
मधाचा धंदा अनेक प्रकारे हितकर (Honey Processing)
सध्या कृत्रिम आणि बाजारातल्या अन्नाचे परिणाम लोकांना जाणवायला लागले आहेत आणि शक्यतो नैसर्गिक अन्न खाल्ले पाहिजे अशी भावना जागी होत आहे. निसर्गाने दिलेले अन्न पदार्थ तसेच खावेत म्हणजे ते औषधाप्रमाणे गुणकारी ठरतात असाही अनुभव लोकांना येत आहे. त्यातला सर्वाधिक वापरला जाणारा गुणकारी पदार्थ आहे मध. वजन कमी करणे, पचन शक्ती वाढवणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे अशा अनेक प्रकारे उपयुक्त असल्याने मधाची मागणी वरचेवर वाढत आहे. त्यामुळे मध गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे हा फारच किफायतशीर व्यवसाय झाला आहे. मध काही कारखान्यात तयार होत नाही. तो निसर्गात मधमाशांकडून तयार केला जातो. त्याचा कच्चा माल आपण आणलाय आणि त्यावर मोठी प्रक्रिया केलीय असा काही प्रकार मधात नाही. निसर्गात आपोआप तयार होणारे हे अन्न आपल्याला केवळ गोळा करायचे आहे आणि साफ सफाई करून विकायचे आहे. तेव्हा मार्जिन ऑफ प्रॉफिटचा काही प्रश्न नाही. पूर्वीच्या काळी झाडांना मधमाशांचे पोळे लटकलेले दिसायचे. गुराखी त्यावर नजर ठेवायचे आणि योग्यवेळी ते झोडपून गावात लोकांना आणून द्यायचे किंवा …
मधाचा धंदा अनेक प्रकारे हितकर (Honey Processing) .