
पापड उद्योग
पापडाची आता फॅक्टरी झाली धंदा कोणता करावा असा प्रश्न अनेक तरुण विचारतात. एखादा व्यवसाय करून श्रीमंत व्हावे अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात असते पण नेमका कोणता धंदा करावा याबाबत ते संभ्रमात असतात. खरे तर असा संभ्रम असण्याचे काही कारण नाही. आपल्या आसपास नजर टाकली तर लक्षात येईल की, काही तरी करून बाजारात विकले जाते किंवा कसली तरी सेवा बहाल केली जाते त्या सर्व सेवा आणि ती उत्पादने हा धंदाच असतो. पण कोणत्या धंद्यात कोणती आणि किती आव्हाने आहेत, कोणत्या धंद्यात नेमकी किती स्पर्धा असेल आणि तिला आपण तोंड देऊ शकू की नाही असा प्रश्न असतो. त्याशिवाय आपण असेही पहातो की काही धंदे छान चालतात पण काही वर्षांनी पहावे तर त्याचा मागमूसही रहात नाही. काही दिवसांपूर्वी एस टी डी सेंटर हा छान धंदा होता पण तो आता बंदच पडला आहे कारण फोनशी संबंधित तंत्रज्ञान बदलले आहे. काही धंद्यात काही दिवस चलती असते पण काही दिवसांनी त्यातल्या मालाची मागणीच आटून जाते. म्हणजे धंदा …