाराचा यथासांग अंदाज घ्यायला हवा, त्यासाठी बाजाराचे काळजीपूर्वक सर्व्हेक्षण करायला हवे. या क्षेत्रात स्पर्धा किती आहे, नक्की कोणता ग्राहक वर्ग आपण टार्गेट करायचा आहे, सबस्क्रिप्शन बॉक्सची किमत ठरविणे व त्या क्षेत्रात वाढीची संधी किती आहे याचा अभ्यास केला जायला हवा.

२) सबस्क्रिप्शन बॉक्ससाठी योग्य दर ठरविणे

यासाठी सखोल निरीक्षण हवे. सबस्क्रिप्शन बॉक्सचा दर अव्वाच्या सव्वा न ठेवता ग्राहकांना रास्त दारात त्या देऊन त्यातूनही नफा कसा आणि किती मिळू शकेल याची माहिती करून घ्यायला हवी. तुम्ही सबस्क्रिप्शन बॉक्सचे दर जास्त ठेवले तर सबस्क्रायबर् तुमच्या प्रतिस्पर्ध्याकडे जाउ शकतो याचे भान ठेवायला हवे.

३)नमुना बॉक्स तयार करणे

सर्वप्रथम एक नमुना बॉक्स तयार करायला हवी. ही बॉक्स ग्राहकापर्यंत पोहोचेल तेव्हा त्याचे पॅकेजिंग किती व्यवस्थित असेल याचा अंदाज घेणे गरजेचे. त्यानुसार पॅकेजिंग साठी कोणते मटेरियल वापरायचे, बॉक्सचा आकार केवढा ठेवायचा, कोणते पॅकेजिंग डिझाईन ग्राहकाच्या पसंतीस अधिक उतरेल याचा अंदाज करता येतो.

४)वेबसाईट बनवा

सबस्क्रिप्शन बॉक्स व्यवसाय सुरु करण्यातील ही सर्वात महत्वाची पायरी म्हणता येईल. यासाठी तुम्ही जी वेबसाईट बनविणार ती युजर फ्रेंडली हवी. त्यात तुमची कंपनी, त्या संदर्भातला मजकूर, फोटो, तुमच्या सोशल मिडिया चॅनल लिंक्स, सहज सोपी पारदर्शी खरेदी, चेक आउट करण्याची प्रक्रिया व सहज शोधता येईल असे नेव्हिगेशन स्ट्रक्चर असेल हे पहावे. जेथे ग्राहक साईन अप करू शकेल अशी लिंक नक्की समाविष्ट हवी. याचा वापर तुम्ही ई मेल न्यूज लेटर साठी करू शकता.

५)ई-स्टोअर

ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ?

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

६)विपणन (मार्केटिंग )

वरील प्राथमिक तयारी पूर्ण झाली की विपणन म्हणजे मार्केटिंगला सुरवात करा. त्यासाठी ब्लॉगिंग, सोशल मीडियाचा वापर करता येतोच पण पेड जाहिरात मोहीम, ई मेल कलेक्टींग, कंपनीचे प्रमोशन किंवा प्रसिद्धी करण्यासाठी योग्य व्यासपीठे, फोरम, ऑनलाईन कम्युनिटी अशा शक्य आहेत त्या सर्व साधनांचा वापर करून घ्यायला हवा. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे लाँचिंग करण्यापूर्वी पुरेसा बोलबाला, चर्चा होईल याची खबरदारी घेणे फायद्याचे ठरते. एकदा का तुमचे शिपिंग म्हणजे सबस्क्रिप्शन बॉक्स डिलीव्हरी सुरु झाली की यशाचा समतोल राखला जातो.

७)ऑर्डर घेणे व पूर्तता करणे

तुम्ही तुमच्या सबस्क्रिप्शन बॉक्स साठी सबस्क्रायबरची ऑर्डर मिळविली तरी ऑर्डर हाताळताना काही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी तुम्ही तुमच्या वेबसाईटची तपासणी काळजीपूर्वक करून घेणे आवश्यक आहे याचे भान ठेवा. सबस्क्रायबरची ऑर्डर तुम्ही स्वतःच पूर्ण करणार असाल तर शिस्तबद्ध रीतीने, तत्परतेने, वेळेत करायला हवी. डिलीव्हरीसाठी बाहेरची मदत (कुरियर सेवा) घेणार असाल तर त्यासाठी भागीदार हवा. ही सेवा सहज परवडेल अश्या कमी दरात देणारा पण विश्वासार्ह भागीदार मिळविणे आवश्यक आहे.

८)शिपिंग

तुम्ही जेव्हा पहिली शिपमेंट करता तो लाँच डे गोंधळाचा, गडबडीचा असू शकतो. पण त्यातही परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असताना ज्या ग्राहकांचे चौकशी साठी फोन येतील त्यांना त्वरित उत्तर देणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या सर्व प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिली जात आहेत याची काळजी घ्यावी. शिपिंगबाबत काही अडचण वाटली तर कुणाचीही वाट न पाहता त्यावर तोडगा काढला जायला हवा.

)सबस्क्रायबर बेस वाढता हवा

एकदा का तुमच्या सबस्क्रिप्शन बॉक्स व्यवसायाचे यशस्वी लाँचिंग झाले की ई कॉमर्सवर तुमचे टार्गेट ठरविताना काही मुद्दे विचारात घेणे फायद्याचे आहे. आपल्या सबस्क्रिप्शन बॉक्स व्यवसायाचे लाँचिंग यशस्वी झाले म्हणजे आता आपला व्यवसाय जोरदार चालणारच अशा भरवश्यावर बसून उपयोग नाही. या व्यवसायातून आपण किती कमाई करणार याचा विचार सतत करायला हवा. त्यासाठी सातत्याने विपणन म्हणजे मार्केटिंग, प्रमोशन सुरूच राहतील याबाबत खबरदारी हवी. इमेल कलेक्टींग, प्रोडक्ट मधील नाविन्य कायम ठेवायला हवे. एकदा का तुम्ही कस्टमर बेसवर रँप अप झालात की त्यासंदर्भातले आणखी काही कार्यक्रम हाती घ्यायला हवेत. याचे उदाहरण असे देता येईल, की तुम्ही तुमचे सध्याचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या शिफारसीवरून त्यांचे मित्र, नातेवाईक यांनीही साईन अप करावे म्हणून काही इन्सेन्टिव्ह देऊ शकता.

0) सबस्क्रिप्शन बॉक्ससाठी मार्केट कसे ठरवावे

तुमचा सबस्क्रिप्शन बॉक्स व्यवसाय यशस्वी व्हावा म्हणून ई कॉमर्सवर तुमचे टार्गेट ठरविताना काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. त्यातील काही अशा

  • अॅफिलीएट मार्केटिंग प्रोग्राम– अॅफीलीएट मार्केट म्हणजे जे विक्रेते तुमच्या उत्पादनाची / वेबसाईटची (येथे सबस्क्रिप्शन बॉक्स) शिफारस त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना करतील त्यांना प्रत्येक विक्रीमागे काही कमिशन देणे. उदाहरण एखाद्याने अशी शिफारस केल्याने तुमचा १ हजार रुपयाचा माल खपला तर संबंधित विक्रेत्याला तुम्ही १० टक्के म्हणजे १०० रुपये कमिशन म्हणून देणे. याची मदत तुमचे सबस्क्रायबर् वाढण्यासाठी होऊ शकते. शिवाय तुमच्या व्यवसायाची प्रसिद्धी होत राहते.
  • सोशल मीडियावर प्रभाव असणाऱ्या बरोबर काम – हा दुसराही एक मार्ग विचारात घेण्यासारखा आहे. तुमच्या व्यवसायाला अधिक संख्येने ग्राहक किंवा प्रेक्षक मिळावेत यासाठी तुम्ही सोशल मीडियावर प्रभाव असलेल्या व्यक्तींची मदत घेऊ शकता. त्यासाठी इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर ज्यांना मोठ्या संखेने फॉलोअर आहेत, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून त्यांना तुमच्या व्यवसायासंबधी माहिती द्यायला सांगू शकता. कदाचित त्या व्यक्ती यासाठी काही पैसे घेतील पण त्याचा फायदा नक्की होऊ शकतो.
  • ब्लॉगर्स बरोबर संपर्क –तुमच्या सबस्क्रिप्शन बॉक्स व्यवसायासाठी ग्राहक वेगाने आणि अधिक जास्त खर्च न करताही वाढविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. ज्यांच्या ब्लॉग साठी प्रचंड किंवा चांगला ट्रॅफिक आहे त्या ब्लॉगर्सना तुम्ही टार्गेट करू शकता. तुमच्या व्यवसाय संदर्भातील मजकूर त्यांना ई मेल करणे आणि तुम्हाला त्या ब्लॉगर्सना सबस्क्रिप्शन बॉक्स देणे आवडेल असे सूचित करून त्याबदली तुमच्या सबस्क्रिप्शन बॉक्स संदर्भात रिव्ह्यू त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहावेत यासाठी बोलणी करू शकता. यामुळे मोठ्या प्रेक्षक वर्गासमोर तुम्ही सहज पोहोचू शकाल.
  • सध्याच्या सबस्क्रायबर्सचा उपयोग – तुमच्या व्यवसायासंदर्भात जनमानसात अधिक जागृती व्हावी यासाठी तुमच्या सध्या असलेल्या सबस्क्रायबर्सचा उपयोग करून घेता येतो. त्यासाठी त्यांना काही सवलती, भेट वस्तू किंवा एकाद्या महिन्याची वर्गणी मोफत अश्या योजना राबविता येतात. ते त्याबदल्यात तुमची प्रसिद्धी त्यांच्या परिचितांमध्ये करू शकतात.
  • सोशल मिडिया कम्युनिटीचा भाग बनणे– व्यवसाय वाढीचा हा आणखी एक मार्ग आहे. त्यासाठी विविध सोशल मिडिया कम्युनिटीचा हिस्सा बनायला हवे. त्यात फोरम पासून फेसबुक ग्रुप असे अनेक प्रकार वापरता येतात. या ग्रुपवर तुम्ही तुमच्या व्यवसायाविषयी बोलू शकता, संवाद साधू शकता, माहिती देऊ शकता. या ग्रुपना व्यस्त ठेवेल असा मजकूर वेळोवेळी देऊ शकता. यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढतील आणि बिझिनेसचे मार्केट सुद्धा वाढेल.

बिझिनेस सुरु करण्याच्या योग्य पायऱ्या

आपला व्यवसाय निर्माण करणे आणि विकसित करणे यासाठी पूर्ण ताकद लावावी लागते. पाहिले शिपिंग, मंथली बेस्ड सबस्क्रिप्शन बॉक्स सबस्क्रायबर मिळाले ही समाधानाची भावना तुम्हाला पुढची प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त असते. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सतत प्रसिद्धी, प्रमोशन, पुढच्या ब्रांडचे ब्लॉगिंग सातत्याने होते आहे याची काळजी घेतली तर तुमच्या ब्रांडला अधिक एक्स्पोझर मिळते. त्यासाठी ईमेल न्यूज लेटर्स पाठविणे, जाहिरात मोहिमा राबविणे सातत्याने सुरु ठेवावे लागते.

सबस्क्रिप्शन बॉक्स साठी काही कल्पना

बुक्स सबस्क्रिप्शन बॉक्स- चांगली दर्जेदार पुस्तके विकत घेऊन वाचण्याची आणि संग्रही ठेवण्याची अनेकांना आवड असते. असे बुक क्लब जगभर आहेत. तुम्हालाही पुस्तकात विशेष रुची असेल तर बुक्स सबस्क्रिप्शन बॉक्स व्यवसाय तुम्ही करू शकता. यात सवलतीत पुस्तके खरेदी करून लेखकाच्या सही सह, किंवा लेखकाच्या पत्रासह, पोस्टर सह देणे अशी कल्पना वापरता येते. तरुण वर्ग, प्रौढ वर्ग याच्यासाठी विविध प्रकार म्हणजे रहस्य कथा, कादंबऱ्या, विज्ञान फिक्शन अशी खूप मोठी कॅटेगरी ठरविता येते.

विणकाम क्रोशा, क्रॉस स्टिच बॉक्स- महिला वर्गासाठी त्यातही ज्यांना विणकाम, क्रोशा, क्रॉस स्टिच आवडते त्याच्यासाठी असे बॉक्स देणे हा आणखी एक प्रकार. यात वैविध्य आणण्यासाठी नवीन नमुने, त्यासाठी लागणारे साहित्य देता येते. हे नमुने वेबसाईट, व्हिडीओ वरून मिळू शकतात.

लहान मुलांसाठी पुस्तके, क्राफ्ट साहित्य – ज्या घरात लहान मुले आहेत त्यांच्यासाठी असे बॉक्स उपयुक्त ठरतात. त्यात विज्ञान प्रयोगाचे साहित्य, स्टेशनरी, पेन, पेन्सिली, कॅलेंडर, वह्या, पुस्तके खेळणी देता येतात. गृहिणींसाठी काही खास रेसिपी देऊन त्यासाठी लागणारे साहित्य देणे ही सबस्क्रिप्शन बॉक्सचा एक लोकप्रिय प्रकार आहे.

याशिवाय लोणची, कुकीज, बेकरी उत्पादने, टिकाऊ खाद्यपदार्थ, हेल्दी फूड प्रकार, चॉकलेटस, विविध प्रकारचे केक्स, जॅम्स, जेलीज, फॅशन अॅक्सेसरीज, मेकअप साहित्य, ज्युवेलरी, पाळीव प्राणी असतील तर त्यांच्यासाठी लागणारे सामान, पुरुष वर्गासाठी नित्याचे लागणारे डीओडोरंट, शेविंग क्रीम्स, सौंदर्य प्रसाधने, विविध प्रकारचे साबण, लग्झरी बॅग्स, टी शर्ट्स, सॉक्स, खेळाचे साहित्य अश्या अनेक वस्तू सबस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सामील करता येतात.

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेअर करा

This post was last modified on November 26, 2020 3:02 AM

Share
Tags: Rcontent

Recent Posts

कोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय

स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…

2 years ago

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा

तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…

2 years ago

प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…

4 years ago

घरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग

व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…

4 years ago

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती

आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…

4 years ago

कमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग

माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…

4 years ago