हायड्रोपोनिक शेती – विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान

तुम्हाला शेती करायची आहे का ? हो..नक्कीच. तुमच्याकडे शेती करण्यासाठी योग्य जमीन आहे का? नाही, त्याचीच तर अडचण आहे. पण कोण म्हणते शेती करण्यासाठी जमीन लागते, सगळेच. पण आम्ही जर म्हणालो जमिनीशिवाय आणि मातीशिवायही तुम्ही शेती करू शकाल आणि तेही उत्तम कमाईसहीत, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खर असून सहज शक्य आहे फक्त हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून. दिवसेंदिवस वाढत जाणारी आपली लोकसंख्या हे आपल्या देशापुढील आव्हानही आहे व ती आपली ताकदही आहे. या लोकसंख्येच्या गरजेसाठी शहरीकरण जितके गरजेचे आहे तितकेच त्यांची भूक सुद्धा. पण शेतीपूरक जमिनीवरच जर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या तर शेती करायची कुठे. ह्या इमारतींमध्येच. कसे? हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून. अजूनही खरे वाटत नाही मग ही काही नजीकची उदाहरणे पहा.

  • हर्बीवोर फार्म्स – मुंबई अंधेरी येथे फक्त १००० स्क्वे. फूट. एवढ्या जागेत २५०० व्यावसायिक झाडे लागवड केली आहेत. (प्रति महिना ५ लाखाहून जास्त उत्पन्न)
हायड्रोपोनिक शेती - विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान
  • चेन्नईस्थित राहुल ढोका यांनी स्वतःच्या टेरेसवर फक्त ८० स्क्वे.फूट जागेत ६००० झाडे यशस्वीरीत्या लावून उत्तम अर्थार्जन केले आणि ते आता अनेक तरुणांना ऍक्वाफार्म्स या त्यांच्या कंपनीद्वारे हायड्रोपोनिक शेतीचे मार्गदर्शन करत आहेत.
हायड्रोपोनिक शेती - विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान
  • चांगल्या पगाराची नोकरी सोडून अजय नाईक यांनी गोवा येथे स्वतःची ‘लेतसेत्रा ऍग्रीटेक’ नावाची कंपनी सुरु केलेली असून हायड्रोपोनिक शेतीद्वारे ते महिन्याला अनेक टन रसायनविरहित भाजीपाल्यांचे उत्पादन घेत आहेत आणि ते ही फक्त १५० स्क्वे.मी. एवढ्याश्या जागेत.
हायड्रोपोनिक शेती - विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान
  • विपीनराव यादव हा हरियानातील फक्त २० वर्षाचा तरुण व प्रगत शेतकरी हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून महिना ४० ते ५० हजार कमवीत आहे.
हायड्रोपोनिक शेती - विज्ञानाचे शेतीला लाभलेले वरदान

मित्रांनो ही तर काही प्रातिनिधिक उदाहरणे झाली. आज आपल्या देशात असे अनेक शेतकरी व स्टार्टअप्स हायड्रोपोनिक शेतीद्वारे दुप्पट/तिप्पट उत्पादन घेऊन चांगली कमाई करत आहेत.

मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल पारंपरिक शेतीपेक्षा हायड्रोपोनीक शेती का निवडावी? तर हायड्रोपोनीक शेतीचे काही ठळक फायदे हे आहेत:

  • पारंपरिक शेतीपेक्षा हायड्रोपोनीक शेतीला ९०% कमी पाणी लागते आणि म्हणूनच याला भविष्यातील भरवशाची शेती असेही म्हणतात.
  • आहे त्याच जागेत ३ ते १० पट अधिक उत्पन्न घेता येते.
  • निसर्ग चक्रावर अवलंबून नसलेला शेतीप्रकार – बाराही महिने करता येणारी शेती
  • पिकांना कीड लागत नसल्याने कोणत्याही रासायनिक तण किंवा कीटक नियंत्रण उत्पादनांची आवश्यकता नाही
  • उत्पादित माल उच्च पौष्टिक मूल्यासहीत
  • प्रगत तंत्रज्ञाची जोड दिल्यास पारंपरिक शेतीपेक्षा ४०% जलद फळे व भाज्या उत्पादित करता येतात
  • अनेक हॉटेलचालकांना बारमाही लागणारा भाजीपाला उत्पन्न घेतल्याने भरगोस कमाईची खात्री

हायड्रोपोनीक – विज्ञान आणि शेती याचे आहे का नाही अनोखे मिश्रण. मग तुम्हालाही स्वतःची शेती करून यशस्वी उद्योजक व्हायचे आहे का ? जाणून घ्यायची आहे का हायड्रोपोनिक शेतीबद्दलची विस्तृत आणि अचूक माहिती. मग आजच आमचा हा लेख वाचा. आमच्या ह्या लेखात तुम्हाला याची माहिती मिळेल – हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय ? हायड्रोपोनिक शेतीच्या पद्धती, हायड्रोपोनिक शेतीसाठी लागणारी साधने, हायड्रोपोनिक शेतीमध्ये वापरली जाणारी ग्रोइंग माध्यमे, हायड्रोपोनिक शेतीतील पोषण द्रव्यांचे मार्गदर्शन, हायड्रोपोनिक शेतीसाठी लागणारी प्रकाश व्यवस्था आणि हायड्रोपोनिक शेतीद्वारे घेता येणारी पिके किंवा उत्पादने.

कोरोनामुळे आपण काय शिकलो ? आपली जीवनशैली, आपले आरोग्य आणि आपला परिवार ह्या अमूल्य गोष्टी आहेत त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसाय सुरु असताना सुद्धा त्याच्या जोडीला एखादा असा उद्योगधंदा हवा जो अश्याकाळातही तुम्हाला चांगले पैसे मिळवून देईल. हायड्रोपोनिक शेती ही एक सुवर्णसंधी असून त्यातील बारकावे जाणून घेण्यासाठी आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि अश्याच नवनवीन उद्योगधंद्याची संपूर्ण माहिती मिळवा.   

 अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेअर करा

Leave a Comment