ऑनलाइन-व्यवसाय

Shopify – ई – कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग

ई -कॉमर्स क्षेत्रात एखादा व्यवसाय सुरु करण्याची तुमची प्रबळ ईच्छा आहे का ? हो…अनेक दिवसांपासून याच गोष्टीचा विचार डोक्यात सुरु आहे पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नाहीये असे काहीसे तुमचे झाले असेल तर काळजी करू नका कारण तुम्हाला एकट्यालाच असे वाटते असे नाही तर ७५% हून अधिक लोक सध्या याचाच विचार करत आहेत. Shopify हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही… मग ई-कॉमर्स वेबसाईट काय असते किंवा ती कशी बनवता येते याची काही तुम्हाला कल्पना आहे का ? हो..थोडीफार माहिती आहे. मग Shopify हे दुसरे तिसरे काही नसून ई-कॉमर्स वेबसाईट बनविण्याला उपलब्ध असलेला एक उत्तम पर्याय आहे. पण तुम्ही म्हणाल स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट पेक्षा Shopify कसे काय उजवे ठरेल ? तर त्याला अनेक कारणे आहेत जी आम्ही या लेखात सविस्तरपणे मांडली आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे का Shopify वापरायचे आहे हे स्पष्ट होईल. पण तत्पूर्वी Google प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन व्यवसायाशी निगडित माहिती मिळवणाऱ्यांची आकडेवारी एवढी प्रचंड का वाढली ते पाहू.

            जगभर पसरलेल्या कोरोना महामारीने आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवली आणि ती म्हणजे शारीरिक आणि आर्थिक स्थैर्य खूप महत्वाचे आहे. फक्त नोकरीवर किंवा एकाच व्यवसायावर अवलंबून आजच्या या स्पर्धात्मक युगात आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे तितकेसे सोपे नाही याबद्दल कोणाचेच दुमत नसावे आणि म्हणूनच अनेकजण आज अतिरिक्त कमाईची साधने शोधत आहेत. ऑनलाईन क्षेत्राचा जगभर वाढत असलेला प्रसार अनेक लोकांसाठी संधीची नवनवीन दारे उघडत आहे आणि त्यातीलच एक खात्रीशीर संधी म्हणजे स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय. ई-कॉमर्स इंडस्ट्रीला आम्ही एवढे महत्व का देत आहोत यासाठी खालील आकडेवारी पहा:

Shopify – ई - कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग 7

(source: https://www.ibef.org/industry/ecommerce/infographic)

            वरील आकडेवारी वरून तुम्हाला नक्कीच कळले असेल की येणाऱ्या काळात ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यवसायांना चांगलीच मागणी राहणार आहे. मग करताय ना सुरु तुमचा ई -कॉमर्स व्यवसाय सुरु? हो, नक्कीच..पण यासाठी नक्की काय कराव लागत याच ज्ञान किंवा खात्रीशीर माहिती कोण देणार असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का ? काळजी करू नका, आम्ही आहोत ना. ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ? तर हे पहा Shopify चे फायदे:

  • ई-स्टोअर सुरु करण्याचा सर्वात स्वस्त आणि उपयुक्त मार्ग
  • कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही
  • तुम्हाला पाहिजे तसे तुमचे ई-स्टोअर प्रस्थापित करण्यासाठी अनेक पर्याय व Customize Themes ची उपलब्धता
  • नवीन उत्पादने अद्ययावत करणे एकदम सोपे
  • तुमचे सेल्स आणि मार्केटिंगशी निगडित सुधार किंवा वाढ करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध
  • स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट पेक्षाही जलद वेग आणि SEO चे उत्तम व्यवस्थापन
  • ड्रॉपशिपिंग आणि प्रिंट-ऑन-डिमांडसाठी लागणाऱ्या सर्व आधुनिक पर्यायांची उपलब्धता
  • गुगल शॉपिंगच्या (Google Merchant Store) पॅनेलमध्ये तुमच्या ई-स्टोअर ला प्रदर्शित करणे Shopify मुळे खूप सोपे
  • तुमच्या ई-स्टोअरशी निगडित सर्व आकडेवारी व विविध रिपोर्ट्सचे वेळोवेळी योग्य संकलन
  • कोणत्याही तांत्रिक समस्येचे निराकरण करण्यासाठी Shopify ची २४/७ मदतनीस टीम उपलब्ध

काय मग, येतय ना लक्षात Shopify जगभर का प्रसिद्ध आहे ते…कोणतीही व्यक्ती तांत्रिक गोष्टींत न अडकता स्वतःचा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचे आपले स्वप्न Shopify चा वापर करून नक्कीच साकार करू शकते.

आमचा हा संपूर्ण लेख वाचा कारण यातूनच तुमच्या ‘Shopify किंवा स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट’ या शंकेचे योग्य निरसन होईल. ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अश्याच प्रकारच्या अनेक नवनवीन संधीचे सविस्तर लेख आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन उद्योगधंद्याची संपूर्ण माहिती मिळवा.

चला तर मग पाहू तुमचा ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्यासाठी ई – कॉमर्स वेबसाईट पेक्षा Shopify ची निवड का करावी?

Table of Content:

Shopify म्हणजे काय?

ई-कॉमर्स वेबसाईट बनविणे कोणासाठी सोपे आहे?

तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता

Templates ची उपलब्धता

ई -स्टोअरचे व्यवस्थापन

Content चे व्यवस्थापन

SEO चे व्यवस्थापन

मोबाईल प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध टूल्स

तुमच्या व्यवसायाचे मोजमाप (Analytics)

संपूर्ण व्यवस्थापन आणि सुरक्षा

ड्रॉपशिपिंग आणि प्रिंट-ऑन-डिमांडसाठी उपलब्ध सुविधा

Google शॉपिंग सोबत इंटिग्रेट करण्याचे पर्याय

तांत्रिक किंवा इतर गोष्टींसाठी लागणारी मदत

ई-कॉमर्स वेबसाईट आणि Shopify साठी लागणारा खर्च

  • Shopify म्हणजे काय?
Shopify – ई - कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग 8

(source – https://www.shopify.in/)

ज्या व्यावसायिकांना किंवा नवउद्योजकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले ई-स्टोअर प्रस्थापित करायचे आहे खास त्यांच्यासाठी बनविलेले एक वेब अँप्लिकेशन म्हणजेच Shopify. कोणत्याही तांत्रिक किंवा डिझायनिंगच्या ज्ञानासहित कोणत्याही व्यक्तीला आपले ई-स्टोअर सुरु करता यायला हवे ही Shopify च्या स्थापनेमागची मूळ संकल्पना आहे, पण याचा अर्थ असा नाही की जे तांत्रिक बाबींमध्ये निपुण आहेत त्यांनी हा प्लॅटफॉर्म वापरू नये. अशा तंत्रकुशल लोकांसाठी तर हा प्लॅटफॉर्म वापरणे अजूनच सोपे होऊन जाते कारण याद्वारे तुम्ही HTML आणि CSS मध्ये हवे तसे बदल करून तुमच्या सोयीनुसार तुमचे ई-स्टोअर लाँच करू शकता.

Shopify वर तुमचे ई-स्टोअर सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणतेही Hosting (ही टर्म तुम्हाला नक्कीच माहिती असेल) खरेदी करावे लागत नाही कारण तुमचे ई- स्टोअर हे Shopify च्या सर्व्हर वरती होस्ट केले जाते. Shopify हे एक SaaS प्रॉडक्ट आहे म्हणजेच कोणतेही सॉफ्टवेअर खरेदी न करता तुम्ही त्याचा वापर करत असता आणि त्याबदल्यात तुम्हाला काही फी दयावी लागते जी एक स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट बनविण्यापेक्षा नक्कीच कमी आहे. कसे ते आपण शेवटी पाहूच पण तत्पूर्वी खालील प्रत्येक मुद्द्याद्वारे आम्ही तुम्हाला ‘Shopify हा बेस्ट पर्याय का आहे’ हे समजविण्याचा प्रयत्न केला आहे.

वेगवेगळ्या उत्पादनांसहित अनेक ई-स्टोअर्स Shopify द्वारे उत्तम कमाई करत आहेतच पण त्याच जोडीला अनेक व्यावसायिक सुद्धा आपली स्वतःची उत्पादने स्वतंत्र वेबसाईट बनवून त्याद्वारे विकण्यापेक्षा Shopify ला जास्त प्राधान्य देत आहे. काही वेगळ्या आणि यशस्वी होत असलेल्या मोजक्या व्यवसायांची यादी खास तुमच्या माहितीसाठी इथे देत आहोत.

सोप मेकिंगबेकरी व्यवसायहोम-मेड चॉकलेट
कॅण्डल मेकिंगफॅशन डिझायनिंगबॉक्स सब्स्क्रिपशन
ड्रॉप शिपिंगकेळ्याचे वेफर्सप्रिंट-ऑन-डिमांड
फ्लोरिस्ट ऑनलाईन फ्लोरिस्टऑनलाईन केक
स्नॅक्स व्यवसायपाळीव प्राण्यांचे दुकान बटाटा वेफर्स
गिफ्ट बास्केटहॅन्ड मेड गुडस

यासारखेच अनेक व्यवसाय आज Shopify वर उत्तमरीत्या कार्यरत आहेत. कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाला ई-स्टोअर बनविण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व सोयी Shopify उपलब्ध करून देते आणि तेही परवडेल अशा किंमतीत.

  • ई-कॉमर्स वेबसाईट बनविणे कोणासाठी सोपे आहे?

तुमच्यापैकी खूप लोकांना असे वाटत असेल की आपला ई-कॉमर्स व्यवसाय हा आपल्या स्वतंत्र वेबसाईटद्वारे सुरु करणे सोपे जाईल तर मग खालील गोष्टीत तुम्ही निपुण आहात का ते तपासा:

  • वेब डिझायनिंग व त्यांच्याशी निगडित बाबींचे तुम्हाला चांगले ज्ञान आहे
  • तुम्हाला वेब डेव्हलपमेंट मध्ये रस असून याचे तांत्रिक ज्ञान तुमच्याकडे आहे
  • वरील दोन्ही गोष्टी नसून सुद्धा एखादा वेब डेव्हलपर निवडून त्याची फी (किमान १५ ते २५ हजार) देण्याची तुमची आर्थिक कुवत आहे.

काय मग, कुठे मोजताय स्वतःला? वरील तीनही गोष्टीत जर तुम्ही बसत नसाल तर मग स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करण्याचा अट्टहास सोडा आणि Shopify जो की रेडिमेड ई-स्टोअर सुरु करायचा उत्तम पर्याय आहे त्याचा अवलंब करा.

अजूनही पटत नाहीये का ? काही हरकत नाही, आपण अजून खोलात याची चर्चा करू. काही तांत्रिक गोष्टींचा विचार करता Shopify कसे फायद्याचे ठरू शकते ते आपण यापुढे पाहू.

  • तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता:

वर्ड-प्रेस या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपली वेबसाईट किंवा ब्लॉग बनविणाऱ्यांची संख्या निश्चितच Shopify पेक्षा जास्त आहे पण तरीही Shopify हे ई-कॉमर्स क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे आणि म्हणूनच आज जगभरात ८ लाखांहून अधिक लोकांनी आपले ई-स्टोअर Shopify च्या माध्यमातून सुरु केले आणि याचे एक मुख्य कारण म्हणजे तांत्रिक ज्ञानाची नसलेली आवश्यकता. कोणतीही ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करण्यासाठी तुम्हाला खालील तांत्रिक गोष्टींचे ज्ञान असणे महत्वाचे आहे:

  • डोमेन व होस्टिंग काय असते याची माहिती असणे
  • वेगवेगळ्या Coding भाषांचे ज्ञान अवगत असणे
  • वेबसाईट बनविण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची माहिती असणे (जसे की HTML किंवा CSS)
  • वेबसाईट सुरु करण्यापासून ते ती पब्लिश करण्यापर्यंतची संपूर्ण प्रकिया माहिती असणे
  • ई-कॉमर्स वेबसाईटसाठी लागणारी इतर तांत्रिक माहिती (Payment Gateway, Catalogue Updating)
  • वेबसाईटवर जर काही तांत्रिक समस्या दिसून आल्या तर त्यांचा निपटारा करण्याचे कसब
  • वेळोवेळी वेबसाईटला SEO मानांकनानुसार अद्ययावत कसे करावे याची माहिती असणे

अरे बापरे ही तर बरीच मोठी यादी आहे की… मग तुम्हाला काय वाटले डोमेन आणि होस्टिंग घेतले म्हणजे झाली तुमची वेबसाईट सुरु, तर मित्रांनो ते एवढे सोप्प नाहीये. मग सोपं काय आहे तर आपली ई-स्टोअरची जबादारी Shopify ला देणे आणि आपला व्यवसाय कसा वाढविता येईल याकडे लक्ष देणे.

  • Templates ची उपलब्धता:
  • तुम्ही जर खरेदीला गेला तर कोणती दुकाने तुमचे लक्ष खेचून घेतात? दुकानाचे नाव, बाह्य रंगसंगती, उत्पादनांची ठेवणी, विशेष ऑफर्स आणि नवीन वाटेल असे दुकान तुम्हाला आकर्षित करते. अगदी तसेच नियम ऑनलाईन प्लॅटफॉर्मला सुद्धा लागू होतात. ई-स्टोअर हे जरी खरेखुरे माती विटांचे स्टोअर नसले तरी त्याच्याही रंगरूपाला तेवढेच महत्व आहे आणि ई-स्टोअरला या सर्व गोष्टींनी आकर्षक बनविण्याचे काम ‘Template’ द्वारे करता येते.
  • तुम्ही जर स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईटचा विचार करत असाल तर या गोष्टीचा तुम्हाला खोलात विचार करावा लागेल कारण Template ची निवड, त्याची फेररचना आणि तुमच्या व्यवसायाला साजेशी Template निवडणे यात तुमचा बराच वेळ आणि पैसे खर्च होऊ शकतो याउलट Shopify हे खास ई-स्टोअर स्थापन करण्यासाठीच बनविलेले असून अशा प्रकारच्या व्यवसायांना कोणते Template हे शोभून दिसू शकतात याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे. ७० पेक्षाही जास्त व्यावसायिक Themes सहित Shopify निश्चितच तुम्हाला हवे तसे ई-स्टोअर स्थापन करण्यासाठी मोलाची मदत करते. त्यांच्या दर्जेदार Themes पाहण्यासाठी https://www.shopify.in/online/themes या लिंक ला एकदा भेट देऊन बघाच की Shopify मुळे तुमचा केवढा भार हलका होत आहे.
  • तसे पाहिले तर वर्डप्रेस पुरवीत असलेल्या Themes चा आकडा हा नक्कीच मोठा आहे पण त्यातील किती Themes या खास ई-कॉमर्स व्यवसायासाठी लागू होतील हे तुम्ही ओळखू शकाल. त्याउलट Shopify ची प्रत्येक Theme ही ई-कॉमर्स व्यवसायाची गरज समोर ठेऊनच विकसित केलेली आहे आणि म्हणूनच Shopify वर तुम्हाला तुमचे आकर्षक ई-स्टोअर स्थापन करण्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
  • ई -स्टोअरचे व्यवस्थापन:

ई-कॉमर्स क्षेत्रात तुम्हाला व्यवसाय कसा करायचा आहे एवढीच माहिती असणे गरजेचे नसून तो व्यवसाय ऑनलाईन कसा हाताळायचा आहे हे माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे. तुम्ही जर स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट बनविणार असाल तर मग तुमच्या ई-स्टोअर द्वारे तुम्हाला वेळोवेळी उत्पादने अद्ययावत करणे, आलेली मागणी पूर्ण करणे, देवाण-घेवाणीचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने सांभाळणे, ग्राहकांची माहिती जतन करणे यासारख्या अनेक गोष्टींसाठी किमान ८ ते १० Plugins वापरावी लागतात आणि त्यासाठी एक तर तुम्हाला या Plugin वापरायचे तांत्रिक ज्ञान तरी हवे किंवा तुमच्यासोबत चांगला डेव्हलपर तरी हवा अन्यथा तुमची फसगत होऊ शकते आणि पर्यायाने व्यवसायात नुकसानही होऊ शकते. पण तेच जर तुम्ही Shopify च्या मदतीने आपले ई-स्टोअर सुरु केले तर तुम्हाला अनेक विकल्प हे आयत्या स्वरूपात उपलब्ध होतात ज्याद्वारे खालील गोष्टींचा फायदा मिळतो.

  • तुमची विविध उत्पादने वेळोवेळी बदलणे
  • आलेल्या ऑर्डर्सची नोंद ठेऊन त्याचे शिपिंग, डिलिव्हरी चार्जेस, बिल, रिफंड यासाठी ग्राहकांना वेळोवेळी संदेश पाठविणे
  • १०० पेक्षा अधिक ऑनलाईन Payment Gateway च्या उपलब्धतेमुळे ऑनलाईन व्यवहार करणे अगदी सोयीस्कर
  • तुमच्या ग्राहकांचे विविध तपशील ठेवणे जसे की त्यांनी यापूर्वी काय खरेदी केले आहे, त्यांची आवडती उत्पादने, त्यांची भोगोलिक माहिती आणि याद्वारे तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजि तयार करणे
  • तुमच्या ई-स्टोअरद्वारे होत असलेल्या विक्रीचा पूर्ण लेखाजोखा सहज उपलब्ध झाल्याने तुम्हाला पुढील वाटचालीसाठी नियोजन करणे सोपे होते
  • Content चे व्यवस्थापन:

कोणत्याही दुकानात गेल्यावर तुमच्यासमोर असणारी व्यक्ती किंवा सेल्सपर्सन तुम्हाला त्यांच्या दुकानातील विविध उत्पादनांची माहिती देते आणि त्याद्वारे खरेदीकडे तुमचे मनही वळविते, पण ई-स्टोअरचे काय? तिथे तर माहिती देण्यासाठी कोणीही नसते. तर मित्रांनो, ई-प्लॅटफॉर्म्सवर असणारा Content हाच तुमचा तिथला सेल्सपर्सन असतो आणि तुम्ही तुमचा Content कशा पद्धतीने ग्राहकांना दाखविता यावरच तुमच्या व्यवसायाचे यश अवलंबून असेल. जितके सोपे तुमचे Content व्यवस्थापन असेल तितके जास्त तुम्ही व्यवसायाच्या इतर बाबींवर लक्ष केंद्रित करू शकाल.

तुम्ही जर वर्डप्रेस द्वारे तुमची स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट बनविणार असाल तर तुम्ही कोणत्या ई-कॉमर्स App किंवा Plugin चा वापर करता यावर तुमचे संपूर्ण Content व्यवस्थापन अवलंबून असेल अगदी त्याउलट Shopify हे खास ई-कॉमर्स साठीचे प्लॅटफॉर्म असल्याने ई-स्टोअर साठी Content व्यवस्थापन करताना नक्की कशाची गरज असते, व्यावसायिक नक्की कुठे अडखळतात, कमीतकमी वेळात जास्तीजास्त माहिती कशी टाकता येऊ शकता या बाबींचा त्यांनी प्रकर्षाने विचार केलेला आहे आणि अगदी सोपे, सहज आणि सुलभ टूल्स त्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. या टूल्स द्वारे तुम्ही खालील गोष्टी कोणत्याही तांत्रिक कुशलतेशिवाय करू शकाल:

  • उत्पादनांची नावे, त्यांचे फोटो, त्यांची किंमत यांची माहिती टाकणे व ती वेळोवेळी अद्ययावत करणे
  • विविध उत्पादनांचे योग्य वर्गीकरण करणे
  • उत्पादनांची आकर्षक मांडणी करणे
  • डिस्काउंट किंवा ऑफर्स हायलाईट करणे
  • तुमच्या ब्रॅण्डिंग साठी हवे तसे गिफ्ट कार्ड किंवा प्रमोशनल मटेरियल बनविणे
  • SEO चे व्यवस्थापन:

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कोणतीही सुरुवात करायची असेल तर तुम्हाला SEO (Search Engine Optimization) काय आहे आणि त्याचा नक्की कशाशी संबंध येतो हे माहिती असणे गरजेचे आहे. SEO हे तुमच्या ई-स्टोअर किंवा ई-कॉमर्स वेबसाईटला सर्च इंजिन वर मिळणाऱ्या क्रमांकासाठी (रँकिंग) आवश्यक बाबी तपासून त्यानुसार शोधणाऱ्याला किंवा ग्राहकाला त्याची लिंक क्रमानुसार दाखविण्याचे काम करते आणि आजच्या घडीला सर्व स्पर्धक आपली वेबसाईट लिंक पहिल्या ३ क्रमांकात कशी दिसेल यासाठी कमालीची मेहनत घेत आहेत. तुम्ही जर स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट बनविणार असाल तर SEO चे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे किंवा एखाद्या SEO शी निगडित सेवा पुरवठादाराला पैसे मोजण्याची तयारी हवी. आणि या दोन्ही गोष्टी नसतील तर.. आपले Shopify आहे ना.. कारण Shopify तुमच्या SEO चे सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यासाठी अनेक सुविधा देऊ करते ज्याद्वारे कोणत्याही तांत्रिक बाबींमध्ये न गुंतता तुम्ही तुमचे ई -स्टोअर उत्तमरीत्या चालवू शकाल. SEO साठी Shopify पुरवित असलेल्या खास सुविधा खाली दिलेल्या आहेत:

  • तुमच्या ई-स्टोअर चे नाव (Title), उत्पादनांची नावे (Product Title), त्यांची माहिती (Description) आणि Heading Tag या गोष्टी तुम्ही SEO च्या नियमांनुसार वेळोवेळी बदलू शकाल आणि तेही कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय
  • तुमच्या उत्पादनांबद्दल SEO ला अनुसरून बनविलेली ग्राहकांची मते तुम्ही ई-स्टोअर वर टाकू शकाल
  • विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स (Facebook, Instagram, Pinterest, Twitter, LinkedIn etc.) हे तुमच्या ई-स्टोअर ला थेट जोडलेले असतील जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमच्या ई-स्टोअर ची जाहिरात व विक्री करणे सोपे होईल.
  • तुमच्या ई-स्टोअर शी निगडित XML Sitemap हे Shopify द्वारा आपोआप तयार होईल (XML ही महत्वाची तांत्रिक माहिती असते)
  • Google सर्च इंजिनवर तुमच्या ई-स्टोअर ला सर्वोत्तम रँकिंग कसे मिळेल याची काळजी Shopify घेते जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या इतर बाजूंवरती सक्षमपणे कार्यरत राहाल
  • मोबाईल प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध सुविधा:

आपण जर मागील १० वर्षाची इंटरनेट वापरकर्त्यांची आकडेवारी पाहिली तर मोबाईलद्वारे इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत तुफान वाढ झाली आहे आणि म्हणूनच हे वापरकर्ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या हाताळावे लागतात. तुम्ही जर स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट बनविली तर ती मोबाईलवर सुद्धा त्याच रीतीने कार्यरत राहिली पाहिजे जशी की ती संगणकावर कार्यरत असते आणि यासाठी तुम्हाला अनेक तांत्रिक गोष्टींकडे विशेष लक्ष दयावे लागते. ई-कॉमर्स वेबसाईट आणि त्यासारखेच मोबाईल अँप बनविणे म्हणजे दुप्पट खर्च हा आलाच म्हणून समजा. पण Shopify वर जर तुमचे ई-स्टोअर असेल तर तुम्हाला ना तुमचे इ-स्टोअर मोबाईलवर उत्तम दिसावे याकडे लक्ष दयावे लागते ना की त्यासाठी अँप बनवावे लागते कारण Shopify या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी स्वतः सांभाळणार आहे आणि ते ही अगदी कमी किंमतीत (म्हणजेच ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ हे इथे लागू पडते).

  • Shopify चे ई-स्टोअर हे जसे संगणकावर दिसते अगदी तसेच ते मोबाईलवरही दिसते आणि यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही
  • Shopify चे मोबाईल अँप वापरून तुम्ही कुठूनही आणि केव्हाही तुमच्या ई-स्टोअरचे व्यवस्थापन करू शकाल आणि या अँप द्वारे ग्राहकांच्या मागण्याही उत्तमरीत्या पूर्ण करू शकाल.
  • तुमच्या व्यवसायाचे मोजमाप (Analytics):

तुम्ही ई-कॉमर्स व्यवसाय तर सुरु कराल पण त्याचे वेळोवेळी मोजमाप करणेही तितकेच आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला व्यवसायातील नफा-तोटा कळून येईल आणि त्याद्वारे तुम्हाला पुढील नियोजन करणे सोपे होईल. तुमच्या स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे ही आकडेवारी मिळवणे आणि तेही कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय थोडे कठीण जाऊ शकते. याउलट Shopify वर ही सर्व आकडेवारी एका क्लिक वर तुम्हाला उपलब्ध होईल.

Shopify – ई - कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग 9

(source – https://shoutmehindi.com/shopify-review-hindi/)

Shopify द्वारे वेगवेगळ्या गोष्टींसाठी Analytics चे उत्तम वर्गीकरण केले आहे. तुम्हाला हवे ते रिपोर्ट्स निवडा आणि किती ग्राहक आले, किती खरेदी झाली, कोणती उत्पादने विकली गेली, नक्की किती उलाढाल झाली अशा अनेक बाबींची खडानखडा आणि पाहिजे तेव्हाची माहिती तुम्ही सहज मिळवू शकाल.

  • संपूर्ण व्यवस्थापन आणि सुरक्षा:

तांत्रिक गोष्टींव्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक बाबींवर तुमच्या वेबसाईटचा वेग अवलंबून असतो आणि म्हणूनच वेळोवेळी त्यांना अद्ययावत ठेवणे व त्यांची नीट देखभाल करणे या गोष्टींवर सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावे लागते.

  • तुमची स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट असेल तर, एकतर तुम्हाला या गोष्टी माहिती असायला हव्यात किंवा यासाठी तुम्हाला वेबसाईट मेंटेनन्ससाठी स्वतंत्र व्यक्ती किंवा अशा सर्व्हिस देणाऱ्या कंपनीला वेगळे पैसे देण्याची तयारी हवी.
  • जेवढा ऑनलाईन विश्वाचा प्रसार वाढतो आहे तेवढेच नवनवीन धोके सुद्धा त्याला निर्माण होत आहेत आणि म्हणूनच सर्व व्हायरस, मालवेअर, हॅकर्स यांना तोंड देऊन तुम्हाला तुमची वेबसाईट तसेच ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तत्पर राहावे लागते आणि यासाठीही वेळ व पैसा खर्च होतोच म्हणून समजा कारण जर यामुळे तुमची वेबसाईट हॅक किंवा डाउन झाली तर व्यवसायाचे नुकसान तर होतेच पण ग्राहकांचा तुमच्यावरील विश्वासही कमी होतो.
  • पण हे सर्व Shopify च्या बाबतीत मात्र वेगळे आहे. Shopify सारखा खास ई-कॉमर्स साठी बनविलेला प्लॅटफॉर्म आपली एक स्वतंत्र व्यवस्था खास तुमच्या ई-स्टोअरची देखभाल (Maintenance), त्याची अभेद्य सुरक्षा व तुमचे व्यावसायिक मूल्य याची काळजी घेण्यासाठी २४/७ कार्यरत ठेवतो आणि म्हणूनच अशा मोठ्या प्लॅटफॉर्म वर होणाऱ्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण हे खूप कमी असते कारण शेवटी ‘तुमचे ई-स्टोअर सुरक्षित तर तुमचा व्यवसाय सुरक्षित’.
  • ड्रॉपशिपिंग आणि प्रिंट-ऑन-डिमांडसाठी उपलब्ध सुविधा:

तुम्ही ऑनलाईन व्यावसायिक असाल किंवा होऊ इच्छित असाल तर तुम्हाला Dropshipping आणि Print-on-Demand या दोन संकल्पनांचे ज्ञान असणे आवश्यक आहे (याचेही सविस्तर लेख आमच्याकडे उपलब्ध आहेत) कारण या अत्यंत फायदेशीर व्यवसाय स्वरूपांचा वापर करून तुम्ही व्यवसायात कमी वेळात आणि कमी खर्चात मोठी प्रगती करू शकाल. जर तुम्ही स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट बनवीत असाल तर या गोष्टींना अनुसरुन तुमच्या व्यवसायाशी निगडित पर्याय विकसित करणे हे खूपच खर्चाचे काम आहे (किमान ७० हजार ते १ लाख एवढा खर्च येऊ शकतो). पण या दोन्ही सुविधा Shopify तुम्हाला अगदी मोजक्या खर्चात देऊ करत आहे जेणेकरून होणारी बचत तुमच्या ऑनलाईन व्यवसाय वृद्धीसाठी नक्कीच उपयोगात आणता येईल.

  • Google शॉपिंग सोबत किंवा Google Merchant Store सोबत इंटिग्रेट करण्याचे पर्याय:

मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणत्याही उत्पादनासाठी Google सर्च केले असेल तेव्हा खालील प्रकारचे डायरेक्ट शॉपिंगचे पॅनेल तुम्ही एकदम सुरुवातीलाच दाखविलेले पाहिले असेल:

Shopify – ई - कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग 10

या पॅनेल ला Google Merchant Centre असे म्हणतात आणि या ठिकाणी जर तुमचे ई-स्टोअर किंवा उत्पादने प्रदर्शित झाली तर तुमची विक्री निश्चितच अनेक पटीने वाढते. Shopify तुमचे ई-स्टोअर थेट या Google Merchant Centre ला जोडून देण्याची सुविधा उपलब्ध करून देते आणि वेळोवेळी तुमच्या उत्पादनांमध्ये किंवा ऑफर्स मध्ये होणारे बदल आपोआप तिथे प्रदर्शित करते. हेच जर तुमची स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट असेल तर Google Merchant Centre मध्ये तुमची उत्पादने दिसण्यासाठी अनेक तांत्रिक गोष्टींची पूर्तता करावी तर लागतेच पण त्याचबरोबर Amazon, Flipkart यासारख्या तगड्या स्पर्धकांशी सुद्धा सामना करावा लागतो. या भानगडीत न पडता आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे असल्यास Shopify सारखा दुसरा सोपा आणि किफायतशीर पर्याय शोधूनही सापडणार नाही.

  • तांत्रिक किंवा इतर गोष्टींसाठी लागणारी मदत:

ई-कॉमर्स व्यवसायात वाटचाल करत असताना काही प्रसंग असे येऊ शकतात जिथे तुम्हाला तांत्रिक किंवा इतर गोष्टींसाठी कोणाच्या तरी मदतीची नक्कीच गरज लागू शकते आणि गरजेच्या वेळीच जर तो मार्गदर्शक किंवा मदतनीस उपलब्ध झाला तर तुम्ही त्या अडथळ्यांवर सहज मात करू शकाल.

  • जेव्हा तुमची स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट असते तेव्हा जर काही तांत्रिक बिघाड उद्भवले तर तुम्हाला त्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणांवरून मदतीसाठी मागणी करावी लागते जसे की होस्टिंग पुरवठादार, वर्डप्रेसचे मदतनीस, प्लगइन पुरवठादार किंवा वेबसाईट चे उत्तम ज्ञान असलेला मित्र आणि शेवटी Google किंवा YouTube आणि यामध्ये तुमचा वेळ आणि ताकद दोन्हीही खर्ची पडतात.
  • अगदी याउलट Shopify ची २४/७ Support Team ही तुम्हाला एकाच ठिकाणी लागणारी सर्व मदत उपलब्ध करू देते आणि याव्यतिरिक्त ते तुम्हाला ई-कॉमर्स क्षेत्रातील इतर तज्ञ व्यक्तींशी जोडून त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही मिळवून देतात.

चला आता निश्चितच तुम्हाला खात्री झाली असेल की Shopify हा स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट बनवायला एक उत्तम पर्याय आहे. पण अजूनही काहीजणांना वाटत असेल की हे सगळे ठीक आहे पण खर्चाच्या बाबतीत नक्की कोण सोयीस्कर आहे? तर तेही आपण आता पाहू.

  • ई-कॉमर्स वेबसाईट आणि Shopify साठी लागणारा खर्च:

एखादी स्वतंत्र ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची असेल तर खालील गोष्टींवर तुम्हाला खर्च करावा लागेल:

  • Hosting व Domain – वार्षिक ५००० रु. पासून पुढे
  • ई-कॉमर्स साठी उपयुक्त Template – २००० रु. पासून पुढे
  • तांत्रिक गोष्टींसाठी लागणारी विविध Plugins – ४ Plugin साठी किमान ५००० रु.
  • सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी उत्पादनाची विक्री करण्यासाठी लागणारे टूल्स- किमान वार्षिक ७०००रु.
  • वेबसाईट मेंटेनन्स खर्च – किमान २००० रु.
  • आणि हे सगळे तुम्ही स्वतः करणार नसाल तर तुमची वेबसाईट करून देणाऱ्या डेव्हलपरची फी – १५००० रु ते ४०००० रु

म्हणजेच एक उत्तम ई-कॉमर्स वेबसाईट जर तुम्ही स्वतः बनविली तर किमान  २०,००० ते २५,००० रुपये खर्च तुम्हाला येऊ शकतो आणि तीच जर तुम्ही बाहेरून बनवून घेतली तर किमान ३५,००० ते ६५,००० रुपये खर्च तुम्हाला येऊ शकेल.

Shopify चे प्लॅन्स:

खास नवउद्योजकांसाठी Shopify ने Shopify Lite नावाचा एकदम स्वस्त आणि तेवढाच किफायतशीर प्लॅन सुरु केलेला आहे. महिन्याला फक्त $९ (अंदाजे ६०० रुपये – म्हणजेच वर्षाला ७२०० रुपये) मोजून त्यांच्या खास ई -कॉमर्स साठी बनविलेल्या अनेक सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

Shopify – ई - कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग 11

याव्यतिरिक्त तुम्ही जर पूर्ण तयारीनिशी या क्षेत्रात पदार्पण करू इच्छित असाल तर खालील प्लॅन्स चा वापर करून तुम्ही व्यावसायिक सुरुवात करू शकाल:

Shopify – ई - कॉमर्स व्यवसाय सुरु करण्याचा सर्वात सोपा मार्ग 12

तुमच्या सोयीनुसार आणि तुम्हाला लागू पडतील अशा फायद्यांनुसार तुम्ही कोणताही प्लॅन निवडू शकता. एवढ्या किंमतीत आणि एकाच ठिकाणी एवढे फायदे तुम्हाला इतर कोणताही प्लॅटफॉर्म आणि कोणी डेव्हलपर सुद्धा देऊ करणार नाही. एक वेळच्या कौटुंबिक जेवणाच्या खर्चापेक्षाही कमी खर्चात तुम्ही ई-स्टोअर सुरु करून ई-कॉमर्स क्षेत्रातील तुमची वाटचाल सुरु करू शकता आणि जसजसे तुम्ही यात यशस्वी व्हाल त्यानुसार तुमचा प्लॅन Upgrade करून तुमचा वाढता व्यवसाय उत्तमरीत्या सांभाळू शकाल.

शेवटी काय तर….

एखादी पूर्ण सोयीसुविधांनीयुक्त गाडी तुम्ही खरेदी कराल का गाडीची निर्मिती स्वतः करून त्याचा आनंद घ्याल हे तुमच्यावर अवलंबून आहे. Shopify ही ई-कॉमर्स क्षेत्रात मुक्त संचार करण्यासाठी सर्व सोयींनी उपयुक्त बनविलेली अशी एक गाडीच आहे म्हणून समजा. तुमचे काम एकच, ई-स्टोअर चे स्टेअरिंग आपल्या हातात ठेऊन ती गाडी व्यवस्थित चालवणे, बाकी त्या गाडीची देखभाल करायला Shopify समर्थ आहेच. स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट बनविणे चुकीचे आहे असे आमचे मत नाही पण जर तांत्रिक गोष्टींची तुम्हाला माहिती नसताना सुद्धा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करायचा असेल तर Shopify हा एक उत्तम पर्याय आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. शेवटी व्यवसायात तोच यशस्वी होतो जो योग्य वेळी आणि योग्य गोष्टींवर पैसे खर्च करताना त्याचा सखोल अभ्यास करून ती गुंतवणूक सार्थ ठरवतो. आणि एक लक्षात ठेवा Shopify वर तुमचे ई-स्टोअर बनविले म्हणजे आपोआप तुमच्या उत्पादनांची विक्री होईल असे नाही तर त्यासाठी लागणारी मेहनत, चिकाटी, जिद्द आणि इतर कौशल्ये यांचाही तुम्हाला वापर करावाच लागेल. निर्णय तुमचा आहे – Shopify का ई-कॉर्मस वेबसाईट? कोणाचीही निवड करण्यापूर्वी सर्व बाबी एकदा नक्की तपासा कारण कोणीतरी म्हणाले आहे ‘शुरुवात सही तो सब सही’.

शेअर करा

This post was last modified on November 26, 2020 9:25 PM

Share
Tags: Rcontent

Recent Posts

कोल्ड प्रेस तेल घाणी व्यवसाय

स्वतंत्रपणे काही उद्योग व्यवसाय करायची इच्छा आहे आणि कमी गुंतवणुकीत चांगला फायदा हवा आहे, लहान…

2 years ago

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा

तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो...परंतु हा सल्ला देताना…

2 years ago

प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

तुम्ही कल्पक आहात का? तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? तुमची नोकरी अथवा…

4 years ago

घरबसल्या कमाईचे १३ सोपे मार्ग

व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन…

4 years ago

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती

आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत…

4 years ago

कमाई करण्यासाठी हे २३ फायदेशीर अन्नप्रक्रिया उद्योग

माणसाची अन्न किंवा खाद्य ही मुलभूत गरज आहे. यामुळे खाद्य पदार्थ नेहमीच भरपूर मागणी असणारे…

4 years ago