आपण आसपास नजर टाकली तर बटाट्याचे चिप्स हा खाद्य प्रकार किती लोकप्रिय आहे याचे दर्शन आपल्याला घडते. त्यावरून आपल्याला त्याला असलेली मागणी तर कळेलच पण ही मागणी पुरी करताना किती प्रकारचे चिप्स तयार केले जात असतात याचीही कल्पना येईल. बाजारात साध्या चिप्स बरोबरच आकाराने आणि चवीने किती प्रकारची विविधता साधली जाते हे बघण्यासारखे आहे. बसस्टँड, रेल्वे स्टेशन, चित्रपट नाट्यगृहे, करमणुकीचे अन्य कार्यक्रम करणारी सभागृहे, अनेक प्रकारच्या पार्ट्या, विवाह समारंभातले भोजनाचे समारंभ, निरनिराळ्या प्रकारच्या बैठका, पर्यटन स्थळे, पिकनिक स्पॉटस्, मद्यपान गृहे आणि उपाहारगृहे अशा अनेक ठिकाणी बटाट्याच्या कापांना मागणी असते. एरवी तर हे काप खाल्ले जातातच पण विशेष करून उपवासाला ते चालत असल्याने धार्मिक स्थळांवर आणि मंदिरांत त्यांना विशेष मागणी असते. भारतात बटाट्याच्या चिप्सची फार मोठी बाजारपेठही आहे आणि अनेक लोक चिप्स तयार करून, विकून त्यातून मोठा नफाही मिळवत असतात. बटाटा हा या प्रकारातला सर्वात मोठा कच्चा माल. शिवाय तळण्याचे तेल हाही उत्पादन खर्चातला मोठा घटक असतो. हा उद्योग आपण घरगुती …

सर्वात लोकप्रिय स्नॅक बटाटा चिप्स (Potato Chips)
- September 24, 2020
- , 11:22 am
- , गृहउद्योग, महिला-उद्योग, लघु-उद्योग
माहिती शेअर करा
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on email