बहुमजली इमारती असतात त्याप्रमाणे उभ्या प्रकारात केलेली शेती किंवा बाग याना अनुलंब म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग असे म्हटले जाते. अशी शेती करण्याचे मुख्य कारण म्हणजे विशेषतः शहरी भागात उपजाऊ जमिनीचे कमी झालेले प्रमाण आणि दुसरे म्हणजे घरच्याघरात, कमी जागेत चांगले उत्पादन घेण्याची सुविधा. उंच सांगाडे उभारून त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे झुडपे, भाज्या, फळे पिकविण्याची ही पद्धत. आता त्याला मातीशिवाय म्हणजे हायड्रोपोनिक शेती तंत्राची साथ मिळाल्यामुळे याकडे भविष्यातील अन्न गरजा पुरविणारी शेती म्हणूनही पाहिले जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ही आधुनिक हायड्रोपोनिक व्हर्टिकल शेती घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा घरातल्या घरात सुद्धा करता येते. दाट लोकवस्तीच्या शहरात जेथे जागा कमी आहे तेथे तर अशी शेती हे वरदान ठरू शकते. व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स म्हणजे नक्की काय व्हर्टिकल फार्मिंगचा अर्थ आहे बहुमजली पद्धतीने पिके घेणे. व्हर्टिकल हायड्रोपोनिक्स या नावावरून बोध होतो तो मातीविना आणि बहुमजली शेती यांचा संयोग करून केलेली शेती. शहरी, नागरी भागात अनेक पातळ्यांवर वनस्पती वाढवून माती शिवाय केलेली शेती असेही म्हणता येतील. …

अनुलंब म्हणजे व्हर्टिकल किंवा बहुमजली शेती
- August 12, 2020
- , 1:02 pm
- , शेती
माहिती शेअर करा
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on email