पाळीव प्राण्यांची मनापासून आवड असणारे आणि स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय असावा अशी इच्छा असणाऱ्यांनी पेट स्टोअर्स या व्यवसायाचा विचार करण्यास हरकत नसावी. आवडीचे काम शिवाय पैसे मिळविण्याची संधी यामुळे मिळू शकते. आज अनेक कारणांनी पाळीव प्राणी, पक्षी, मासे पाळले जात आहेत. एकाकीपण घालविणे, सोबत, घरातील एकट्या लहान मुलांना कंपनी अश्या अनेक कारणांनी आवडीचे प्राणी पक्षी पाळण्याची क्रेझ भारतात सुद्धा वाढली असून या पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक असलेल्या अन्न, कपडे, खेळणी व अन्य प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. परिणामी या व्यवसायाचा विकास वेगाने होत असल्याचे आकडेवारी सांगते. प्राणी, पक्षी, मासे यांच्या साऱ्या गरजा पेट स्टोअर्स पुऱ्या करत असते. तुम्हाला पेट स्टोअर्स सुरु करावे असे वाटत असेल तर त्या संदर्भात तुम्ही अगोदर सर्व माहिती गोळा करायला हवी. नुसते पेट स्टोअर्स याला काही अर्थ नाही. कारण या अंतर्गत अनेक प्रकार येतात त्यातील नक्की काय तुम्हाला सुरु करायचे आहे का सर्व सेवा द्यायच्या आहेत याचा विचार करायला हवा. या मागचे मुख्य …

पेट स्टोअर्स – एक फायदेशीर व्यवसाय
माहिती शेअर करा
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on email