person holding leafed plant

हायड्रोपोनिक फार्मिंग साठी बिया अधिक योग्य का?

घरातल्या घरात, मातीशिवाय आणि हवामानासह संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात ठेवता येणारी हायड्रोपोनिक फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय आणि ती कशी काम करते याची माहिती करून घेतल्यानंतर काही जणांनी हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात केली असेल. काही जणांची कदाचित  पहिली ग्रो सिस्टम यशस्वी ही झाली असेल आणि आता त्यांना या सिस्टीमचा विस्तार वाढवायचा आहे त्यांनी हा लेख अवश्य वाचायला हवा. अर्थात हायड्रोपोनिक सिस्टीम उभी करताना संबंधितानी दीर्घ संशोधन, वाचन, रोपवाटिका, स्थानिक बाजार, बागकामासाठी आवश्यक साहित्याची विक्री करणारी दुकाने यांची माहिती मिळवूनच ही सिस्टीम उभारलेली असणार. हायड्रोपोनिक सिस्टीममध्ये तुम्ही लावलेल्या पहिल्या वनस्पतीची वाढ योग्य तऱ्हेने झाली की हे सारे कष्ट सार्थकी लागले असे नक्कीच म्हणता येईल. हे पाहिले रोप तुम्ही कदाचित रोपवाटिका किंवा तयार रोपे विकणाऱ्या दुकानदारांकडून खरेदी केलेले असेल आणि हायड्रोपोनिकची सुरवात करताना तयार रोप आणणे किंवा अंकुरलेली छोटी रोपे आणणे हा चांगला पर्याय आहे. पण दीर्घकाळ तुम्ही हायड्रोपोनिक फार्मिंग करण्याचा विचार करत असाल तर मात्र तुम्ही स्वतः बियांपासून रोपे तयार करणे अधिक व्यवहार्य …

हायड्रोपोनिक फार्मिंग साठी बिया अधिक योग्य का? .

आणखी वाचा
person holding white plastic spoon in black and silver steel cup

घरी मेणबत्ती बनविण्याचा फायदेशीर व्यवसाय

काही तरी नवीन उद्योग करायचा विचार आहे किंवा घरबसल्या काहीतरी व्यवसाय सुरु करावा असे वाटत असेल तर बाजारात चांगली मागणी असलेल्या मेणबत्या, ते ही घरच्या घरी आणि फार भांडवल न गुंतवता करण्याचा व्यवसाय तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता. मेणबत्त्या हे उत्पादन नेहमी मागणी असलेले व्यावहारिक उत्पादन म्हणता येतील. यात सुद्धा तुम्ही किती कौशल्य प्राप्त करू शकता आणि खास तुमचा ठसा असलेल्या विविध प्रकारच्या, आकर्षक मेणबत्त्या बनवू शकता त्यावर तुम्ही किती कमाई या व्यवसायातून करू शकाल याचे प्रमाण ठरणार आहे. अर्थात कमाईचे हे प्रमाण केवळ तुमच्या मेणबत्त्या आकर्षक आहेत म्हणून ठरणार नाही तर त्यांचे मार्केटिंग योग्य प्रकारे करणे हाही महत्वाचा भाग आहेच. आज बाजारात अक्षरशः शेकडो प्रकारच्या मेणबत्त्या उपलब्ध आहेत. पारंपारिक मेणबत्त्या आहेत त्याचप्रमाणे डेकोरेटीव्ह म्हणजे सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या, अरोमा थेरपी मध्ये वापरल्या जाणाऱ्या, गिफ्ट देण्यासाठीचे विविध प्रकार सुद्धा बाजारात चांगले खपत आहेत. ज्यांना मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे, ते यातील अनेक प्रकार सहज बनवू शकतात. नवशिके व्यावसायिक सुद्धा …

घरी मेणबत्ती बनविण्याचा फायदेशीर व्यवसाय .

आणखी वाचा

हायड्रोपोनिक यंत्रणेत वाढविता येणाऱ्या काही वनस्पती

हायड्रोपोनिक फार्मिंग मध्ये कोणत्या वनस्पती वाढविता येतात या प्रश्नांचे उत्तर खरे तर कोणत्याही प्रकारच्या वनस्पती असे आहे. मात्र पाण्याच्या माध्यमातून ही शेती केली जात असल्याने सर्व वनस्पती चांगल्याच वाढतील असे नाही. त्यामुळे हायड्रोपोनिक फार्मिंग साठी कोणत्या वनस्पतींची निवड करावी याच्या काही टिप्स येथे देत आहोत. निदान सुरवात करताना योग्य वनस्पती निवडाव्यात. एकदा अनुभव आला की मग ही यादी सहज वाढविता येते. कारण हायड्रोपोनिक लागवडीसाठी योग्य अश्या अनेक वनस्पती आहेत. सुरवात करताना काही भाज्या, फळे आणि मुळे यांची माहिती आपण घेऊ. १)लेट्युस – ( थंड हवा आणि पीएच लेव्हल ६.० ते ७.० ) सॅलड, सँडविच साठी लेट्युस ही एक आदर्श भाजी मानली जाते. जगभर लेट्युसचा वापर केला जातो आणि हायड्रोपोनिक पद्धतीत वाढविल्या जाणाऱ्या भाज्यात ही मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते. वेगाने वाढणारी ही वनस्पती काळजी घेण्याच्या दृष्टीने सोपी आहेच पण एनएफटी, एरोपोनिक्स, एब अँड फ्लो अश्या कोणत्याही हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये चांगल्या प्रकारे वाढविता येते. ज्यांना हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात करायची आहे त्याच्यासाठी …

हायड्रोपोनिक यंत्रणेत वाढविता येणाऱ्या काही वनस्पती .

आणखी वाचा

हायड्रोपोनिक फार्मिंगचे २० फायदे आणि तोटे

तुम्ही व्यवसाय म्हणून किंवा छंद म्हणूनही हायड्रोपोनिक किंवा विना मातीच्या शेतीचा विचार करत असाल तर हे आधुनिक शेती तंत्रज्ञान माझ्यासाठी योग्य आहे काय हा पाहिला प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारायला हवा. याचे मुख्य कारण म्हणजे हायड्रोपोनिक शेतीचे सर्वांगीण स्वरूप पाहताना त्यात काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत हे लक्षात घ्यायला हवे. हे फायदे काय आणि तोटे काय आहेत हे अगोदरच समजावून घ्यायला हवेत. हायड्रोपोनिक शेतीचे फायदे आणि तोटे या विषयी माहिती या लेखात वाचायला मिळेल. हायड्रोपोनिक शेतीचे फायदे काय याची माहिती प्रथम घेऊ १)मातीची गरज नाही जेथे उपजाऊ जमीन मर्यादित आहे, किंवा अजिबात जमीन नाहीच किंवा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्याने नापीक झाली आहे तेथेही हायड्रोपोनिक पद्धतीने पिके घेता येतात. १९४० सालीच हायड्रोपोनिक पद्धतीचा यशस्वी वापर करून वेक आयलंड येथे तैनात असलेल्या चमूसाठी ताज्या भाज्या आणि फळे पिकविली गेली होती. पॅन अमेरिकन एअरलाइन्स या विमान कंपनीची विमाने येथे इंधन भरण्यासाठी थांबत असत. प्रशांत महासागरात हा भाग जिरायती जमिनीचा भाग …

हायड्रोपोनिक फार्मिंगचे २० फायदे आणि तोटे .

आणखी वाचा

अनुलंब म्हणजे व्हर्टिकल किंवा बहुमजली शेती

बहुमजली इमारती असतात त्याप्रमाणे उभ्या प्रकारात केलेली शेती किंवा बाग याना अनुलंब म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग असे म्हटले जाते. अशी शेती करण्याचे मुख्य कारण म्हणजे विशेषतः शहरी भागात उपजाऊ जमिनीचे कमी झालेले प्रमाण आणि दुसरे म्हणजे घरच्याघरात, कमी जागेत चांगले उत्पादन घेण्याची सुविधा. उंच सांगाडे उभारून त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे झुडपे, भाज्या, फळे पिकविण्याची ही पद्धत. आता त्याला मातीशिवाय म्हणजे हायड्रोपोनिक शेती तंत्राची साथ मिळाल्यामुळे याकडे भविष्यातील अन्न गरजा पुरविणारी शेती म्हणूनही पाहिले जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ही आधुनिक हायड्रोपोनिक व्हर्टिकल शेती घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा घरातल्या घरात सुद्धा करता येते. दाट लोकवस्तीच्या शहरात जेथे जागा कमी आहे तेथे तर अशी शेती हे वरदान ठरू शकते. व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स म्हणजे नक्की काय व्हर्टिकल फार्मिंगचा अर्थ आहे बहुमजली पद्धतीने पिके घेणे. व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स या नावावरून बोध होतो तो मातीविना आणि बहुमजली शेती यांचा संयोग करून केलेली शेती. शहरी, नागरी भागात अनेक पातळ्यांवर वनस्पती वाढवून माती शिवाय केलेली शेती असेही म्हणता येतील. …

अनुलंब म्हणजे व्हर्टिकल किंवा बहुमजली शेती .

आणखी वाचा
plant leaves on plate

घरी बनविता येणारी नैसर्गिक कीडनाशके

पिकांचे धोकादायक किडी आणि कीटकांपासून संरक्षण व्हावे पण त्याचबरोबर जमिनीचे नुकसान होऊ नये आणि हे खाद्यान्न सेवन करणाऱ्या लोकांच्या पोटात कोणतेही विषारी किंवा शरीरावर दुष्परिणाम करणारे घटक जाऊ नयेत या साठी आजकाल नैसर्गिक कीड आणि कीटक नाशकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अशी नैसर्गिक कीडनाशके घराच्या घरी बनविता येतात. आणि त्याचा प्रयोग करण्यासाठी घरातलीच बाग सर्वात उत्तम असे म्हणता येईल. त्यातून जे उत्साही शेतकरी घरच्या घरी स्वतःपुरते धान्य किंवा शेत उत्पादन घेतात त्याच्यासाठी तर हे वरदान म्हणता येईल. घरातल्या बागेत किंवा परसात पिकविलेल्या धान्यापासून बनविलेल्या पदार्थांची रुची घेण्यात नक्कीच एक प्रकारचे सुख आणि समाधान मिळते. शिवाय एक वेगळा अनुभव गाठीशी बांधता येतो ते वेगळेच. यातही आणखी जे सेंद्रीय शेती करत आहेत त्यांना सेंद्रिय शेतीच्या प्रोटोकॉल किंवा नियम आणि उद्दिष्टांना सांभाळून असे उत्पादन मिळवणे नैसर्गिक कीडनाशकांचा वापर करून शक्य होते. जलद उत्पादन मिळविण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर म्हणजे तणनाशके, कीडनाशके आणि रासायनिक किंवा कृत्रिम खते वापरण्यापेक्षा घरच्या घरी बनविता …

घरी बनविता येणारी नैसर्गिक कीडनाशके .

आणखी वाचा
मी आत्मनिर्भर बनणार

माहिती मिळविण्यासाठी सबस्क्राइब करा

प्रत्येक आठवड्यला नवीन माहिती 

closeup photo of silver iMac