green succulent plants on gray concrete floor

हायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान

तुम्हाला शेती करायची आहे का ? हो..नक्कीच. तुमच्याकडे शेती करण्यासाठी योग्य जमीन आहे का? नाही, त्याचीच तर अडचण आहे. पण कोण म्हणते शेती करण्यासाठी जमीन लागते, सगळेच. पण आम्ही जर म्हणालो जमिनीशिवाय आणि मातीशिवायही तुम्ही शेती करू शकाल आणि तेही उत्तम कमाईसहीत, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खर असून सहज शक्य आहे फक्त हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून. दिवसेंदिवस वाढत जाणारी आपली लोकसंख्या हे आपल्या देशापुढील आव्हानही आहे व ती आपली ताकदही आहे. या लोकसंख्येच्या गरजेसाठी शहरीकरण जितके गरजेचे आहे तितकेच त्यांची भूक सुद्धा. पण शेतीपूरक जमिनीवरच जर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या तर शेती करायची कुठे. ह्या इमारतींमध्येच. कसे? हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून. अजूनही खरे वाटत नाही मग ही काही नजीकची उदाहरणे पहा. हर्बीवोर फार्म्स – मुंबई अंधेरी येथे फक्त १००० स्क्वे. फूट. एवढ्या जागेत २५०० व्यावसायिक झाडे लागवड केली आहेत. (प्रति महिना ५ लाखाहून जास्त उत्पन्न) चेन्नईस्थित राहुल ढोका यांनी स्वतःच्या टेरेसवर फक्त ८० स्क्वे.फूट जागेत ६००० झाडे यशस्वीरीत्या लावून

आणखी वाचा

अनुलंब म्हणजे व्हर्टिकल किंवा बहुमजली शेती

बहुमजली इमारती असतात त्याप्रमाणे उभ्या प्रकारात केलेली शेती किंवा बाग याना अनुलंब म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग असे म्हटले जाते. अशी शेती करण्याचे मुख्य कारण म्हणजे विशेषतः शहरी भागात उपजाऊ जमिनीचे कमी झालेले प्रमाण आणि दुसरे म्हणजे घरच्याघरात, कमी जागेत चांगले उत्पादन घेण्याची सुविधा. उंच सांगाडे उभारून त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे झुडपे, भाज्या, फळे पिकविण्याची ही पद्धत. आता त्याला मातीशिवाय म्हणजे हायड्रोपोनिक शेती तंत्राची साथ मिळाल्यामुळे याकडे भविष्यातील अन्न गरजा पुरविणारी शेती म्हणूनही पाहिले जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ही आधुनिक हायड्रोपोनिक व्हर्टिकल शेती घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा घरातल्या घरात सुद्धा करता येते. दाट लोकवस्तीच्या शहरात जेथे जागा कमी आहे तेथे तर अशी शेती हे वरदान ठरू शकते. व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स म्हणजे नक्की काय व्हर्टिकल फार्मिंगचा अर्थ आहे बहुमजली पद्धतीने पिके घेणे. व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स या नावावरून बोध होतो तो मातीविना आणि बहुमजली शेती यांचा संयोग करून केलेली शेती. शहरी, नागरी भागात अनेक पातळ्यांवर वनस्पती वाढवून माती शिवाय केलेली शेती असेही म्हणता येतील. …

अनुलंब म्हणजे व्हर्टिकल किंवा बहुमजली शेती .

आणखी वाचा

हायड्रोपोनिक फार्मिंगचे २० फायदे आणि तोटे

तुम्ही व्यवसाय म्हणून किंवा छंद म्हणूनही हायड्रोपोनिक किंवा विना मातीच्या शेतीचा विचार करत असाल तर हे आधुनिक शेती तंत्रज्ञान माझ्यासाठी योग्य आहे काय हा पाहिला प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारायला हवा. याचे मुख्य कारण म्हणजे हायड्रोपोनिक शेतीचे सर्वांगीण स्वरूप पाहताना त्यात काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हे फायदे काय आणि तोटे काय आहेत हे अगोदरच समजावून घ्यायला हवेत. हायड्रोपोनिक शेतीचे फायदे आणि तोटे या विषयी माहिती या लेखात वाचायला मिळेल. हायड्रोपोनिक शेतीचे फायदे काय याची माहिती प्रथम घेऊ १)मातीची गरज नाही जेथे उपजाऊ जमीन मर्यादित आहे, किंवा अजिबात जमीन नाहीच किंवा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्याने नापीक झाली आहे तेथेही हायड्रोपोनिक पद्धतीने पिके घेता येतात. १९४० सालीच हायड्रोपोनिक पद्धतीचा यशस्वी वापर करून वेक आयलंड येथे तैनात असलेल्या चमूसाठी ताज्या भाज्या आणि फळे पिकविली गेली होती. पॅन अमेरिकन एअरलाइन्स या विमान कंपनीची विमाने येथे इंधन भरण्यासाठी थांबत असत. प्रशांत महासागरात हा भाग जिरायती जमिनीचा भाग …

हायड्रोपोनिक फार्मिंगचे २० फायदे आणि तोटे .

आणखी वाचा

हायड्रोपोनिक यंत्रणेत वाढविता येणाऱ्या काही वनस्पती

हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये कोणत्या वनस्पती वाढविता येतात या प्रश्नांचे उत्तर खरे तर कोणत्याही प्रकारच्या वनस्पती असे आहे. मात्र पाण्याच्या माध्यमातून ही शेती केली जात असल्याने सर्व वनस्पती चांगल्याच वाढतील असे नाही. त्यामुळे हायड्रोपोनिक फार्मिंग साठी कोणत्या वनस्पतींची निवड करावी याच्या काही टिप्स येथे देत आहोत. निदान सुरवात करताना योग्य वनस्पती निवडाव्यात. एकदा अनुभव आला की मग ही यादी सहज वाढविता येते. कारण हायड्रोपोनिक लागवडीसाठी योग्य अश्या अनेक वनस्पती आहेत. सुरवात करताना काही भाज्या, फळे आणि मुळे यांची माहिती आपण घेऊ. १)लेट्युस – ( थंड हवा आणि पीएच लेव्हल ६.० ते ७.० ) सॅलड, सँडविच साठी लेट्युस ही एक आदर्श भाजी मानली जाते. जगभर लेट्युसचा वापर केला जातो आणि हायड्रोपोनिक पद्धतीत वाढविल्या जाणाऱ्या भाज्यात ही मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते. वेगाने वाढणारी ही वनस्पती काळजी घेण्याच्या दृष्टीने सोपी आहेच पण एनएफटी, एरोपोनिक्स, एब अँड फ्लो अश्या कोणत्याही हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये चांगल्या प्रकारे वाढविता येते. ज्यांना हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात करायची आहे त्याच्यासाठी …

हायड्रोपोनिक यंत्रणेत वाढविता येणाऱ्या काही वनस्पती .

आणखी वाचा
person holding leafed plant

हायड्रोपोनिक फार्मिंग साठी बिया अधिक योग्य का?

घरातल्या घरात, मातीशिवाय आणि हवामानासह संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात ठेवता येणारी हायड्रोपोनिक फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय आणि ती कशी काम करते याची माहिती करून घेतल्यानंतर काही जणांनी हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात केली असेल. काही जणांची कदाचित  पहिली ग्रो सिस्टम यशस्वी ही झाली असेल आणि आता त्यांना या सिस्टीमचा विस्तार वाढवायचा आहे त्यांनी हा लेख अवश्य वाचायला हवा. अर्थात हायड्रोपोनिक सिस्टीम उभी करताना संबंधितानी दीर्घ संशोधन, वाचन, रोपवाटिका, स्थानिक बाजार, बागकामासाठी आवश्यक साहित्याची विक्री करणारी दुकाने यांची माहिती मिळवूनच ही सिस्टीम उभारलेली असणार. हायड्रोपोनिक सिस्टीममध्ये तुम्ही लावलेल्या पहिल्या वनस्पतीची वाढ योग्य तऱ्हेने झाली की हे सारे कष्ट सार्थकी लागले असे नक्कीच म्हणता येईल. हे पाहिले रोप तुम्ही कदाचित रोपवाटिका किंवा तयार रोपे विकणाऱ्या दुकानदारांकडून खरेदी केलेले असेल आणि हायड्रोपोनिकची सुरवात करताना तयार रोप आणणे किंवा अंकुरलेली छोटी रोपे आणणे हा चांगला पर्याय आहे. पण दीर्घकाळ तुम्ही हायड्रोपोनिक फार्मिंग करण्याचा विचार करत असाल तर मात्र तुम्ही स्वतः बियांपासून रोपे तयार करणे अधिक व्यवहार्य …

हायड्रोपोनिक फार्मिंग साठी बिया अधिक योग्य का? .

आणखी वाचा
plant leaves on plate

घरी बनविता येणारी नैसर्गिक कीडनाशके

पिकांचे धोकादायक किडी आणि कीटकांपासून संरक्षण व्हावे पण त्याचबरोबर जमिनीचे नुकसान होऊ नये आणि हे खाद्यान्न सेवन करणाऱ्या लोकांच्या पोटात कोणतेही विषारी किंवा शरीरावर दुष्परिणाम करणारे घटक जाऊ नयेत या साठी आजकाल नैसर्गिक कीड आणि कीटक नाशकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अशी नैसर्गिक कीडनाशके घराच्या घरी बनविता येतात. आणि त्याचा प्रयोग करण्यासाठी घरातलीच बाग सर्वात उत्तम असे म्हणता येईल. त्यातून जे उत्साही शेतकरी घरच्या घरी स्वतःपुरते धान्य किंवा शेत उत्पादन घेतात त्याच्यासाठी तर हे वरदान म्हणता येईल. घरातल्या बागेत किंवा परसात पिकविलेल्या धान्यापासून बनविलेल्या पदार्थांची रुची घेण्यात नक्कीच एक प्रकारचे सुख आणि समाधान मिळते. शिवाय एक वेगळा अनुभव गाठीशी बांधता येतो ते वेगळेच. यातही आणखी जे सेंद्रीय शेती करत आहेत त्यांना सेंद्रिय शेतीच्या प्रोटोकॉल किंवा नियम आणि उद्दिष्टांना सांभाळून असे उत्पादन मिळवणे नैसर्गिक कीडनाशकांचा वापर करून शक्य होते. जलद उत्पादन मिळविण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर म्हणजे तणनाशके, कीडनाशके आणि रासायनिक किंवा कृत्रिम खते वापरण्यापेक्षा घरच्या घरी बनविता …

घरी बनविता येणारी नैसर्गिक कीडनाशके .

आणखी वाचा

हायड्रोपोनिक्स, या तंत्राने मातीशिवाय करा शेती

जगभरात वाढती लोकसंख्या आणि तिच्या पालनपोषणासाठी लागणारे प्रचंड प्रमाणावर धान्य उत्पादन हा गहन प्रश्न आहे. ओसाड जमिनी, पाण्याचे अपुरे प्रमाण आणि टोकाचे हवामान अश्या भागात शेती दुरापास्त असते तर काही वेळा अति पाणी म्हणजे दलदलीच्या जागेत शेती होऊ शकत नाही. अश्या वेळी नवीन तंत्रज्ञानाने शेती कशी वाढविता येईल हे जसे महत्वाचे संशोधन आहे तसेच निसर्गावर अवलंबून न राहता शेती उत्पादन कसे घेता येईल या क्षेत्रात झालेले संशोधनही महत्वाचे ठरते. कमी जागेत सहजपणे करता येणारी, धूळ विरहित, जमीन आणि माती शिवायही माणसाला आवश्यक असलेल्या वनस्पती वाढविता येण्याची किमया हायड्रोपोनिक्स या तंत्राने साध्य करता येते हे आता स्पष्ट झाले आहे. हायड्रोपोनिक्स ही संकल्पना नवी नाही. आज जगभरात अनेक ठिकाणी हरितगृहे आणि घराघरातून या पद्धतीने शेती केली जात आहे. गेली ३० वर्षे या प्रकारे वनस्पती वाढविल्या जात आहेत. मात्र या पद्धतीने वनस्पती वाढविण्याचा इतिहास फार प्राचीन म्हणजे ख्रिस्तपूर्व ६०० काळात सुद्धा सापडतो. अर्थात त्या वेळची पद्धत आणि आता अनेक संशोधनानंतर विकसित झालेली पद्धत …

हायड्रोपोनिक्स, या तंत्राने मातीशिवाय करा शेती .

आणखी वाचा
man in red polo shirt and blue denim jeans sitting on brown wooden bench during daytime

सेंद्रिय खते म्हणजे काय/ कसा करावा त्यांचा वापर

शेती, बागकाम किंवा उद्यान कलेत जमिनीमधील पिकाऊपणा, तिचा पोत, प्रत यावर जमिनीतून मिळणारे उत्पन्न किती आणि कसे मिळणार हे अवलंबून असते. अशावेळी जमिनीतील पोषकमूल्यांचे प्रमाण योग्य राखून पिकांच्या वाढीसाठी त्याचा वापर करून घेतला जातो. जमीन सुपीक या सदरात मोडणारी नसेल तर त्या जमिनीला खतांचा पुरवठा करून तिची प्रत सुधारता येते हे आपल्याला माहिती असते. वनस्पतींची वाढ सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनही योग्य प्रमाणात होत नसेल तर जमिनीतील पोषण द्रव्यांचा तोल बिघडला आहे असे लक्षात येते. अशा वेळी खतांचा वापर उपयुक्त ठरतो आणि त्यामुळे वनस्पतीची वाढ योग्य प्रमाणात होऊ शकते.  ज्या भागात नैसर्गिक रित्याच जमीन सुपीक आहे, तेथेही पिके वाढत असताना, जमिनीतील पोषण द्रव्ये शोषून घेत असतात आणि ही शोषलेली पोषण द्रव्ये जमिनीला पुन्हा मिळावीत यासाठी सुद्धा खतांचा वापर करावा लागतो. जमिनीत आवश्यक असणारी पोषण द्रव्ये खतांच्या माध्यमातून देता येतात. फुले येणारी किंवा बहारणाऱ्या वनस्पतींना, झाडांना पोषण द्रव्यांची गरज जास्त प्रमाणात असते. या वनस्पतींना चांगला बहर यावा आणि उन्हाळ्यात सुद्धा तो …

सेंद्रिय खते म्हणजे काय/ कसा करावा त्यांचा वापर .

आणखी वाचा
green leaf vegetable

शेतीमालाची थेट विक्री

शेतकर्‍यांना स्वावलंबी करणारा व्यापार  थोडी पार्श्‍वभूमी शेतकरी हा पिढ्यान्पिढया नाडला गेलेला वर्ग आहे. मुळात तो अशिक्षित, असंघटित तर आहे त्यामुळे व्यापारी, अडते आणि दलाल त्याला अनेक प्रकारे लुबाडत असतात. त्याचा माल स्वस्तात खरेदी करण्यासाठी त्याची कोंडी करीत असतात. त्याचा माल स्वस्तात घेऊन तो किती तरी महागात विकण्याची त्यांची प्रवृत्ती असते. याचा अनुभव शेतकरी नेहमीच घेत असतात. पण या पिळवणुकीतून आपली सुटका कशी करून घ्यावी याचा मार्ग काही त्यांना सापडत नाही. सरकारचेही धोरण शेतकर्‍यांचाच घात करणारे असते. कारण शेतीत पिकणारा माल हा जीवनावश्यक असतो आणि तो शहरातल्या गरिबांना स्वस्तात मिळाला पाहिजे यासाठी सरकार शेती मालाच्या किंमती वाढू देत नाही. त्यांच्या किंमती वाढल्या की शहरात महागाई वाढली म्हणून आरडा ओरडा केला जातो आणि परिणामी  सरकार शेतीमालाच्या किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतेे. शेतीमालाच्या किंमती बाबत असा एक सिद्धांत मांडला जातो की, त्या किंमती केवळ मागणी पुरवठा किंवा उत्पादन खर्च यावर आधारलेल्या नसतात. तो माल खरेदी करणार्‍यांच्या ऐपतीवरही त्या ठरत असतात. देशातल्या जनतेची क्रयशक्ती

आणखी वाचा
मी आत्मनिर्भर बनणार

माहिती मिळविण्यासाठी सबस्क्राइब करा

प्रत्येक आठवड्यला नवीन माहिती 

closeup photo of silver iMac