कमी गुंतवणुकीत एखादा चांगला फायदेशीर व्यवसाय करता यावा यासाठी अनेक उत्सुक असतात. त्यातही महिला वर्गाची घरच्या घरी बसून एखादा व्यवसाय करता येत असेल तर अधिक पसंती असते. ज्या महिला, विद्यार्थी, किंवा अगदी नोकरदार महिलांना काही कौशल्य अवगत आहे आणि दुसऱ्यांना प्रेझेंट देण्यासाठी हटके अशा काय वस्तू देता येतात याची जाण आहे त्याच्यासाठी गिफ्ट बास्केट हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. गिफ्ट बास्केट ही कल्पना नवी नाही. कित्येक वर्षे लोक एकमेकांना गिफ्ट देत आले आहेत आणि यापुढेही देत राहणार. उलट ऑनलाईन खरेदीची सुविधा आणि जवळजवळ दररोज बाजारात येत असलेल्या अनेक आधुनिक उपयुक्त वस्तू यामुळे गिफ्ट किंवा भेटवस्तू देण्यात अधिक विविधता आलेली दिसून येते आणि हा ट्रेंड वाढता आहे. बहुतेकजणांना आयुष्यात किमान एकदा तरी गिफ्ट मिळालेली असते आणि त्यांनीही कुणाला ना कुणाला किमान एकदा तरी गिफ्ट दिलेली असते. हे प्रमाण लक्षात घेतले तर या व्यवसायात संधी प्रचंड आहे हे सहज लक्षात येईल. हा व्यवसाय स्टार्ट अप म्हणून सुरु करावा अशी इच्छा असलेल्यांना …

गिफ्ट बास्केट, कमी गुंतवणुकीत होणारा फायदेशीर व्यवसाय
- September 18, 2020
- , 5:40 pm
- , ऑनलाइन-व्यवसाय
माहिती शेअर करा
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on email