शेती, बागकाम किंवा उद्यान कलेत जमिनीमधील पिकाऊपणा, तिचा पोत, प्रत यावर जमिनीतून मिळणारे उत्पन्न किती आणि कसे मिळणार हे अवलंबून असते. अशावेळी जमिनीतील पोषकमूल्यांचे प्रमाण योग्य राखून पिकांच्या वाढीसाठी त्याचा वापर करून घेतला जातो. जमीन सुपीक या सदरात मोडणारी नसेल तर त्या जमिनीला खतांचा पुरवठा करून तिची प्रत सुधारता येते हे आपल्याला माहिती असते. वनस्पतींची वाढ सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनही योग्य प्रमाणात होत नसेल तर जमिनीतील पोषण द्रव्यांचा तोल बिघडला आहे असे लक्षात येते. अशा वेळी खतांचा वापर उपयुक्त ठरतो आणि त्यामुळे वनस्पतीची वाढ योग्य प्रमाणात होऊ शकते. ज्या भागात नैसर्गिक रित्याच जमीन सुपीक आहे, तेथेही पिके वाढत असताना, जमिनीतील पोषण द्रव्ये शोषून घेत असतात आणि ही शोषलेली पोषण द्रव्ये जमिनीला पुन्हा मिळावीत यासाठी सुद्धा खतांचा वापर करावा लागतो. जमिनीत आवश्यक असणारी पोषण द्रव्ये खतांच्या माध्यमातून देता येतात. फुले येणारी किंवा बहारणाऱ्या वनस्पतींना, झाडांना पोषण द्रव्यांची गरज जास्त प्रमाणात असते. या वनस्पतींना चांगला बहर यावा आणि उन्हाळ्यात सुद्धा तो …

सेंद्रिय खते म्हणजे काय/ कसा करावा त्यांचा वापर
- July 18, 2020
- , 12:57 pm
- , शेती
माहिती शेअर करा
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on email