प्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय

प्रिंट ऑन डिमांड – आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय

तुम्ही कल्पक आहात का ? हो.. तुमच्या कल्पकतेचा तुम्ही योग्य वापर करत आहात का? कदाचित नाही.. तुमची नोकरी अथवा व्यवसाय सांभाळून तुम्हाला तुमच्या कल्पकतेचा वापर करून सोप्या आणि खात्रीशीर मार्गाने चांगले पैसे कमवायचे आहेत का ? हो, नक्कीच.. मग तुम्हाला ‘प्रिंट ऑन डिमांड’ या मॉडेलद्वारे आपल्या भन्नाट कल्पकतेचा वापर करण्याची सुवर्णसंधी तर आहेच पण त्याचबरोबर कोणतीही गुंतवणूक न करता स्वतःचा एक वेगळा ई -कॉमर्स व्यवसायही तुम्ही सुरु करू शकता.

पण काय आहे हे प्रिंट ऑन डिमांड ? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ‘मागणी तशी छपाई’ आणि ती पण ग्राहकाला आवडेल त्या वस्तूवर. अधिक समजून घेण्यासाठी ही काही प्रिंट ऑन डिमांड उत्पादने पहा.

1) मेसेज असलेला टी-शर्ट                                  

प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय 9

2) आवडता मेसेज छापलेले मोबाईल कव्हर

प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय 10

3) डिझाईन छापून बनविलेला कॉफी मग                     

प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय 11

4) पाहिजे तो मेसेज छापून बनविलेली कॅप

प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय 12

5) आपल्या आवडीचे डिझाईन छापून तयार केलेले वेगवेगळे प्रॉडक्ट्स

प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय 13

अश्याच प्रकारे तुम्ही जिम बॅग, जॅकेट्स, बेडशीट्स, पिलो कव्हर्स, टॉवेल्स, ऑफिसची डायरी, वॉल स्टिकर यासारख्या १००० हून अधिक प्रॉडक्ट्सवर तुमचे डिझाईन छापून जगभरातील अनेक ग्राहकांना ते विकू शकता.

तर आता तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल प्रिंट ऑन डिमांड काय आहे ते. आता तुम्ही म्हणाल ते सगळं ठीक आहे पण हा व्यवसाय सुरु करण्यासाठी किती भांडवल लागत तर याच उत्तर आहे शून्य. निव्वळ शून्य रुपयात तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता, तुमची कल्पकता हेच तुमचं भांडवल आणि डिझाईन म्हणजे फक्त ग्राफिक्स नव्हे तर एखादा शब्द, एखादे वाक्य, एखादी म्हण, एखादा श्लोक, एखादी घोषणा यांचासुद्धा तुम्ही कल्पकतेने वापर करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचे डिझाईन तयार करून ते तुम्हाला सोयीस्कर असणाऱ्या कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, पिंटरेस्ट, ब्लॉग, ई-कॉमर्स वेबसाइट ईत्यादि) प्रदर्शित करा, ज्याला ते डिझाईन आवडेल तो ग्राहक ते उत्पादन ऑर्डर करेल आणि मग ज्या प्रिंट-ऑन-डिमांड कंपनीला तुम्ही ही ऑर्डर द्याल ते तुमचे प्रॉडक्ट तुमच्या डिझाईनची छपाई करून तुमच्या ग्राहकाला घरपोच वितरण करतील. मग यातून तुम्हाला काय मिळणार? तुमच्या डिझाईनचा मोबदला. म्हणजे उदाहरणसाठी समजा एक टी-शर्ट जर कंपनी ग्राहकाला तुमच्या डिजाईन सहित ५०० रुपयांना विकत असेल तर तुम्हाला त्यातून नक्कीच १०० ते १५० रुपयांचा थेट नफा मिळणार. अश्याचप्रकारे महिन्याला विविध प्रकारचे हजारो प्रॉडक्ट्स विकून अनेक तरुण आणि अनेक कंपन्या लाखो रुपये कमवीत आहेत. विश्वास बसत नाही तर ही पहा काही यशस्वी उदाहरणे.

 • चार्ल्स स्मिथ नावाच्या अटलांटामध्ये राहणाऱ्या एका गृहस्थांनी प्रिंट-ऑन-डिमांड मॉडेलद्वारे एका वर्षात $१,००,००० हून अधिक कमाई केली आणि आज ‘Black Father Exists’ या त्यांच्या डिझाईनला जगभरात प्रचंड मागणी आहे.
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय 14
 • मुबेद सयीद हे ‘माय ड्रीम स्टोर’ या त्यांच्या प्रिंट-ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मद्वारे दिवसाला १००० हून अधिक विविध प्रॉडक्ट्सची विक्री करून महिन्याला लाखो रुपये कमवीत आहेत        
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय 15
 • चार मुलांची आई असणाऱ्या लीऑरा गोरेन या घर सजावटीच्या विविध प्रोडक्टसचे आकर्षक डिझाइन्स बनवून ते ‘प्रिंटिफाय’ या प्रिंट-ऑन- डिमांड प्लॅटफॉर्मद्वारे प्रदर्शित करून महिन्याला उत्तम अर्थार्जन करीत आहेत.
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय
प्रिंट ऑन डिमांड - आत्मनिर्भर होण्याचा एक अनोखा पर्याय 16

काय वाटत तुम्हाला – प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसाय सोप्पा आहे का नाही ? हो नक्कीच सोप्पा आहे पण या सोप्या कामात सुद्धा अनेक जण अयशस्वी होतात कारण या व्यवसायाबद्दल योग्य माहिती न घेता ते या क्षेत्रात उतरतात. मग कुठे मिळेल या व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन – आमच्या या लेखात.

 अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

प्रिंट-ऑन-डिमांड – बिनभांडवली सुरु करता येणारा अनोखा ई-कॉमर्स व्यवसाय

ई -कॉमर्स व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी ह्या लेखात प्रिंट ऑन डिमांड म्हणजे काय? प्रिंट ऑन डिमांड व्यवसायाची प्रक्रिया, प्रिंट ऑन डिमांड व्यवसायाचे फायदे व तोटे, प्रिंट ऑन डिमांड क्षेत्रात चालणारे प्रॉडक्ट्स, प्रिंट ऑन डिमांड व्यवसायाचे इतर बारकावे या सर्व बाबींची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे.

प्रिंट ऑन डिमांड व्यवसाय का करावा ?

 • सहज आणि सोपा व्यवसाय सेट-अप
 • कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही
 • कोणतीही गुंतवणूक नाही – तुमचे डिझाईन हेच तुमचे भांडवल 
 • प्रॉडक्ट साठवणूक करण्याची गरज नाही
 • प्रॉडक्टचे उत्पादन, त्याचे शिपिंग व डिलिव्हरी याचा खर्च नाही
 • १२ ही महिने मागणी असलेला व्यवसाय
 • तुमचे  प्रॉडक्ट छापून देण्यासाठी भारतात २५० हून अधिक प्रिंट ऑन डिमांड कंपन्या
 • एकदाच बनवा – हजारदा विका या प्रकारचे सर्वात किफायतशीर बिजनेस मॉडेल

मित्रांनो, कशी वाटली ही वेगळ्या उद्योगाची कल्पना ? सोपी, खात्रीशीर आणि फायदेशीर सुद्धा. अनेकजण आपली भन्नाट कल्पनायुक्ती वापरून या व्यवसायात उत्तम अर्थार्जन करत आहेत. प्रिंट ऑन डिमांड या ई -कॉमर्स मॉडेलद्वारे अर्थार्जन करणे नक्कीच सोपे आहे आणि याची मागणी भविष्यात संपूर्ण जगभर ही वाढतच जाणार आहे आणि म्हणूनच या व्यवसायाचे अनेक बारकावे आम्ही सविस्तरपणे आमच्या विविध लेखांद्वारे आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. या उपयुक्त खजिन्यासाठी आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि अश्याच नवनवीन उद्योगधंद्याची संपूर्ण माहिती मिळवा.

शेअर करा

Leave a Comment