युट्युबच्या माध्यमातून कशी कराल कमाई? जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण माहिती

युट्युबच्या माध्यमातून कशी कराल कमाई? जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण माहिती

या आधुनिक काळात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. इंटरनेटमुळे संपूर्ण जग एकमेकांशी जोडले गेले आहे. त्यामुळे इंटरनेटवरून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमावण्याच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. युट्युब हा त्यातीलच एक प्रकार आहे. युट्युबच्या माध्यमातून खुप कमाई करता येईल. शिक्षण, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान यांसह अनेक क्षेत्रातील माहिती युट्युबवर प्रकाशित करून आज अनेकजण कमाई करत आहेत.

युट्युबवर सर्वात जास्त पैसे कोण कमवतात ?
फोर्ब्स च्या माहितीनुसार, 2017 ते 2018 या कालावधीत पुढील 10 युट्युब चॅनल्सनी सर्वात जास्त पैसे कमवले आहेत.
1) रयान कि दुनिया – 22 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 22.4 मिलियन)
2) जॅक पॉल – 21.5 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 19.7 मिलियन)
३) यार परफेक्ट – 20 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 47.1 मिलियन)
4) Dan TDM – 18.5 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स 22.3 मिलियन)
5) जेफरी स्टार – 18 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 16.5 मिलियन)
6) मार्कीनियर – 17.5 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 24.5 मिलियन)
7) वानोसगेमिंग – 17 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 24.9 मिलियन)
8) डैकसेप्टिकआई – 16 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 23 मिलियन)
9) PewDiePie – 15.5 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स – 102 मिलियन)
10) लोगान पॉल – 14.5 मिलियन डॉलर (सब्सक्राइबर्स 19.9 मिलियन)

वरील आकडे पाहुन तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, यांनी एवढे पैसे कसे कमवले ? जाणून घेऊया तुमच्या प्रश्नाची उत्तरे…

*युट्युबवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला पैसे दिले जातात का ?
युट्युबवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला पैसे दिले जात नाहीत, तसेच व्हिडिओ अपलोड केल्यास लगेच पैसे मिळतात असा गैरसमज आहे. युट्युबच्या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला युट्युब चॅनलच्या सेटिंगमध्ये जाऊन जाहिरात मिळवण्यासाठी अप्लाय करावे लागते. तुमचे अकाउंट अ‍ॅप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओतील जाहिरातींच्या व्ह्यूजनुसार पैसे मिळतात.

*तुम्ही युट्युबच्या माध्यमातून पैसे कसे कमवता ?
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, वरील 10 युट्युब चॅनलनी लाखो रुपये कमावले. त्यांचे प्रत्येकाचे क्षेत्र वेगवेगळे आहे. सर्वात पहिले तुम्ही हे लक्षात घ्या की, युट्युबच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे लाखो सब्सक्राइबर्स असले पाहिजेत असे काही नाही. तुमचे सब्सक्राइबर्स किती आहेत यावरुन तुमची कमाई ठरू शकत नाही. तुमचे सब्सक्राइबर्स कमी असले तरीही तुम्हाला पैसे मिळतात. युट्युबवरून पैसे मिळवणे हा तुमचा उद्देश असेल तर तुम्ही ज्या क्षेत्रातील माहिती देणार आहात त्या क्षेत्रातील प्रेक्षकांची माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही प्रेक्षकांच्या आवडीचे व्हिडिओ अपलोड करून, मार्केटिंग करून पैसे कमवू शकता.

*तुमचे युट्युब चॅनेल कोण पाहणार आहे ?
तुमचे युट्युब चॅनेल कोण पाहणार आहे, याची समज असणे देखील महत्वाचे आहे. जेवढे जास्त लोक तुमचे व्हिडिओ पाहतील तेवढी जास्त तुमची कमाई होईल. तुम्ही विशिष्ट समुहाला टार्गेट करणाऱ्या मोठ्या ब्रँड सोबत देखील काम करू शकता.

*तुम्ही या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे
प्रेक्षकांचे जेंडर, वयोमर्यादा, तुमचे व्हिडिओ ज्या देशात-शहरात पाहिले जाणार आहेत तेथील भौगोलिक स्थिती, प्रेक्षक कोणत्या वेळेला व्हिडिओ पाहतात याची माहिती, इत्यादी गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे.

तुम्ही या सर्व गोष्टींची माहिती मिळवली तर तुम्ही एका मोठ्या ब्रँडसोबत चांगल्या प्रकारे काम करू शकता. प्रेक्षकांबाबतची सर्व माहिती तुम्ही युट्युब अॅनालिटिक्समधून काढू शकता. पण दुसऱ्या युट्युब चॅनलशी तुलना करण्यासाठी तुम्ही सोशल ब्लेडसारख्या साधनांचा उपयोग करू शकता.

*युट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सहभागी व्हा आणि जाहिरातींद्वारे पैसे कमवा
तुम्ही युट्युबवरून जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला युट्युब पार्टनर प्रोग्राममध्ये सहभागी व्हावे लागते. मात्र तुमचे 1000 सब्सक्राइबर्स आणि 4000 व्हिडिओ वॉच टाईम पुर्ण झाल्यानंतरच तुम्ही जाहिराती मिळवण्यासाठी अप्लाय करू शकता. जोपर्यंत तुमचे 1000 सब्सक्राइबर्स आणि 4000 व्हिडिओ वॉच टाईम पुर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला युट्युबच्या माध्यमातून कोणतीही कमाई होत नाही. त्यामुळे नियमित व्हिडिओ बनवणे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्हाला सुरू ठेवावे लागेल.

*तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी किती व्ह्यूजची आवश्यकता असते ?
तुमच्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळतात, मात्र प्रेक्षक जाहिरात पाहत नसतील किंवा त्यावर क्लिक करत नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. यासाठी युट्युबच्या काही नियम व अटी आहेत. प्रेक्षकाने जाहिरातीवर क्लिक केले पाहिजे किंवा 10, 15 किंवा 30 सेकंद जाहिरात पाहिली पाहिजे तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील.

*युट्युब प्रिमियम
युट्यूब प्रिमियम या सुविधेतून जाहिरातीशिवाय पैसे कमवता येऊ शकतात. युट्युब प्रिमियम ही एक युट्युबची सशुल्क सदस्यता सेवा आहे. जे प्रेक्षक यूट्युब प्रिमियम सदस्यता घेतात, त्यांना जाहिरात मुक्त व्हिडिओ पाहता येतात. युट्युब क्रिएटर्सना यात काहीही करायची आवश्यकता नाही. जेव्हा युट्युब प्रिमियम सदस्य तुमचे व्हिडिओ पाहतात, तेव्हा तुम्हाला आपोआप पैसे मिळतात. युट्युब प्रिमियम सदस्य कितीवेळ तुमचे व्हिडिओ पाहतात यावर तुम्हाला किती पैसे मिळतात हे अवलंबून असते. युट्युब प्रिमियम सदस्यांना तुमचे व्हिडिओ ऑफलाईन डाउनलोड करणे आणि पाहणे ही सुविधा देखील उपलब्ध असते. तुमच्या व्हिडिओचा वॉचटाईम सुद्धा वाढतो.

*ब्रँडसोबत काम करून मिळवा पैसे ( Sponsership)
एखाद्या मोठ्या ब्रँडसोबत त्यांची स्पॉन्सरशिप घेऊन सुद्धा तुम्ही खुप पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला काही कंपन्यांशी संपर्क साधावा लागेल आणि कोणत्याही कंपनीची स्पॉन्सरशिप घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या उत्पादनाबद्दल माहिती सांगावी लागेल, ज्यासाठी ती कंपनी तुम्हाला पैसे देईल. एका माहितीनुसार, चॅनलचे जर 1000 सब्सक्राइबर्स असतील तर 20 डॉलर आणि 100000 सब्सक्राइबर्स असतील तर 2000 डॉलर चार्ज घेतला जातो. मात्र स्पॉन्सरशिप घेण्यासाठी तुमच्या चॅनलचे 1 हजाराहून अधिक सब्सक्राइबर्स असावे लागतात. फेमबिट, चॅनल पेज, क्राउडटॅप या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही स्पोंसरशिप घेऊ शकता. स्पोंसरशिप घेऊन तुम्ही त्यांच्या उत्पादनाची मार्केटिंग करून पैसे कमवू शकता.

*तुमच्या उत्पादनांची माहिती देऊन कमवा पैसे
तुम्ही युट्युब चॅनल चालवण्यासोबतच एक स्टोअर सुद्धा चालवू शकता किंवा तुम्ही अगोदरपासून इ -कॉमर्स व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या उत्पादनाचा प्रचार करू शकता. तुमचा इ-कॉमर्स व्यवसाय किंवा तुमच्या स्टोअरला याचा खुप फायदा होईल. जर तुमचे स्टोअर नसेल तर तुम्ही शॉपिफाईचा उपयोग करुन स्टोअर स्थापन करू शकता. स्टोअर सुरू केले की तुम्ही तुमच्या स्टोअरमधील वस्तूंचा प्रचार करून विक्री करू शकता. युट्युबवरून पैसे कमवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

ई-स्टोअर

ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ?

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

ऑनलाईन कोर्स बनवून तो विकू शकता

ऑनलाईन कोर्स बनविणे कोणासाठी फायद्याचे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर आम्ही सांगू इच्छितो की कोणीही स्वतःचा ऑनलाईन कोर्स बनवून तो विकू शकतो कारण यासाठी ना कुठल्या मोठ्या भांडवलाची गरज आहे ना की कुठल्या तंत्रज्ञानात प्राविण्य मिळविण्याची गरज आहे. तुम्हाला इतरांपेक्षा काय वेगळे माहिती आहे आणि त्याचे तुम्ही कोर्स स्वरूपात कसे रूपांतर करू शकतात एवढेच इथे महत्वाचे आहे.

ऑनलाईन क्लासेस कसे घ्यावे यावरील माहिती साठी खालील लेख वाचू शकता 

*स्पर्धा असूनही युट्युबमधून पैसे कसे कमवायचे ?
-तुमचा व्हिडिओ 10 मिनिटांपेक्षा मोठा बनवण्याचा प्रयत्न करा –
जेव्हा तुम्ही 10 मिनिटांपेक्षा मोठा व्हिडिओ बनवता तेव्हा तुम्हाला जाहिरातीतून जास्त पैसे मिळण्याची शक्यता असते. जे व्हिडिओ 10 मिनिटांपेक्षा मोठे असतात ते युट्युबच्या सर्च ऑप्शनमध्ये जास्त दिसतात. त्यामुळे तुमचा व्हिडिओ पाहिला जाण्याची जास्त शक्यता असते. तसेच तुम्ही दुसऱ्या युट्युबर्सची देखील मदत घेऊ शकता.

*आकर्षक आणि माहितीपूर्ण सामग्री तयार करा
आकर्षक आणि माहितीपूर्ण सामग्री असलेले व्हिडिओ जास्त पाहिले जातात. प्रेक्षक असेच व्हिडिओ सर्च करतात ज्यामुळे त्यांचे मनोरंजन होते किंवा त्यांना त्यातून काही माहिती मिळते. जर तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना आवडणारी माहिती दिली तर ते तुमचा पूर्ण व्हिडीओ पाहतील आणि भविष्यात आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या चॅनलवर येतील. तुम्ही युट्युब अॅनालिटीक्सच्या माध्यमातून पाहू शकता की कोण तुमचे व्हिडिओ जास्त पाहतात. त्यानुसार तुम्हाला समजेल की कशा प्रकारे व्हिडिओ तयार केले पाहिजे.  

*स्पष्ट व आकर्षक शब्दात हेडिंग बनवा
तुमच्या व्हिडीओचा तपशील किंवा हेडिंग हे लोकांना तुमचा व्हिडिओ शोधण्यास मदत करतात. तसेच तो व्हिडिओ पाहायचा की नाही हे देखील तुमच्या तपशीलावरूनच ठरवले जाते. त्यामुळे तुमच्या व्हिडिओचा तपशील हा स्पष्ट शब्दात असला पाहिजे.

*सातत्याने व्हिडिओ पोस्ट करत रहा
जर तुम्ही युट्युब चॅनल चालवत आहात तर तुम्हाला तुमच्या चॅनलवर सातत्याने व्हिडिओ पोस्ट करावे लागतील. जेव्हा तुम्ही सातत्याने व्हिडिओ पोस्ट करत असता तेव्हा प्रेक्षक तुमच्या चॅनलवर अॅक्टिव्ह राहतात. आकर्षक हेडिंग आणि थंबनेल बनवून तुम्ही तुमच्या चॅनलवर जास्त ट्रॅफिक मिळवू शकता. एक लक्षात घ्या की, युट्युब हे एक दृक श्राव्य म्हणजेच पाहिले आणि ऐकले जाणारे माध्यम आहे. त्यामुळे तुमच्या व्हिडिओची आणि ऑडिओची क्वालिटी उत्तम असली पाहिजे. तसेच सामग्री देखील उच्च दर्जाची असली पाहिजे. तसेच युट्युब एसईओकडे देखील लक्ष दिले पाहिजे. तुमच्या युट्यूबच्या लिंक फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. सोशल मिडिया मार्केटिंगच्या माध्यमातून तुमचे चॅनल विकसित करायला हवे.

*आपण आपल्या युट्युब चॅनेलवरुन पैसे कमवण्यासाठी तयार आहात का?
अनेकजण हे फक्त पैसे मिळवण्याच्या हेतूनेच युट्युब चॅनलची निर्मिती करतात. तर काही जणांना लोकांना नवनवीन माहिती पुरवणे, आपले विचार मांडणे याची आवड असते. मात्र अशा दोघांनाही युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. तुम्हाला ही पैसे कमवायचे असतील तर युट्यूब हा उत्तम पर्याय आहे. 

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेअर करा