fawn pug lying on gray blanket

डॉग वॉकर व्यवसाय कसा सुरु कराल..?

आपल्या नेहमीच्या कमाई खेरीज थोडी अधिकची कमाई करायची इच्छा अनेकांना असते आणि त्यासाठी काही स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल का याची चाचपणी केली जात असते. या संदर्भात अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय करता येतात हे खरे असले तरी आपल्या छंदाचे जर व्यवसायात रुपांतर करता येत असेल तर त्यासारखे दुसरे काय असणार? तुम्हाला पाळीव प्राण्यांची आवड असेल आणि त्यातही कुत्री अधिक आवडत असतील तर एका वेगळ्या व्यवसायाचा विचार तुम्ही करू शकता. तुम्हाला सकाळ संध्याकाळ फिरायला आवडत असेल आणि चालण्याचा व्यायाम आवडत असेल तर हा वेगळा व्यवसाय तुम्ही नक्कीच करू शकता कारण या व्यवसायाची ती मुख्य गरज आहे. हा व्यवसाय आहे डॉग वॉकर म्हणजे कुत्री फिरवून आणण्याचा व्यवसाय. परदेशात हा व्यवसाय करण्याऱ्या कंपन्या आहेत. भारताचा विचार केला तर येथेही हा व्यवसाय उभरता आहे. आणि या व्यवसायात म्हणावी तितकी स्पर्धा अजून तरी नाही. त्यामुळे तुम्हाला याव्यवसायात बस्तान बसविण्याची चांगली संधी आहे. हा व्यवसाय म्हणजे नियमित उत्पन्न मिळणारा व्यवसाय आहे पण त्यासाठी काही प्राथमिक …

डॉग वॉकर व्यवसाय कसा सुरु कराल..? .

आणखी वाचा

पेट स्टोअर्स – एक फायदेशीर व्यवसाय

पाळीव प्राण्यांची मनापासून आवड असणारे आणि स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय असावा अशी इच्छा असणाऱ्यांनी पेट स्टोअर्स या व्यवसायाचा विचार करण्यास हरकत नसावी. आवडीचे काम शिवाय पैसे मिळविण्याची संधी यामुळे मिळू शकते. आज अनेक कारणांनी पाळीव प्राणी, पक्षी, मासे पाळले जात आहेत. एकाकीपण घालविणे, सोबत, घरातील एकट्या लहान मुलांना कंपनी अश्या अनेक कारणांनी आवडीचे प्राणी पक्षी पाळण्याची क्रेझ भारतात सुद्धा वाढली असून या पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक असलेल्या अन्न, कपडे, खेळणी व अन्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. परिणामी या व्यवसायाचा विकास वेगाने होत असल्याचे आकडेवारी सांगते. प्राणी, पक्षी, मासे यांच्या साऱ्या गरजा पेट स्टोअर्स पुऱ्या करत असते. तुम्हाला पेट स्टोअर्स सुरु करावे असे वाटत असेल तर त्या संदर्भात तुम्ही अगोदर सर्व माहिती गोळा करायला हवी. नुसते पेट स्टोअर्स याला काही अर्थ नाही. कारण या अंतर्गत अनेक प्रकार येतात त्यातील नक्की काय तुम्हाला सुरु करायचे आहे का सर्व सेवा द्यायच्या आहेत याचा विचार करायला हवा. या मागचे मुख्य …

पेट स्टोअर्स – एक फायदेशीर व्यवसाय .

आणखी वाचा
brown short coated dog on gray textile

असा करू शकता डॉग डे केअर व्यवसाय

भारतीय संस्कृतीमध्ये माणूस, वनस्पती आणि प्राणी या सजीवांचे विशिष्ट स्थान प्राचीन काळापासून मान्य केले गेलेले आहे. भारतीय संस्कृतीत पाळीव प्राण्यांना जितके महत्व आहे तितकेच वन्य जीवांना सुद्धा आहे. भारतीय संस्कृती मध्ये अनेक देव देवता आहेत आणि विशेष म्हणजे अनेक देवतांचे स्वतःचे वाहन अनेक प्राणी आहेत. त्यामुळे आपल्याकडे पशु पूजनाची पद्धत सुद्धा आहे. आजच्या आधुनिक काळात सुद्धा ग्रामीण भारतात गाय, बैल, शेळ्या मेंढ्या, असे पशुधन शेतकऱ्याकडे असणे संपन्नतेचे मानले जाते. शहरी भागात सुद्धा अनेक घरात पाळीव प्राणी असतात. घरात पाळण्यासाठी म्हणून ज्या प्राण्यांना शहरी जीवनात मोठी मागणी आहे ती कुत्री, मांजरे आणि मासे याना. त्यातही कुत्री अधिक लोकप्रिय आहेत करण ती फ्रेंडली असतात, माणसांसोबत सहज राहू शकतात आणि मुख्य म्हणजे घराला सुरक्षा देतात. आता यामध्ये सोबत मिळणे हाही एक भाग जोडला गेला आहे. अर्थात कुत्रा पाळणे हे जबाबदारीचे काम आहे आणि ते पूर्ण लक्ष देऊन करावे लागते. त्यातून घरातील व्यक्तींना कामानिमित्ताने काही वेळासाठी घराबाहेर राहावे लागत असले तर या कुत्रांकडे पाहणार …

असा करू शकता डॉग डे केअर व्यवसाय .

आणखी वाचा
मी आत्मनिर्भर बनणार

माहिती मिळविण्यासाठी सबस्क्राइब करा

प्रत्येक आठवड्यला नवीन माहिती 

closeup photo of silver iMac