पापड उद्योग

पापडाची आता फॅक्टरी झाली धंदा कोणता करावा असा प्रश्‍न अनेक तरुण विचारतात. एखादा व्यवसाय करून श्रीमंत व्हावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात असते पण नेमका कोणता धंदा करावा याबाबत ते संभ्रमात असतात. खरे तर असा संभ्रम असण्याचे काही कारण नाही. आपल्या आसपास नजर टाकली तर लक्षात येईल की, काही तरी करून बाजारात विकले जाते किंवा कसली तरी सेवा बहाल केली जाते त्या सर्व सेवा आणि ती उत्पादने हा धंदाच असतो. पण कोणत्या धंद्यात कोणती आणि किती आव्हाने आहेत, कोणत्या धंद्यात नेमकी किती स्पर्धा असेल आणि तिला आपण तोंड देऊ शकू की नाही असा प्रश्‍न असतो.  त्याशिवाय आपण असेही पहातो की काही धंदे छान चालतात पण काही वर्षांनी पहावे तर त्याचा मागमूसही रहात नाही. काही दिवसांपूर्वी एस टी डी सेंटर हा छान धंदा होता पण तो आता बंदच पडला आहे कारण फोनशी संबंधित तंत्रज्ञान बदलले आहे. काही धंद्यात काही दिवस चलती असते पण काही दिवसांनी त्यातल्या मालाची मागणीच आटून जाते. म्हणजे धंदा …

पापड उद्योग .

आणखी वाचा
variety of foods on top of gray table

टिफिन बॉक्स व्यवसाय

भारतीय संस्कृती मध्ये महिलेला अन्नपूर्णादेवी मानले जाते. अन्नपूर्णा म्हणजे रुचकर अन्न रांधून सर्वांची भूक भागवून आत्मारामाची तृप्ती करणारी. कडाडून भूक लागली असताना स्वादिष्ट, रुचकर आणि आरोग्यदायी अन्न मिळणे ही खरोखरी भाग्याची गोष्ट. फक्त घरात रोजच असे अन्न सहजी मिळत असल्याने त्याचे महत्व कळत नाही. पण शिक्षण, नोकरी व्यवसाय निमित्ताने घराबाहेर राहावे लागणारे अश्या घरगुती अन्नासाठी आसुसलेले असतात. येथेच ज्या महिला किंवा पुरुष उत्तम अन्न रांधू शकतात त्यांना अश्या भुकेल्याची भूक भागविण्याचे पुण्य कमावता येते शिवाय पैशाची भरपूर कमाई होते ते वेगळे. घरच्या घरी छोट्या प्रमाणावर काही व्यवसाय करण्याची इच्छा असलेले आणि स्वयंपाकात कुशल असलेल्या महिला टिफिन बॉक्सचा फायदेशीर व्यवसाय करण्याबाबत नक्की विचार करू शकतात. भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघराला महत्वाचे स्थान आहे. अगदी छोट्या जागेत सुद्धा २५ -३० माणसांचा स्वयंपाक सहज होऊ शकतो. शिवाय भारतीय भोजनात पदार्थांचे वैविध्य भरपूर आहे. बाहेरच्या खाण्याची कितीही आवड असली तर रोज बाहेर जेवणारे लवकरच त्या अन्नाला कंटाळतात आणि मग शोध सुरु होतो घरगुती जेवण कुठे मिळू …

टिफिन बॉक्स व्यवसाय .

आणखी वाचा
bun, lettuce, and chips served on white ceramic plate

सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips)

आपण आसपास नजर टाकली तर बटाट्याचे चिप्स हा खाद्य प्रकार किती लोकप्रिय आहे याचे दर्शन  आपल्याला घडते. त्यावरून आपल्याला त्याला असलेली मागणी तर कळेलच पण ही मागणी पुरी करताना किती प्रकारचे चिप्स तयार केले जात असतात याचीही कल्पना येईल. बाजारात साध्या चिप्स बरोबरच आकाराने आणि चवीने किती प्रकारची विविधता साधली जाते हे बघण्यासारखे आहे. बसस्टँड, रेल्वे स्टेशन, चित्रपट नाट्यगृहे, करमणुकीचे अन्य कार्यक्रम करणारी सभागृहे, अनेक प्रकारच्या पार्ट्या, विवाह समारंभातले भोजनाचे समारंभ, निरनिराळ्या प्रकारच्या बैठका, पर्यटन स्थळे,  पिकनिक स्पॉटस्, मद्यपान गृहे आणि उपाहारगृहे अशा अनेक ठिकाणी बटाट्याच्या कापांना मागणी असते.  एरवी तर हे काप खाल्ले जातातच पण विशेष करून उपवासाला ते चालत असल्याने धार्मिक स्थळांवर आणि मंदिरांत त्यांना विशेष मागणी असते. भारतात बटाट्याच्या चिप्सची फार मोठी बाजारपेठही आहे आणि अनेक लोक चिप्स तयार करून, विकून त्यातून मोठा नफाही मिळवत असतात. बटाटा हा या प्रकारातला सर्वात मोठा कच्चा माल. शिवाय तळण्याचे तेल हाही उत्पादन खर्चातला मोठा घटक असतो. हा उद्योग आपण घरगुती …

सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips) .

आणखी वाचा
assorted bread store display

असा सुरु करू शकता घरगुती बेकरी उद्योग

बेकरी उत्पादनांना आज चांगली मागणी असून या व्यवसायाची वाढ वेगाने होत आहे. विशेष म्हणजे बेकरी उद्योग घरच्या घरीही सुरु करता येतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरात बेकिंग सुरु करण्याची कल्पना अनेकांना वेडगळपणाची वाटू शकेल. पण आज प्रत्यक्षात मात्र अनेकांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून हा व्यवसाय सुरु केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे. या मागे अनेक कारणे देता येतील. घरगुती पातळीवर हा व्यवसाय सुरु केलेल्या अनेकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की वैवाहिक जीवन, मुलाबाळांचे संगोपन आणि आपली आवड किंवा पॅशन जपणे यामुळे त्याना हे सहज शक्य झाले आहे. प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या मागणीत दिवसेनदिवस होत असलेली वाढ, तसेच मोठ्या प्रमाणावर सुरु झालेल्या नामवंत बेकरी चेन्स किंवा शाखा आणि स्वतंत्रपणे चालविल्या जात असलेल्या बेकरी यापासून प्रेरणा घेऊन अनेक महिला उद्योजकांनी घरच्या घरी बेकरी व्यवसाय सुरु करण्यात आघाडी घेतली आहे. घरच्या घरी हा व्यवसाय सुरु करण्यासाठी फारसे मनुष्यबळ लागत नाही तसेच प्राथमिक गुंतवणूक खुपच कमी लागते. शिकत असलेले विद्यार्थी, गृहिणी या सुद्धा बेकरी …

असा सुरु करू शकता घरगुती बेकरी उद्योग .

आणखी वाचा
assorted-color bar soap lot on white surface

असा करू शकता घरी बनविलेल्या साबणाचा व्यवसाय

एकंदरीत आज जीवनमान उंचावल्याने तसेच वाढत्या महागाईमुळे पती पत्नी दोघांनाही कमाई करावी लागते. अर्थात काही महिला अनेक कारणांनी घराबाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करू शकत नाहीत. मात्र घरबसल्या, घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून फावल्या वेळात घरीच काही उद्योग, व्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावू शकतात. कमी भांडवल आणि कमी जागेत आणि कमी मनुष्यबळ वापरून करता येणारे असे अनेक व्यवसाय आहेत. येथे आम्ही असाच एक व्यवसाय- घराच्या घरी नैसर्गिक साबण कसा बनविता येईल याची माहिती देत आहोत. साबण ही रोजच्या वापराची वस्तू आहे. आज बाजारात अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे, अनेक सुगंधाचे आणि अनेक किमतींचे स्नानासाठी वापरले जाणारे साबण उपलब्ध आहेत. घरी बनविलेल्या साबणाच्या तुलनेत त्यांच्या किमती स्वस्त आहेत. पण मुख्य फरक असा आहे की हे साबण पेट्रोलियम पदार्थ आणि अन्य कृत्रिम रसायने वापरून बनविले जातात. त्यामुळे ते अधिक काळ टिकणारे, वापरल्यावर दीर्घ काळ सुगंध देणारे असले तरी हे साबण दीर्घकाळ वापरात राहिले तर त्वचेला नुकसान पोहोचवितात हे आता लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे नैसर्गिक …

असा करू शकता घरी बनविलेल्या साबणाचा व्यवसाय .

आणखी वाचा
chocolates with box on white surface

घरगुती चॉकलेटस बनवून करा भरपूर कमाई

आजकाल कोणताही आनंदाचा प्रसंग, उत्सव चॉकलेट शिवाय साजरा होत नाही असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वाढदिवस, व्हेलेंटाईन डे सारखे विविध डेज, लग्नाचे वाढदिवस, कार्पोरेट कार्यक्रम, सणाउत्सवानिमित् दिल्या जाणाऱ्या गिफ्ट, परीक्षेतील यश, दिवाळी, राखी सारखे सण, शाळेतल्या पार्टी असा कोणताही कार्यक्रम चॉकलेटच्या आस्वादाने साजरा करण्याची जणू प्रथा पडते आहे. ज्यांना थोडे भांडवल गुंतवून काही व्यवसाय उद्योग करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी घरी बनविलेली चॉकलेट्स हा चांगला फायदेशीर पर्याय ठरू शकतो. आज बाजारात सहज चक्कर टाकली तर अक्षरशः शेकडो प्रकारची चॉकलेट दिसतात. अगोड, कडू चवीची, मध्यम गोड, डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, कोका पावडर- शुगर फ्री चॉकलेट असे अनेक प्रकार जगभर लोकप्रिय ठरले आहेत त्यामुळे त्यांना सततची मागणी आहे. आता त्यात हेल्थ कॉन्शस म्हणजे आरोग्याबत जागरूक प्रजेची भर पडते आहे. आरोग्यपूर्ण जीवनासाठी विविध प्रकारची डाएटस, ऑर्गेनिक फूडचा वापर करणारे या विविध प्रकारच्या डाएटला अनुरूप अशा चॉकलेटला पसंती देताना दिसतात. त्यात केटो, वेगन, शुगर फ्री, ऑर्गनिक चॉकलेट आपला जम बसवू पाहत आहेत. …

घरगुती चॉकलेटस बनवून करा भरपूर कमाई .

आणखी वाचा
मी आत्मनिर्भर बनणार

माहिती मिळविण्यासाठी सबस्क्राइब करा

प्रत्येक आठवड्यला नवीन माहिती 

closeup photo of silver iMac