ऑनलाईन पैसे कमावण्याचा राजमार्ग ( Best selling Niche bussiness to make money online )

सामान्यपणे ऑनलाईन व्यवसाय (Online bussiness) सुरू करताना व्यावसायिक आपल्या उत्पादनाभोवती सर्व व्यवसायाची आखणी करतात. आपली वेबसाईट तयार करतात. जाहिरातींचे नियोजन करतात. ऑनलाईन शॉपिंग कार्ट (Online shopping cart, स्टोअरवर आपले उत्पादन ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल यासाठी सुविधा मिळवोन देतात. ही सर्व आखणी उत्पादनाच्या भोवतीच केलेली असते. आपला व्यवसाय भरभराटीला येणार याची त्यांना खात्रीच असते. मात्र या सर्व खटाटोपात सर्वात प्राथमिक पायरीच ओलांडणे राहून जाते. ते म्हणजे आपल्या उत्पादनाची ग्राहकाला गरज आहे का, ग्राहक हे उत्पादन विकत घेऊ इच्छितात का, याचा सारासार विचार करणे अत्यावश्यक आहे.

ऑनलाईन व्यवसायात खात्रीपूर्वक यश मिळवायचे असेल तर काहीतरी विलक्षण कल्पना लढवून आपले उत्पादन किंवा सेवा विकसित करणे आणि मग ते विकले जाण्याची वाट बघणे यापेक्षा सध्या जे विकले जात आहे, ज्याची समाजात गरज आहे, ज्याला बाजारपेठेत मागणी आहे, असे उत्पादन किंवा सेवा बाजारपेठेत आणणे सोपे आहे. कोणतेही उत्पादन बाजारात नाही यामागे कोणी यापूर्वी त्याच्याबद्दल विचारच केलेला नाही असे समजण्याचे कारण नाही. कोणीतरी त्याचा विचार केलेला असतो. ताशा प्रकारचे उत्पादन किंवा सेवा बाजारात आणलेलीही असू शकते. मात्र, मागणीअभावी हा प्रयत्न असफल झालेला असतो.

जे उत्पादन किंवा सेवा बाजारपेठेत विकले जाते त्याचीच कास धरून व्यवसायात उताराने अधिक फायदेशीर ठरते. ‘पायोनियर’ बनण्याच्या प्रयत्नात अडथळ्यांची शर्यत खेळावी लागते. त्यामुळे ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा,’ हे सूत्र कायम लक्षात ठेवावे. स्वतःचे उत्पादन बाजारपेठेत आणताना किंवा इतरांचे उत्पादन बाजारात विकताना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.

व्यवसायात यशस्वी होण्याची सूत्र हा काही नवीन शोध नाही. अनेकांनी ही सूत्र वापरून व्यवसायात यश प्राप्त केले आहे. लोकांच्या गरज आणि इच्छा लक्षात घेऊन निर्माण केलेले उत्पादन किंवा सेवा यांना हमखास यश मिळणारच. उत्पादनाचे स्वरूप बदलू शकते. मात्र येथे दिले जाणारे यशस्वी व्यवसायाचे मार्ग कायम राहणार आहेत. कारण मानवी आयुष्यातील ते अपरिहार्य घटक आहेत. इंटरनेटचा शोध लागण्यापूर्वीही ते अस्तित्वात होते आणि लोकप्रियही होते. ऑनलाईन व्यवसायात खात्रीने यश प्राप्त करायचे असेल तर खात्रीशीर नफा असलेल्या व्यापक बाजारपेठेच्या राजमार्गावरूनच पुढे जायला हवे.

फिटनेस आणि वेट लॉस (Fitness and Weight Loss)

woman in blue leggings and black tank top doing yoga


आपली देहयष्टी सुडौल असावी ही मानवाची अनादी काळापासूनची इच्छा आहे. त्यामुळे या इच्छेभोवती फिरणारी मोठी बाजारपेठ कित्येक वर्ष विस्तारतेच आहे. यामध्ये पूरक खाद्य (सप्लिमेंट्स), डाएट प्रोग्रॅम्स, वजन कमी करण्याचे खास व्यायाम प्रकार, औषधे या सर्वांचा समावेश आहे. जगभरातील कोणत्याही देशात, कोणत्याही वयोगटात वजन कमी करण्याची इच्छा असलेली माणसं निश्चितपणे आढळतात आणि त्यासाठीच्या उपायांचा व्यवसाय करणारेही तेवढ्याच मोठ्या संख्येने आढळतात. अर्थात या सगळ्या मोठ्या पसाऱ्यात आपला निभाव कसा लागणार असा विचार करण्याची आवश्यकता नाही. जिथे स्पर्धा अधिक तिथे नफा अधिक! हे क्षेत्र व्यवसायासाठी एवढे व्यापक आहे की त्यातला कणभर व्यवसाय जरी मिळवता आला तरी त्यातील उत्पन्न हे सहा- सात आकडी असेल.

आरोग्य (Health)

ऑनलाईन पैसे कमावण्याचा राजमार्ग ( Best selling Niche bussiness to make money online )


फिटनेस आणि वेट लॉस हे दोन्ही विषय एकमेकांशी संबंधित असले तरी त्यात काही फरक आहे. आरोग्य हा सध्याच्या काळात कळीचा विषय बनला आहे. लोकी स्वतःच्या आरोग्याबाबत सजग झाले आहेत. आरोग्याबाबत सरकार काय म्हणते किंवा आपले डॉक्टर काय सांगतात, या पलीकडे जाऊन जाणून घेण्याची किंवा आरोग्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. अर्थातच त्याभोवतीची बाजारपेठही तितकीच फोफावली आहे. त्यामुळे ग्लुटेन- फ्री (gluten-free )खाद्य, हर्बल औषधे (herbal remedies), पूरक खाद्य (सप्लिमेंट्स), हिलिंगचे विविध प्रकार, शरीरातील विषारी घटक  बाहेर काढणारे पदार्थ (डीटॉक्सिंग), असे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. आरोग्याशी निगडीत कोणताही घटक आपल्याला रोगांपासून दूर ठेवतो आणि दीर्घायुष्य प्रदान करतो.

पर्यायी उपचार पद्धती हा प्रकार सध्या खूप लोकप्रिय आहे. आपण मुख्य प्रवाहातील औषधोपचाराबद्दल बोलत नाही आहोत. पर्यायी उपचारपद्धती हा वेगळा प्रकार आहे.तो रोगापाऊण मुक्ती देतो आणि निरामय आरोग्य प्रदान करतो. मात्र, सर्वसामान्यांना त्याबद्दल माहिती मिळू नये, अशीच औषध उत्पादक कंपन्यांची इच्छा असते.

या क्षेत्रात नफा कमविण्याच्या अमर्यादित संधी आहेत. या विषयावरील पुस्तके, पूरक खाद्य, माहिती देणारी साधने, प्रशिक्षण अशा विविध प्रकारे व्यवसाय उभा करता येऊ शकतो. या क्षेत्रात सातत्याने नव्या बाबी घडत असतात. सध्या केटो चॉकलेट्स (Keto Chocolates) आणि सीबीडी तेलांची (CBD Oils) चालती आहे. मात्र, या क्षेत्रात प्रस्थापित होण्यासाठी किमान स्तरावरील प्रशिक्षण, कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.

डेटींग आणि रिलेशनशिप (Dating and Relationships)

नातेसंबंध प्रस्थापित करणे, टिकविणे, वृद्धिंगत करणे ही माणसाची आवश्यक गरज आहे. कोणी प्रेमाचा भुकेला असेल तर तो ऑनलाईन डेटींग साईट धुंडाळतो. कोणाच्या नातेसंबंधात काही कुरबुरी असतील तर नटे टिकविण्यासाठी त्याला सल्ला हवा असतो. नातं जमवणं, टिकवणं वाढवणं ही आयुष्यातील अत्यावश्यक बाब आहे आणि तेवढीच कठीणही आहे. अर्थातच या क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. डेटिंग वेबसाईटचा प्रचार, प्रसार (प्रमोशन) केल्यास त्यांच्याकडून पैसे मिळू शकतात. नातेसंबंध, पस्पर संवाद या विषयांवरील पुस्तके, गाईड्स हा दोखील उत्पन्नाचा प्रभावी मार्ग असू शकतो. समलिंगी, विशिष्ट जाती- धर्मातील लोक, जोडपी, घटस्फोटीत अशा विविध प्रकारच्या लोकांसाठी डेटिंगची देवा देण्याचा व्यवसाय निश्चितपणे फायदा देणारा आहे.

स्वयंसुधारणा (Self Improvement)

सेल्फ इंप्रूव्हमेंट किंवा सेल्फ हेल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकारात ऑनलाईन व्यवसायाच्या अनेक संधी आहेत.ऑनलाईन अभ्यासक्रम, प्रशिक्षण, व्हिडीओज (Videos), पुस्तके अशा अनेक प्रकारे या क्षेत्रात व्यवसाय करता येतो. आत्मविश्वास वाढविणे, आत्मसन्मान निर्माण करणे, ध्येयनिश्चिती करून ती गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न, नकारात्मक मानसिकतेपासून मुक्तता अशा अनेक गोष्टींवर काम करणे शक्य आहे. आनंदी व्हावे, समाधानी असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अमर्याद संधी आहेत. त्यासाठी आपले मोठे नाव असण्याची गरज नाही किंवा ‘द सिक्रेट’सारखे पुस्तक लिहिण्याचीही गरज नाही. या क्षेत्रात व्याप्ती एवढी प्रचंड आहे की त्यातून नक्कीच फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय उभा राहू शकतो.

गुंतवणुकीद्वारे धनसंपदा (Guide on Wealth Building Through Investing)

ऑनलाईन पैसे कमावण्याचा राजमार्ग ( Best selling Niche bussiness to make money online )


पैसे कमावण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. शेअर्स (Shares), बॉण्ड्स (Bonds), ऑप्शन्स (Options), फ्युचर्स (Futures), फोरेक्स (Forex) यामध्ये गुंतवणूक करून पैसे कमावता येतात.. गुंतवणुकीतून खोऱ्याने पैसे कमावणाऱ्या कोट्यधीशांबद्दल आपण नेहेमीच ऐकत असतो. त्यांच्यासारखे श्रीमंत होण्याची आपली इच्छा असते. खरे तर आपल्यापैकी अनेकांना गुंतवणुकीबाबत पुरेशी माहिती नसते. त्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची गरज आहे. गुंतवणूक कुठे करायची याबाबत सल्ल्याची आवश्यकता असते. याच ठिकाणी व्यवसायाची संधी उपलब्ध होते. ट्रेडींग सेवा, आर्थिक घडामोडींची माहिती देणारे वृत्तपत्र, ट्रेडिंगची साधने अशा अनेक प्रकारे गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचता येते. गुंतवणुकीबद्दल माहिती देता येते. गुंतवणुकीसाठी आवश्यक भांडवल, गुंतवणूक कुठे करावी, दे ट्रेडींग, स्पेक्युलेटीव्ह पेनी स्टॉक (speculative penny stock recommendations) याबद्दल माहिती देता येते. यासाठी मोठी गुंतवणूक किंवा गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार याची आवश्यकता नसते. प्राथमिक भांडवल आणि बचत त्यासाठी पुरेशी ठरते. केवळ कुपन्सचा वापर करून बचत कशी करावी हे लोकांना शिकवून ६ आकडी उत्पन्न मिळवणारेही अनेक जण आहेत. शेअर मार्केट वर जात आहे की खाली येत आहे, महागाई आहे की स्वस्ताई, बुल, बेअर मार्केट एवढे ज्ञानही पुरेसे ठरते. लोकांना बाजारातून केवळ पैसे कमावण्यात रस असतो. अर्थव्यवस्थेची अवस्था कशी आहे, याच्याशी बहुतेकांना काही देणे- घेणे नसते. या क्षेत्रातही नवनवीन संधी सातत्याने उपलब्ध होत आहेत. सध्या बिटकॉइन (Bitcoin) आणि क्रिप्टोकरन्सी (Crypto currency) बद्दल मोठी उत्सुकता आहे. याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे.

इंटरनेटद्वारे पैशांची कामे (Make Money on the Internet)

ऑनलाईन पैसे कमावण्याचा राजमार्ग ( Best selling Niche bussiness to make money online )


आपल्याला ज्या क्षेत्रातील ज्ञान आहे, आपल्याकडे जे कौशल्य आहे ते इतरांना इंटरनेटद्वारे शिकवून पैसे कमावता येतात. त्यासाठी ई बुक्स, ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग, अशा साधनांचा उपयोग करता येऊ शकतो. अशा प्रकारे स्थिरस्थावर झालेल्या एखाद्या यशस्वी उद्योगाचा प्रचार- प्रसार करूनही पैसे मिळविता येतात. नेटवर्क मार्केटींग ( मल्टीलेव्हल मार्केटींग नाही) हा देखील चांगला पर्याय आहे.कोणतेही उत्पादन ऑनलाईन विक्री करण्यासाठी ऑनलाईन बिझनेसची उभारणी करता येऊ शकते किंवा आपण कोणत्या पद्धती वापरून आपला व्यवसाय वाढविला याबद्दल, इंटरनेट मार्केटींगबद्दल इतरांना शिकवता येते.    

ब्युटी ट्रीटमेंट्स (Beauty Treatments)

ऑनलाईन पैसे कमावण्याचा राजमार्ग ( Best selling Niche bussiness to make money online )


आपली त्वचा नितळ असावी, आपला चेहरा उजळलेला असावा, त्वचेवरच्या सुरकुत्या घालवाव्या, कायम तरुण दिसावे, असे अनेकांना वाटत असते. त्यामुळे वयाच्या खुणा घालविण्याचा दावा करणारी अनेक क्रीम, मलम, औषधे लोकप्रिय आहेत. अँटी एजिंग कॉस्मॅटीक उपचार, स्कीन केअर प्रोडक्टस याची भली मोठी बाजारपेठ आहे. या उत्पादनांचा वापर कसा करावा याची माहिती यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून देणे, अर्थात इन्फ्लुएंसर म्हणून काम करणे खूपच फायदेशीर आहे.

उपकरणे आणि तंत्रज्ञान (Gadgets and Technology)

ऑनलाईन पैसे कमावण्याचा राजमार्ग ( Best selling Niche bussiness to make money online )


सध्याच्या काळात अनेक प्रकारची साधने आणि उपकरणे मानवी जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनली आहेत. टॅब्ज, स्मार्टफोन्स, इअरफोन्स, कंप्युटर स्पीकर्स, एमपी ३ प्लेअर्स, स्वयंपाक घरातील स्मार्ट उपकरणे, सेलफोनची कव्हर्स अशा उपकरांवाचून लोकांचे पानही हलत नाही.नवीन तंत्रज्ञान सर्वांनाच हवे असते. यातूनच उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो.

ऍमेझॉनसारख्या वेबसाईटचा ई-टेलर (e-tailer) म्हणून काम करता येऊ शकते. alibaba.com सारख्या वेबसाइटवरून विविध वस्तू आयात करून त्याची विक्री करता येते. थेट उत्पादक किंवा होलसेलरशी संपर्क करून अधिक नफा मिळविणे शक्य आहे. पैसे कमावण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. बाजारात येऊ घातलेले नवे तंत्रज्ञान किंवा उत्पादनाची माहिती याद्वारे देता येऊ शकते. अशा उत्पादनांची माहिती आणि रिव्ह्यूज देणारी वेबसाईटही चालविता येईल. त्यामध्ये माहिती उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या खरेदीसाठी ऍफिलिएट लिंक देऊन त्याद्वारे खरेदीची सुविधा दिल्यास कमिशन मिळू शकते.

पर्सनल फायनान्स (Personal Finance)

क्रेडिट स्कोअर( credit score), मॉर्गेज रिफायनान्सिंग (Mortgage refinancing), कर्जमुक्ती, व्यक्तिगत कर्ज अशाअनेक बाबींमध्ये अनेकांना मार्गदर्शनाची गरज असते. आपले पैसे सुरक्षित कसे ठेवावे, तातडीच्या खर्चासाठी पैसे कसे उपलब्ध करून घ्यावे, पैशाचे नियोजन कसे करावे, कमीतकमी व्याजात कर्जफेड कशी करावी, कमी व्याजात कर्ज कसे मिळवावे यासाठी, दिवाळखोरीसारख्या प्रसंगात त्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी यासाठी मार्गदर्शन हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. आपण स्वतः कायदेशीर सल्ला अथवा सेवा दु शकलो नाही तरी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सुचवू शकतो. वित्त संस्थांचे ऍफिलिएट (Affiliate) म्हणून काम करता येऊ शकते. या सर्व कामांची माहिती देणारे ई लर्निंग प्रोग्रॅम्सही तयार करता येतील.

(Niche Marketing) ‘निशे मार्केटींगद्वारे पैसे मिळवण्यास प्रारंभ करताना…

१) सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप टेन निशेजचा आढावा घ्या. आपल्याला रस असलेल्या किंवा उत्पादनाला उपयुक्त पर्याय निवडावा.

२) clickbank.com,  CJ Affiliate, Amzon अशा ऍफिलिएट नेटवर्क्सवरील बेस्ट सेलर्स उत्पादनांचा आढावा घ्या.

३) इतर ऑनलाईन बिझनेसेस त्यांच्या उत्पादनाचा प्रचार करण्यासाठी ईमेल मार्केटींग (E-Mail Marketing), सोशल मीडिया (Social Media), मार्केटींग फॅनेल्स (Marketing Funnels) यापैकी कोणत्या साधनांचा वापर करतात ते पहा.

४) व्यवसायाची सुरुवात करताना ऍफिलिएट मार्केटींग (Affiliate Marketing) हा कमी धोक्याचा आणि अधिक फायद्याचा मार्ग आहे हे लक्षात घ्या. ऑनलाईन बिझनेस वाढल्यानंतर रूमही स्वतःचे उत्पादन बाजारपेठेत अनु शकता.


इतरांच्या उत्पादनांचे एफिलिएट (Affiliate) म्हणून प्रचार- प्रसार करणे, माहिती देणारी साधने विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी भागीदारी करणे, उत्पादने आणि डिजिटल उत्पादनाचा प्रचार करणे, आपल्या वेबसाईटद्वारे इतर उत्पादनांची जाहिरात करणे हे ऑनलाईन व्यवसाय करून पैसे कमावण्याचे खात्रीशीर मार्ग आहेत.    

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेअर करा

Leave a Comment