घरातल्या घरात, मातीशिवाय आणि हवामानासह संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात ठेवता येणारी हायड्रोपोनिक फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय आणि ती कशी काम करते याची माहिती करून घेतल्यानंतर काही जणांनी हायड्रोपोनिक फार्मिंगची सुरवात केली असेल. काही जणांची कदाचित पहिली ग्रो सिस्टम यशस्वी ही झाली असेल आणि आता त्यांना या सिस्टीमचा विस्तार वाढवायचा आहे त्यांनी हा लेख अवश्य वाचायला हवा. अर्थात हायड्रोपोनिक सिस्टीम उभी करताना संबंधितानी दीर्घ संशोधन, वाचन, रोपवाटिका, स्थानिक बाजार, बागकामासाठी आवश्यक साहित्याची विक्री करणारी दुकाने यांची माहिती मिळवूनच ही सिस्टीम उभारलेली असणार. हायड्रोपोनिक सिस्टीममध्ये तुम्ही लावलेल्या पहिल्या वनस्पतीची वाढ योग्य तऱ्हेने झाली की हे सारे कष्ट सार्थकी लागले असे नक्कीच म्हणता येईल. हे पाहिले रोप तुम्ही कदाचित रोपवाटिका किंवा तयार रोपे विकणाऱ्या दुकानदारांकडून खरेदी केलेले असेल आणि हायड्रोपोनिकची सुरवात करताना तयार रोप आणणे किंवा अंकुरलेली छोटी रोपे आणणे हा चांगला पर्याय आहे. पण दीर्घकाळ तुम्ही हायड्रोपोनिक फार्मिंग करण्याचा विचार करत असाल तर मात्र तुम्ही स्वतः बियांपासून रोपे तयार करणे अधिक व्यवहार्य …

हायड्रोपोनिक फार्मिंग साठी बिया अधिक योग्य का?
- August 12, 2020
- , 1:02 pm
- , शेती
माहिती शेअर करा
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on email