Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा

तुम्ही कधी कोणाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे का? हो…परंतु हा सल्ला देताना किंवा त्या वस्तूची माहिती देताना तुम्ही त्याबदल्यात पैशांची अपेक्षा ठेवत असतात का? नाही…आणि जर कोणी तुम्हाला वस्तूंची किंवा उत्पादनांची योग्य माहिती अथवा सल्ला देण्यासाठी व त्याद्वारे ग्राहक मिळवून देण्यासाठी पैसे देऊ केले तर? अरे वा..उत्तमच..हे म्हणजे ‘सोने पे सुहागा’ असेच झाले की. मित्रांनो हीच तर आहे आजच्या डिजिटल युगाची जादू जिथे अनेक लोक विविध उत्पादनांची माहिती किंवा त्या उत्पादनांचा त्यांना आलेला अनुभव लोकांना सांगून त्यांनाही ती उत्पादने खरेदी करण्यासाठी उस्फूर्त करतात आणि या बदल्यात उत्पादने बनविणारी कंपनी त्यांना चांगला मोबदला (Commission) देत आहे. या एकूणच प्रकाराला डिजिटल मार्केटिंगच्या भाषेत Affiliate Marketing असे म्हणतात. तुमच्यासाठी ही संकल्पना नवीन असेल तर खालील आकडेवारीवरून तुम्हाला कळेल की आपल्या देशात ही भन्नाट Passive Income ची कल्पना कशी वाढत आहे.

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा 8

(Source: https://www.avinashchandra.com/affiliate-marketing)

वरील आकडेवारीवरून तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की काही वर्षांपूर्वी Affiliate Marketing या क्षेत्राची उलाढाल ही जवळपास ९० मिलियन डॉलर एवढी होती जी येणाऱ्या काही काळात ८०० मिलियन डॉलरहून अधिक मजल मारेल म्हणजेच ही संपूर्ण उलाढाल जवळपास ९००% वाढ दर्शवित आहे. पण तुम्ही म्हणाल तोंडी सल्ला देणे आणि इंटरनेटवर सल्ला देणे यात खूप फरक आहे. हो अगदी बरोबर आणि म्हणूनच तर तोंडी सल्ला देणाऱ्याची त्यातून होणारी कमाई ही शून्य रुपये असते आणि तेच इंटरनेटवर सल्ला देणाऱ्याची कमाई लाखो रुपये असते. काय सांगता? अहो आम्ही खर तेच सांगत आहोत, विश्वास बसत नाही का? मग खालील काही यशस्वी Affiliate Marketer ची उदाहरणे पहा:

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा 9

(Source: https://www.shoutmeloud.com/)

  • हर्ष अग्रवाल या प्रसिद्ध भारतीय ब्लॉगरने ShoutMeLoud या त्याच्या ब्लॉगद्वारे २००८ पासून आत्तापर्यंत ऍफिलिएट मार्केटिंगच्या अचूक क्लुप्त्या वापरून ५० लाखांहून अधिकची कमाई केलेली आहे. ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग व ऍफिलिएट मार्केटिंगशी संबंधित कोणकोणते विविध सॉफ्टवेअर्स व टूल्स खरेदी करावेत याची माहिती देऊन तो अशा प्रकारची कमाई करतो.
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा 10

(Source – https://www.shashankgupta.net/)

  • शशांक गुप्ता हा एक टेक्निकल ब्लॉगर असून Amazon Affiliate या फक्त एका प्रोग्रॅमद्वारे तो महिन्याला ५० हजारच्या जवळपास कमाई करत आहे.
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा 11

(Source – https://www.instagram.com/aashnashroff/?hl=en)

  • आशना श्रॉफ ही फॅशन ब्लॉगर असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅशन, मेक-अप व उच्च राहणीमान या संबंधित विविध उत्पादनांची माहिती आपल्या फॉलोअर्सला देऊन त्याद्वारे महिन्याला लाखो रुपये कमावीत आहे.

काय मित्रांनो? यांच्या कमाईची आकडेवारी पाहून चकित झालात ना…नक्कीच, पण चिंता करू नका या लोकांनी हा कमाईचा टप्पा काही एका दिवसात किंवा एका महिन्यात गाठलेला नाही तर तो अनेक वर्षांची अविरत मेहनत केल्याचे फळ आहे. तुम्हीही नक्कीच Affiliate Marketing द्वारे तुमचा सुरु असलेला जॉब किंवा व्यवसाय सांभाळून सुद्धा चांगली कमाई करू शकता. पण तुम्ही म्हणाल Affiliate Marketing च का? तर आज इंटरनेटद्वारे कमाई करण्याचे जे काही पर्याय उपलब्ध आहेत त्यातील सर्वात यशस्वी आणि खात्रीशीर पर्याय हा Affiliate Marketing हाच आहे असे या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ लोकांनी सुचविले आहे.

  • Affiliate Marketing चे महत्वाचे फायदे:
  • Passive Income प्रकारातील सर्वात फायदेशीर आणि लोकप्रिय पर्याय
  • सुरुवात करण्यासाठी अत्यंत कमी गुंतवणुकीची गरज
  • एकाच प्रकारच्या उत्पादनांसाठी वेगवेगळ्या Affiliate Program द्वारे चांगली कमाई करण्याच्या अनेक संधी उपलब्ध
  • तुम्ही तज्ञ असण्याची कोणतीही गरज नाही त्याचबरोबर कोणत्याही तांत्रिक किंवा कुशल ज्ञानाची गरज नाही
  • Affiliate Program राबविण्यासाठी सेल्स संबंधित कोणतेही टार्गेट पूर्ण करण्याची गरज नाही
  • कोणतेही नवीन उत्पादन शोधण्याची किंवा तयार करण्याची गरज नाही
  • जगात कुठेही आणि केव्हाही करता येण्यासारखा डिजिटल व्यवसाय
  • तुम्हीच तुमचे बॉस – कोणाच्याही हाताखाली काम करण्याची अट नाही
  • तुमचे कमिशन आपोआप तुमच्या खात्यात जमा होते त्यामुळे केलेल्या कामाचा मोबदला मागायची गरज नाही
  • तुमचा सुरु असलेला जॉब किंवा व्यवसाय सांभाळून सुद्धा करता येणारा अतिरिक्त कमाईचा कमी जोखमीचा प्रकार

काय मग करताय ना सुरुवात Affiliate Marketing ला? हो नक्कीच… अहो थांबा – ‘अति घाई संकटात नेई’. आधी Affiliate Marketing शी संबंधित सर्व महत्वाचे बारकावे तर समजून घ्या. पण कुठे मिळेल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती. इथेच, आमच्या या लेखात. हा लेख तुम्हाला Affiliate Marketing म्हणजे काय? Affiliate Marketing चे फायदे व तोटे, Affiliate Marketing कोणी करावे? Affiliate Marketing साठी वापरल्या जाणाऱ्या कार्यपद्धती, Affiliate Marketing साठी उपलब्ध असलेली लोकप्रिय क्षेत्रे व Affiliate Marketing द्वारे किती कमाई करता येऊ शकते? या सर्व मुद्यांची अगदी समर्पक माहिती देईल.

ई -कॉमर्स व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशाच प्रकारच्या अनेक व्यवसायांची माहिती सविस्तरपणे आमच्या विविध लेखांद्वारे आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. या उपयुक्त खजिन्यासाठी आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन उद्योगधंद्याची संपूर्ण माहिती मिळवा.

चला तर मग जाणून घेऊ Affiliate Marketing शी संबंधित महत्वाचे बारकावे:

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवाTable of Content

Affiliate Marketing म्हणजे काय?

Affiliate Marketing चे फायदे व तोटे

Affiliate Marketing कोणी करावे?

Affiliate Marketing साठी वापरल्या जाणाऱ्या कार्यपद्धती

Affiliate Marketing साठी उपलब्ध असलेली लोकप्रिय क्षेत्रे

Affiliate Marketing द्वारे किती कमाई करता येऊ शकते?

  • Affiliate Marketing म्हणजे काय?

इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीच्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती (Review) लोकांना देऊन त्याद्वारे चांगला मोबदला (Commission) कमविण्याच्या प्रकाराला ‘Affiliate Marketing’ असे म्हणतात.

म्हणजे सोप्या भाषेत हे चक्र समजवायचे झाले तर ही आकृती पहा:

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा 12

अनेक लोक Affiliate Marketing कडे वळत आहेत कारण यामध्ये तुम्हाला उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा खर्च करायचा नसतो कारण हे काम अनेक वेगवेगळ्या व नावाजलेल्या कंपन्यांमार्फत केले जाते तसेच ज्याक्षणी Affiliate Marketing ची सुरुवात करण्यासाठी तुमचा प्लॅटफॉर्म तयार असेल मग ती एखादी वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाउंट किंवा पॉडकास्ट चॅनेल असो त्याक्षणापासून तुम्ही लगेचच याची सुरुवात करू शकता.

Affiliate Marketing चा प्रसार वेगाने वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कोणतेही उत्पादन खरेदी करायच्या आधी आजची पिढी अगोदर इंटरनेटवर त्या उत्पादनाबद्दलची पूर्ण माहिती, लोकांना आलेला अनुभव आणि वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममार्फत दिल्या जाणाऱ्या आकर्षक ऑफर्स यांची पडताळणी करूनच मग ते उत्पादन खरेदी करतात.

Affiliate Marketing ही प्रामुख्याने ३ मुख्य घटकांवर अवलंबून असते :

Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा
Affiliate Marketing शिका आणि महिन्याला लाखो रुपये कमवा 13

(Source : https://www.oberlo.in/blog/what-is-affiliate-marketing)

  1. Advertiser (वस्तू किंवा सेवा पुरवठादार):

Advertiser म्हणजे अशी कंपनी किंवा व्यक्ती जे त्यांनी निर्मित केलेल्या वस्तू किंवा सेवा इंटरनेटद्वारा विक्रीस उपलब्ध करून देतात. असे पुरवठादार आपल्या वेबसाईटवर याची माहिती ‘Affiliate Program’ या अंर्तगत affiliate marketer साठी सविस्तरपणे नमूद करून ठेवतात.

  • Publisher (विक्रेता):

Publisher म्हणजे Affiliate Marketer (म्हणजे तुम्ही) – जे की वस्तू किंवा सेवा पुरवठादाराशी सलंग्न राहून त्यांच्या सेल्सला चालना देऊन त्याबदल्यात योग्य कमिशन मिळवतात.

  • Consumer (ग्राहक):

Consumer म्हणजेच ग्राहक हे अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह असतो जो कि तुम्ही सुचवीत असलेल्या उत्पादनाची किंवा सेवांची तुम्ही दिलेल्या लिंक किंवा कोड द्वारे खरेदी करतात.

चला, आता तुम्हाला नक्कीच कळाले असेल की affiliate marketing म्हणजे नक्की काय आहे आणि ते कसे चालते. जिथे व्यवसाय किंवा पैसा आला तिथे फायदा आणि तोटा हे पण आपसूकच येणार म्हणूनच पुढील मुद्द्यात आपण affiliate marketing चे महत्वाचे फायदे-तोटे समजून घेऊ.

  • Affiliate Marketing चे फायदे व तोटे:

Affiliate Marketing मधून मिळणारे उत्पन्न पाहून अनेक जणांना वाटते की आपणही हे सुरु करून यातून झटपट पैसे कमवू शकतो पण इथेच हे लोक चूक करतात आणि सपशेल अपयशी होतात कारण त्यांनी या व्यवसाय प्रकारचे फायदे व तोटे यांचा व्यवस्थित अभ्यास केलेला नसतो. जर तुम्हाला असे अपयश नको असेल तर खाली दिलेले Affiliate Marketing चे फायदे व तोटे नीट समजून घ्या:

  • Affiliate Marketing चे फायदे:
  • अत्यंत कमी गुंतवणूक:

कोणताही व्यवसाय (छोटा किंवा मोठा) सुरु करायचा म्हटले की त्यासाठी भांडवल, जागा, निर्मिती खर्च, मशिनरीचा खर्च, कामगारांचे पगार यासारख्या अनेक गोष्टींची सांगड घालावी लागते पण Affiliate Marketing सुरु करण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची कोणतीच गरज लागणार नाही. Affiliate Marketing मध्ये पाऊल टाकण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता लागेल:

  • संगणक किंवा लॅपटॉप
  • इंटरनेट कनेक्शन (हाय स्पीड)
  • मोबाईल
  • बँक खाते
  • तुमची स्वतःची affiliate वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाउंटस
  • लोकांना पटेल असा तुमचा सल्ला किंवा माहिती

लक्षात ठेवा कोणतीही कंपनी affiliate marketer कडून affiliate program जॉईन करण्यासाठी फी किंवा कोणतेही चार्जेस घेत नाही.

  • ऑफिस किंवा गोडाऊनची आवश्यकता नाही

Affiliate Marketing मध्ये तुम्हाला कोणतेही उत्पादन नव्याने निर्माण करायचे नाही, ज्या कंपनीसोबत तुम्ही affiliate marketer म्हणून जोडले जाणार आहात त्यांचीच उत्पादने किंवा सेवा तुम्हाला promote करायच्या असतात. यासाठी ना तुम्हाला कुठल्या ऑफिसची आवश्यकता आहे ना की उत्पादनांचा साठा करण्यासाठी कुठल्या गोडाऊनची गरज आहे, अगदी घराच्या बाल्कनीमध्ये बसून सुद्धा तुम्ही संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून हा व्यवसाय सहजतेने करू शकाल.

  • विक्री व वितरणाची चिंता नाही:

Affiliate Marketing मध्ये तुम्ही लोकांना तुम्हाला आवडलेले किंवा तुम्ही नियमितपणे वापरत असलेल्या वस्तू किंवा सेवा यांची खरेदी करण्याचा सल्ला देत असतात. तुमच्या Affiliate लिंक द्वारे खरेदी होणाऱ्या वस्तूंची विक्री किंवा त्यांच्या वितरणाची जबाबदारी ही सेवा अथवा वस्तू पुरवठादाराची असते त्यामुळे तुम्हाला याबाबत चिंता करावी लागत नाहीत. या कामांचा वाचणारा वेळ तुम्ही Affiliate Marketing च्या विविध गोष्टी शिकण्यात किंवा तुमचे संपर्क जाळे वाढविण्यात सत्कारणी लावू शकता.

  • जेवढे काम तेवढाच दाम:

Affiliate Marketing मधून होणारी कमाई ही थेट तुम्ही करत असलेल्या कामावरच अवलंबून असते म्हणजेच जितके कष्ट तुम्ही घ्याल, जितक्या जास्त लोकांपर्यंत तुमचे उत्पादनांविषयीचे मत पोहचेल आणि जितकी जास्त लोक यामुळे तुम्ही सुचवीत असलेली उत्पादने किंवा सेवांची खरेदी करतील तितकी जास्त तुमची कमाई असेल. एकूणच हा व्यवसाय प्रकार Performance Based कमाई ह्या सूत्रावर आधारित आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर Affiliate Marketing म्हणजे जितना काम उतना दाम.

  • Passive Income चा सर्वात किफायतशीर पर्याय:

तुम्ही आजकाल अनेक लोकांच्या तोंडून ऐकत असाल की Passive Income चा एक तरी मार्ग नक्कीच हवा आणि Passive Income म्हणजे काय हे तुम्हाला कळत असेल तर Affiliate Marketing या पर्यायाने ते नक्कीच शक्य आहे. म्हणजेच तुम्ही एकदाच करून ठेवलेल्या कामाचा अनेकदा मोबदला मिळविणे. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला कामाच्या ठिकाणी हजर राहणे गरजेचे असते पण Affiliate Marketing मध्ये तुम्ही एकदा का तुमचे उत्पादनाबद्दलचे किंवा सेवांबद्दलचे मत तुमच्या वेबसाईटवर किंवा सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त केले की त्याद्वारे होणारी खरेदी तुम्हाला अनेकदा पैसे मिळवून देते अगदी तुम्ही झोपलेला असाल तरीही.

  • वेळेचे व कामाचे बंधन नाही:

Affiliate Marketing कधी व कसे करायचे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि म्हणूनच तुमचे वस्तू किंवा सेवा पुरवठादार तुमच्यावर कामाचे व वेळेचे कोणतेही बंधन घालत नाही. तुम्हाला जेव्हा हवे असेल, जसे हवे असेल तसे काम तुम्ही करू शकता कारण या व्यवसाय प्रकारात तुम्हीच तुमचे Employee आणि तुम्हीच तुमचे Boss असतात.

चला हे तर झाले काही महत्वाचे फायदे पण नुसता फायद्यांचा आढावा घेऊन कसे चालेल कारण तोटे जाणून घेणे सुद्धा अनेकदा फायद्याचे ठरते.

  • Affiliate Marketing चे तोटे
  • जबरदस्त स्पर्धा:

Affiliate Marketing सुरु करण्यासाठी लागणारा अत्यंत कमी खर्च, लाखो पुरवठादारांची जगभर सहज असलेली उपलब्धता आणि होणारी आकर्षक कमाई यामुळे या क्षेत्रात अनेकजण नव्याने उतरत आहेत ज्यामुळे प्रत्येक Affiliate Marketer ला जबरदस्त स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

  • विश्वास संपादन करणे व तो टिकवून ठेवण्याचे आव्हान:

आजच्या डिजिटल युगात कोण कधी आपल्याला टोपी घालेल सांगता येत नाही म्हणूनच प्रत्येकजण हा अतिशय सावध राहून आपले इंटरनेटवरील खरेदीचे निर्णय घेत असतो. तुम्ही देत असेलेली माहिती, तुमचा अनुभव आणि तुम्ही promote करत असलेली उत्पादने किंवा सेवा याबद्दल तुमच्या फॉलोअर्स किंवा वाचकांमध्ये विश्वास निर्माण करणे व तो टिकवून ठेवणे हे affiliate marketing मधील प्रमुख आव्हान आहे.

  • तुमचा व्यवसाय हा पुरवठादारावर अवलंबून असतो:

तुम्ही पुरवठादाराकडून वितरित होणाऱ्या वस्तू किंवा सेवांचे Promotion करतात पण जर का या उत्पादनांचा दर्जा किंवा वितरणात काही अडचणी निर्माण झाल्या तर त्याचा थेट फटका तुमच्या या व्यवसायातील प्रतिमेला पोहचतो म्हणजेच तुम्ही या बाबतीत पुरवठादारच्या कामगिरीवर अवलंबून असतात.

  • पुरवठादाराशी प्रत्यक्ष भेट न होणे:

Affiliate Marketing या प्रकारात तुम्ही प्रत्यक्षरीत्या वस्तू किंवा सेवा पुरवठादाराला भेटत नसतात तर तुमचा संपर्क हा ई-मेल किंवा फोनद्वारे झालेला असतो आणि म्हणूनच जर काही कारणास्तव अशी कंपनी अचानक बंद पडली तर त्याचा फटका थेट तुमच्या कमाईवर होतो.  

म्हणजे एकंदरीतच तोट्यांच्या तुलनेत फायद्याचे पारडे जड असल्याने या पर्यायाचा व्यवस्थित अभ्यास केला तर यशप्राप्ती होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही

आता आपण पाहू नक्की हा व्यवसाय प्रकार कोणासाठी जास्त सोयीस्कर आहे.

  • Affiliate Marketing कोणी करावे?

Affiliate Marketing काही खास लोकांसाठीच बनलेले आहे असा अनेक जणांचा गैरसमज होऊन बसला आहे आणि म्हणूनच याची सुरुवात करण्याअगोदरच ते काहीशी चूकीची माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहचवतात. पण मित्रांनो Affiliate Marketing हे सगळ्यांसाठी खुले आहे फक्त गरज आहे त्याच्या काही मूलभूत संकल्पना आणि कार्यपद्धती समजून घेण्याची. खालील गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःचे मोजमाप कसे करता किंवा या गोष्टींपर्यंत पोहचण्याची तुमची कितपत तयारी आहे यावरच तुमचे यश अवलंबून आहे:

  • तुमची स्वतःची वेबसाईट आहे किंवा तुम्ही स्वतःचे ऑनलाईन ई-कॉमर्स स्टोअर नियंत्रित करत आहात किंवा तुम्ही ऑनलाईन नवउद्योजक आहात आणि तुम्हाला तुमची ग्राहकसंख्या त्याचबरोबर व्यवसायही वाढवायचा आहे तर तुम्ही affiliate marketing या पर्यायाचा वापर करू शकता.
  • लोक काय खरेदी करतात, त्यांना काय आवडते, बाजारात नवीन आलेल्या उत्पादनांपैकी ग्राहकांच्या फायद्याची उत्पादने (किंवा सेवा) कोणती आहेत या बाबींची योग्य माहिती देण्यात तुम्हाला रस असेल तर Affiliate Marketing मध्ये तुमच्यासाठी अनेक संधी वाट बघत आहेत.
  • डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये Influencer (प्रभाव पाडणारी व्यक्ती) म्हणून तुमचा दबदबा असेल तर अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे किंवा सेवांचे Affiliate Marketing करण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांच्या शोधात असतात.

(Influencer म्हणजे काय आणि Influencer बनून म्हणून महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख वाचा.)

  • तुमचा स्वतःचा ब्लॉग असून त्याची वाचक संख्याही चांगली आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही वाचकांना नवनवीन उत्पादनांची माहिती देऊन Affiliate Marketing या संधीचा योग्य वापर करू शकता.
  • YouTube वर जर तुमचा चॅनेल असेल आणि त्याची Subscribers ची संख्याही उत्तम असेल तर तुमच्या व्हिडिओजशी निगडित उत्पादनांचे किंवा सेवांचे Affiliate Marketing करणे तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरेल.
  • Facebook आणि Instagram या अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तर अनेक जण affiliate marketing चा प्रकर्षाने उपयोग करतात. या दोन प्लॅटफॉर्मवर जर तुमचाही चांगला जम बसला असेल आणि तुमचेही उत्तम फॉलोअर्स असतील तर Affiliate Marketing चा वापर तुम्ही करून बघितला पाहिजे.

(इंस्टाग्रामद्वारे महिन्याला उत्तम कमाई कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आमचा हा माहितीपूर्ण ब्लॉग वाचा)

म्हणजे एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेलच की Affiliate Marketing मध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर तुमचे प्रभावी अस्तित्व असणे गरजेचे आहे किंवा तसे अस्तित्व निर्माण करण्याची आणि त्यासाठी लागणारी अपार मेहनत घेण्याची तुमची तयारी हवी. जर तुम्ही यासाठी तयार असाल तर मग आपण आता Affiliate Marketing नक्की कसे करावे ते समजून घेऊ.

  • Affiliate Marketing साठी वापरल्या जाणाऱ्या कार्यपद्धती:

अनेक नावाजलेले affiliate marketers बऱ्यापैकी एकसारख्या पद्धतींचाच वापर करतात फरक असतो तो त्यांच्या शब्दांच्या किंवा सल्ल्यांच्या मांडणीमध्ये. प्रत्येक माणसाची जशी सल्ला द्यायची खास शैली असते तसेच प्रत्येक affiliate marketer ची उत्पादनांची किंवा सेवांची माहिती (किंवा त्यांचा Review) देण्याची पद्धत वेगवेगळी असते. Affiliate Marketing करण्यासाठी कंपनी कोणाला शोधत असते ते आपण पाहू:

  • Influencers:

Influencers या अशा व्यक्ती असतात ज्यांचा सोशल मीडियावर जबरदस्त प्रभाव असून त्यांची फॉलोअर्स संख्या ही लक्षणीय असते. वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टचा वापर करून ते आपल्या फॉलोअर्सच्या मनात विविध उत्पादने किंवा सेवांबद्दल आकर्षण निर्माण करून त्यांना खरेदी करण्यास प्रोत्साहित करतात. या व्यक्ती वस्तू किंवा सेवा पुरवठादाराशी ग्राहकांना थेट जोडून द्यायचे काम करत असल्याने यांना Affiliate Marketing या क्षेत्रात चांगली मागणी असते. जाहिरातींवर अमाप पैसे खर्च करण्यापेक्षा थेट सेल्स मिळण्याची शाश्वती असल्याने पुरवठादार influencers ला उत्तम कमिशन देतात. 

  • ब्लॉगर्स:

कोणत्याही Search Engine वर वेबसाईटच्या उत्तम रँकिंगसाठी Content ला असलेले महत्व कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही आणि अशाच प्रकारचा content (जो की वाचकांना व Search Engine ला सुद्धा आवडेल) लिहण्याची कला ही ब्लॉगर्सला अवगत असते. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ब्लॉगर वाचकांना वेगवेगळ्या उत्पादने आणि सेवांची माहिती तसेच त्याबद्दलचे सखोल ज्ञान किंवा त्यांना आलेला अनुभव (Review) प्रदर्शित करून त्याद्वारे उत्पादने किंवा सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर वाचकांना पाठविण्याचे काम लीलया घडवून आणतात. या प्रक्रियेच्या माध्यमातून जो काही सेल किंवा नफा मिळेल त्याबदल्यात पुरवठादार ब्लॉगर्सला चांगले कमिशन किंवा नफ्यामध्ये वाटा देऊ करतात.

  • पेड सर्च केंद्रित मायक्रो साईट्स:

वेगवगेळ्या उत्पादनांची आणि सेवांची विक्री करण्याच्या मुख्य हेतूने अशा प्रकारच्या वेबसाईटस बनविलेल्या असतात. Affiliate Marketing वर लक्ष केंद्रित करून या वेबसाईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीच निर्माण केलेल्या असतात आणि त्यासाठी अशी वेबसाईट बनविणारी कंपनी किंवा व्यक्ती Search Engine द्वारे ग्राहक मिळविण्यासाठी पैसे खर्च करतात आणि म्हणूनच यांना Paid Search Micro Sites असे म्हणतात. Micro म्हणजे या वेबसाईट वर फक्त Affiliate केल्या जाणाऱ्या उत्पादनांची किंवा सेवांचीच माहिती असते. अशा वेबसाईट्स ला Affiliate मार्केटिंग क्षेत्रात चांगला वाव आहे.

  • ई-मेल लिस्ट्स:

ई-मेल मार्केटिंग द्वारे सेल्स मिळवून देणे ही पद्धत अजूनही Affiliate मार्केटिंगच्या क्षेत्रात महत्वाचे स्थान टिकवून आहे आणि म्हणूनच अनेक Affiliates त्यांच्या कडे असलेल्या ई-मेल लिस्टचा वापर करून उत्पादनांची किंवा सेवांची खरेदी करण्यास ग्राहकांना प्रोत्साहित करतात. वेगेवेगळे Campaign चालवून अनेक लोक ई-मेल मिळविण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याच ई-मेल लिस्टचे व्यवस्थित वर्गीकरण करून Affiliate Marketing च्या विविध क्लुप्त्या वापरून चांगला सेल्स आणि त्याबदल्यात चांगला मोबदलाही मिळवतात.

  • मोठ्या किंवा नावाजलेल्या वेबसाईटस:

मीडिया हाऊस, वृत्तपत्रे, नावाजलेले मार्केटिंग ब्रॅण्ड्स यांच्या वेबसाईटचा दररोज लाखो लोक माहिती घेण्यासाठी किंवा आपली आवड जपण्यासाठी वापर करत असतात. अशा प्रकारच्या वेबसाईटवर थेट आपली उत्पादने किंवा सेवा प्रदर्शित करणे विक्रेत्यांना फायद्याचे ठरते आणि म्हणूनच Affiliate Marketing चा वापर करून या वेबसाईट्स आणि विक्रेते दोघेही एकमेकांच्या सहमतीने चांगली कमाई करण्याचा प्रयत्न करत असतात.

चला इथे पर्यंत Affiliate Marketing बद्दलच्या बऱ्याचशा संकल्पना तुम्हाला समजल्या असतील पण यामध्ये नक्की काय विकता येऊ शकते हे समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. पुढील मुद्द्यात आपण याच बद्दलची माहिती घेऊ.

  • Affiliate Marketing साठी उपलब्ध असलेली लोकप्रिय क्षेत्रे (Niche):

प्रत्येक सेवा किंवा उत्पादन पुरवठादाराला हरतऱ्हेने ग्राहकांची पुरेशी संख्या हवीच असते आणि म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील पुरवठादार Affiliate Marketing चा प्रभावी वापर करण्यास अनुकूल असतात. जसे प्रत्येक क्षेत्रातील उत्पादने, ग्राहक व त्यांच्या किंमती या वेगवेगळ्या असतात तसेच त्या त्या क्षेत्रातील नफा अथवा कमिशनची सूत्रे ही वेगवेगळी असतात. ज्या क्षेत्रांना affiliate Marketer ची सर्वात जास्त पसंती आहे ती काही क्षेत्रे (Niche) आम्ही इथे नमूद करत आहोत:

  • सॉफ्टवेअर:

जसजसा तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होत आहे तसतसे अनेक नवनवीन आणि नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर्स बाजारात उपलब्ध होत आहेत. अनेक Affiliate Marketing करणारे लोक हे सॉफ्टवेअर किंवा त्यांच्याशी संबंधित क्षेत्रातून आलेले असल्याने अशा प्रकारच्या उत्पादनांसाठी ग्राहक मिळवून देण्यात ते मोलाची भूमिका बजावतात. अशा प्रकारच्या Affiliate प्रोग्रॅममध्ये प्रत्येक विक्रीमागे थेट २५% ते ३०% कमिशन देऊ केले जाते. एवढे चांगले कमिशन मिळत असल्याने यामध्ये स्पर्धाही तितकीच तगडी आहे आणि म्हणूनच नव्याने सुरुवात करणाऱ्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकण्याआधी चौकस विचार करावा.

  • पर्यटन (ट्रॅव्हल आणि टुरिजम):

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लोकप्रिय पर्यटन ठिकाणांना भेट देण्यासाठी दरवर्षी नियोजन करणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. पर्यटनाशी निगडित सेवा किंवा वस्तू पुरवठादार (विमानसेवा, हॉटेलसेवा, भोजनसेवा, टूर नियंत्रक ई.) Affiliate Marketing च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्यात नक्कीच यशस्वी होत आहेत आणि म्हणूनच या क्षेत्राशी निगडित विविध Affiliate प्रोग्रॅम्स मधून Affiliate मार्केटर ३% ते १५% कमिशनची कमाई करत आहेत. या क्षेत्रात सुद्धा तुम्हाला जागतिक स्पर्धेचा सामना करावा लागेल त्यामुळे या क्षेत्रात Affiliate Marketing करण्यासाठी तुम्हाला उत्तम तयारीनिशी उतरावे लागेल.

  • ई-कॉमर्स:

स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या सहज आणि स्वस्त उपलब्धतेमुळे आजचा ग्राहक हा ई-कॉमर्सच्या माध्यमातून हवे तेव्हा आणि हवी ती उत्पादने घरबसल्या खरेदी करत आहे. अनेक मोठमोठे ब्रॅण्ड्स (Amazon, Myntra, Flipkart, Ajio) आज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विविध उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत पण त्यासाठी फायदेशीर अशी ग्राहकसंख्या मिळविणे हे त्यांनाही तितकेच आव्हानात्मक आहे. Affiliate Marketer चा digital प्लॅटफॉर्मवर असलेला प्रभाव वापरून उत्तम सेल्स घडवून आणण्यासाठी या कंपन्या affiliate marketing चे विविध प्रोग्रॅम राबवतात ज्याद्वारे ते मार्केटर ला ४% ते ८.५% कमिशन देऊ करतात. या क्षेत्रात Influencers ला चांगली मागणी आहे.

  • कर्ज किंवा फायनान्स:

अनेक लोकांना आपल्या वैयक्तिक अथवा व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते आणि त्यासाठी कर्ज स्वरूपात अशी रक्कम प्राप्त करण्यासाठी ते वेगवगेळे पर्याय शोधत असतात. अशा ग्राहक वर्गाला आपल्या कर्ज योजनांकडे अथवा बँकेशी निगडित सेवा किंवा उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्या Affiliate Marketing चे वेगवेगळे प्रोग्रॅम राबवित असतात. या क्षेत्रात कर्ज रकमेच्या होणाऱ्या मंजुरीनुसार Affiliate Marketer ला आकर्षक कमिशन दिले जाते.

  • तंदुरुस्ती आणि पोषण (Fitness & Nutrition):

२० व्या शतकातील बहुतांश लोकसंख्या अत्यंत धावपळीचे जीवन जगत असल्याने निरोगी शरीर आणि सकस आहार याबाबत आजची तरुणाई आणि प्रौढ वर्गसुद्धा चांगलाच जागृत झालेला आहे आणि म्हणूनच या क्षेत्राशी निगडित उत्पादन अथवा सेवा पुरवठादारांची संख्याही मागील काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. Affiliate Marketing द्वारे उत्तम ग्राहकसंख्या मिळवण्यासाठी अशा प्रकारचे पुरवठादार Affiliate Marketer ला १५% ते २५% कमिशन देऊ करतात.

वर दिलेली क्षेत्रे ही तर काही मोजकीच उदाहरणे झाली या व्यतिरिक्त फॅशन, फोटोग्राफी, गुंतवणूक, योगा, प्रेम आणि नातेसंबंध, पाळीव प्राणी, चित्रपट व गाणी, गृह सुरक्षा, गेमिंग, डिजिटल मार्केटिंग यासारखी १०० हून अधिक क्षेत्रे Affiliate Marketing साठी उपलब्ध आहेत.

चला, Affiliate Marketing शी संबंधित तुमच्या अनेक शंका आता नक्कीच दूर झाल्या असतील तरीही यातून नक्की किती कमाई होऊ शकते ही शंका तुमच्या मनात असेलच. यासाठी आपण पुढील मुद्दा समजून घेऊ.

  • Affiliate Marketing द्वारे किती कमाई करता येऊ शकते?

Affiliate Marketing द्वारे मिळणारी ग्राहकसंख्या व त्याद्वारे होणार नफा या गोष्टींमुळे आज भारतासह जगभरात Affiliate Marketing चा प्रसार वेगाने होत आहे आणि पुढील काळातही तो तसाच सुरु राहील असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. या क्षेत्रात महिन्याला किमान १००० रुपयांपासून ते १ लाखाहून सुद्धा अधिक कमाई करणारे लोक आहेत ज्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले आहे:

  • अगदी नव्याने सुरुवात करणारे ज्यांची कमाई काहीही नसून यासाठी ते स्वतःचाच वेळ व पैसा खर्च करत आहेत.
    • Low-level Affiliates ज्यांची दिवसाची कमाई ही जवळपास ५०० रुपये आहे.
    • Intermediate Affiliates ज्यांची दिवसाची कमाई ही जवळपास १५००+ रुपये आहे.
    • High-level Affiliates ज्यांची दिवसाची कमाई ही जवळपास ४०००+ रुपये आहे
    • Super Affiliates ज्यांना या क्षेत्रातले तज्ञ म्हणून सुद्धा संबोधले जाते कारण त्यांची दिवसाची कमाई ही जवळपास १००००+ रुपये आहे.

म्हणजेच Affiliate Marketing मध्ये सुरुवात करून हळू-हळू यातील बारकावे, ग्राहकांची मानसिकता, उत्पादनांची अथवा सेवांची निवड आणि तुमची अपार मेहनत या गोष्टी जुळवून आणल्यास Low-level affiliate ते Super Affiliate हा तुमचा स्वप्नवत प्रवास नक्कीच शक्य आहे.

शेवटी काय तर…

‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण Affiliate Marketing या क्षेत्राला व त्यातील प्रगतीला अतिशय समर्पक आहे. या क्षेत्रात सुरुवात करून एका दिवसात किंवा एका आठवड्यातच भरमसाठ कमाई करू शकता असे जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर त्या सल्ल्यापासून थोडे लांबच राहा. आमच्या अनुभवानुसार या क्षेत्रात चांगली कमाई मिळविण्यासाठी तुम्हाला किमान पहिले ३ ते ६ महिने अविरत कष्ट, अभ्यासपूर्ण माहिती, वाचकांशी अथवा फॉलोअर्सशी चांगले संबंध, सल्ल्यातील विश्वासाहर्ता, आणि मार्केटिंगची कौशल्ये या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी द्यावे लागतील आणि त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या निकालांवर आधारित तुमची पुढची वाटचाल तुम्ही ओळखू शकाल. या क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा असल्याने नुसते नावाला किंवा प्रयोग म्हणून स्पर्धेत उतरून चालणार नाही तर त्यात प्रतिस्पर्ध्यांसमोर आपला टिकाव कसा लागेल याचीही रणनीती तुम्हाला वेळोवेळी आखावी लागेल. Passive Income प्राप्त करण्याची एक चांगली संधी म्हणून तुम्ही Affiliate Marketing चा पर्याय नक्कीच विचारात घेऊ शकता कारण कोणी तरी म्हणाले आहे – ‘ईच्छा तेथे मार्ग’.

शेअर करा

Leave a Comment