Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे – संपूर्ण माहिती

आजच्या या संगणक आणि डिजिटल युगात ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक लोक चांगली कमाई करत आहेत हे ऐकून तुम्ही कधी आश्चर्यचकित झाला आहात का ? हो, अनेकदा… तुम्हालाही वाटते का आपणही या नव्या मार्गाद्वारे कमाई करण्याचा प्रयत्न करावा? हो नक्कीच…तर मग आमचा हा लेख आवर्जून वाचा कारण यामध्ये आम्ही एका अतिशय लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मद्वारे घरबसल्या तुम्ही नियमित कमाई कशी करू शकता याची सविस्तर माहिती दिली आहे.

आपल्या ग्राहकांपर्यंत खात्रीशीरपणे पोहचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया हे आहे असे आज अनेक व्यावसायिकांना वाटते. फेसबुक, व्हाट्सअँप, लिंक्डइन, स्नॅपचॅट आणि इतर अनेक सोशल मीडिया माध्यमांपेक्षा इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मला व्यावसायिकांची सर्वात जास्त पसंती मिळत आहे. का? तर ही काही खात्रीशीर आकडेवारी पहा:

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती

(Source: https://famemass.com/instagram-statistics/)

ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोनही व्यवसायांना इंस्टाग्राम हे फायद्याचे ठरत आहे आणि याच इंस्टग्रामद्वारे तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी या लेखात दिलेले मुद्दे विचारात घ्यावे लागतील. पण नक्की काय आहे हे इंस्टाग्राम? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर – हे एक फोटो आणि व्हिडिओचा वापर करून लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रभावी सोशल माध्यम आहे. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हा इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी किमान १ ते १.५ कोटी रुपये मानधन घेतो तसेच प्रसिद्ध सिनेतारका प्रियांका चोप्रा ही सुद्धा एका पोस्टसाठी किमान १ ते १.२५ कोटी रुपये मानधन घेते. पण तुम्ही म्हणाल हे तर खूप मोठे मोठे सेलिब्रिटी झाले, पण जे खूप प्रसिद्ध नाहीत त्यांचे काय? तर त्यांनाही चांगले मानधन मिळते. विश्वास बसत नसेल तर ही पहा काही आपआपल्या क्षेत्रातील भारतीय इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची उदाहरणे:

  • Diipa Büller-Khosla  – Fashion Influencer
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 17
  • Mohena Kumari Singh – Travel Influencer
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 18
  • Saransh Goila – Food Influencer
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 19
  • Dolly Singh – Social Media Influencer
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 20
  • Sahil Khan – Health & Fitness Influencer:
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 21

(Source- All images – https://www.instagram.com/)

वरील व्यक्तींना कदाचित तुम्ही ओळखत पण नसाल किंवा तुम्ही त्यांची नावे पहिल्यांदाच ऐकत असाल पण इंस्टाग्रामच्या दुनियेत या व्यक्ती उत्तमरीत्या प्रसिद्ध असून त्याद्वारे ते खूप चांगली कमाई करत आहेत. तुम्हालाही इंस्टाग्रामद्वारे नक्कीच कमाई करता येईल पण त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला सविस्तर समजून सांगाव्या लागतील. आमच्या या लेखात तुम्हाला – इंस्टाग्राम म्हणजे काय? इंस्टाग्रामवर फोल्लोअर्स कसे वाढवावेत? इंस्टाग्रामद्वारे पैसे कमविण्याचे प्रमुख मार्ग आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करताना कोणती काळजी घ्यावी याची अगदी सविस्तर माहिती दिली आहे.

हा लेख वाचल्यावर तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडेल – इतर लोक जर विविध प्रकारे इंस्टाग्रामद्वारे नाव आणि पैसा कमावत आहेत तर मग मी पण याचा का विचार करू नये? नक्कीच करा, कारण – केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे. घरबसल्या पैसे कसे कमवावेत याचे योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे, आजच आमच्या पोर्टलला सबस्क्राईब करा आणि डिजिटल संधींची अनेक दारे तुमच्यासाठी खुली करून घ्या.

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहितीचला तर मग जाणून घेऊ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दलची सविस्तर माहिती:

Table of Content

इंस्टाग्राम म्हणजे काय?

इंस्टाग्रामवर फोल्लोअर्स कसे वाढवावेत?

इंस्टाग्रामद्वारे पैसे कमविण्याचे प्रमुख मार्ग

इंस्टाग्रामवर पोस्ट करताना कोणती काळजी घ्यावी

  • इंस्टाग्राम म्हणजे काय?
Instagram logo in space gray iPhone 6
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 22

(Source – www.pinterest.com)

इंस्टाग्राम म्हणजे तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत, तुमच्या ठराविक ग्रुपसोबत आणि तुमच्या फॉलोअर्ससोबत तुमचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्याचे एक सोशल आणि डिजिटल माध्यम आहे. तुमचा व्हिजुअल कन्टेन्ट तुमच्या फॉलोअर्सला दाखवून तुम्ही त्यांच्याशी कुठूनही व कधीही संपर्कात राहू शकता आणि तेही अगदी मोफत. इंस्टाग्रामवर तुमचे खाते (Account) ओपन करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. २०१० साली १ मिलियन यूजर्स वरून २०२० साली १ बिलिअनपेक्षाही जास्त यूजर्स संख्या झालेले इंस्टाग्राम हे वैयक्तिक व व्यावसायिक वापरासाठी सर्वात लोकप्रिय असे सोशल माध्यम आहे.

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 23

(Source – www.socialpilot.com)

आपले नवे आणि जुने मित्र सध्या काय करत आहेत किंवा एखादा ब्रँड कशा प्रकारचे डिजिटल मार्केटिंग करत आहे हे तपासून पाहण्याची आपल्या सर्वांमध्ये कमालीची उत्सुकता असते आणि याच गोष्टींचा मागोवा काढण्यासाठी इंस्टाग्राम हा या डिजिटल युगातील सर्वात सोपा मार्ग आहे. इंस्टाग्राम फक्त फोटो टाकणे, व्हीडीओ शेअर करणे एवढ्यापुरताच मर्यादित नसून याद्वारे आज अनेक लोक उत्तम कमाई करत आहेत आणि यासाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुमचे इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स व तुमचा त्यांच्यावर असलेला प्रभाव ही आहे. इंस्टाग्रामद्वारे कमाई करणाऱ्या लोकांना Instagram Influencer किंवा Digital Earner असे म्हणतात.

तुम्हालाही इंस्टाग्रामद्वारे अतिरिक्त कमाई करायची आहे का? हो… मग त्यासाठी आधी तुम्हाला इंस्टाग्रामवर तुमचे प्रामाणिक फॉलोअर्स जोडावे लागतील आणि हे काही खूप अवघड काम नाहीये. इंस्टाग्रामवर तुमचे फॉलोअर्स कसे जोडावे व त्यांची संख्या कशी वाढवावी यासाठी पुढील टिप्स नीट समजून घ्या आणि त्यांचा नक्की अवलंब करा.

  • इंस्टाग्रामवर फॉलोअर्स कसे वाढवावेत?

कोणत्याही गोष्टीची सुरुवात केल्यावर त्याचे परिणाम काही लगेच दिसत नाही तसेच इंस्टाग्रामचे सुद्धा आहे म्हणजेच तुम्ही Account ओपन केल्याकेल्या एका रात्रीत काही तुमचे लाखो फॉलोअर्स होणार नाहीत त्यासाठी निश्चितच वेळ लागेल. तुमचे काम एकच, इंस्टाग्रामवर आपले फॉलोअर्स वाढवणे आणि त्यांच्यावर आपल्या कामाची छाप सोडणे. पण फॉलोअर्स वाढविण्यासाठी काय करावे लागेल? तर खालील सोपे पर्याय समजून घ्या:

  • तुमचे आकर्षक प्रोफाइल बनवा:

इंस्टाग्राम वर Keyword आणि Hashtag सर्चला खूप महत्व आहे आणि म्हणूनच तुमचे प्रोफाइल बनवताना त्या Keywords चा आणि हॅशटॅगचा योग्य मेळ साधून नव्याने आलेल्या व्यक्तीला तुमचे अकाउंट भावेल अशी माहिती अगदी थोडक्यता टाका.

  • नियमितपणे पोस्ट करा:

तुमचे फॉलोअर्स हे नियमितपणे तुमचे इंस्टाग्राम अकाउंट चेक करत असतात आणि तुम्ही कोणकोणते नवीन फोटो किंवा पोस्ट टाकत आहात याचीच त्यांना जास्त उत्सुकता असते. आपले फॉलोअर्स कोणत्या वेळी सर्वात जास्त ऍक्टिव्ह असतात हे तपासून तुम्ही त्यावेळेनुसार जर पोस्ट केले तर तुमच्या पोस्टला उत्तम प्रतिसाद मिळत राहतो.

  • कल्पकतेचा योग्य वापर करा:

इंस्टाग्रामवर एकाच विषयाशी किंवा क्षेत्राशी निगडित लाखो अकाउंट्स आहेत आणि म्हणूनच ज्याच्या पोस्ट कल्पक, काहीतरी वेगळ्या, भन्नाट आणि लोकांना आवडतील अशा असतील त्यांची फॉलोअर्स संख्या नक्कीच वाढत जाते म्हणूनच तुमच्या पोस्ट टाकताना कल्पकतेचा योग्य वापर करा.

  • तुमच्या क्षेत्राशी निगडित चर्चांमध्ये सहभाग घ्या:

तुम्ही फॅशन, स्पोर्ट्स, फूड, ट्रॅव्हल किंवा अशा कोणत्याही क्षेत्राशी निगडित पोस्ट्स करत असाल तर त्यांच्याशी संबंधित सुरु असलेल्या चर्चा किंवा स्पर्धा यांच्यामध्ये भाग घेऊन तिथेही तुमचे वेगळेपण सिद्ध करा. यामुळे अनेक इतर लोकांना तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटची माहिती होऊन तेसुद्धा जर प्रभावित झाले असतील तर तुम्हाला नक्कीच फॉलो करतील.

  • वेगवगेळ्या स्पर्धांचे आयोजन करा व आकर्षक पारितोषिके जाहीर करा:

इंस्टाग्रामवर स्पर्धा आयोजन करणे म्हणजे खूप काही व्यवस्था करावी लागते असे नाही तर ‘तुमच्या बालपणाचा एखादा लक्षात राहील असा फोटो’, ‘तुम्ही प्रवास केलेल्या आवडत्या ठिकाणाचा फोटो’, ‘तुमच्या मुलांचा पहिला फोटो’ अशा स्पर्धा घेऊन त्यासाठी आकर्षक पारितोषिके म्हणजेच एखाद्या ब्रँडचे डिस्काउंट कूपन, ऑनलाईन शॉपिंगचे कूपन किंवा तुमचे एखादे प्रॉडक्ट जाहीर करा. याद्वारे अनेक लोकांना तुम्ही आकर्षित करून त्यांना तुमचे अकाउंट फॉलो करायला प्रोत्साहित करू शकता.

  • इंस्टाग्रामच्या विविध फीचर्सचा लाभ घ्या:

इंस्टाग्रामवर अनेक उपयोगी फीचर्स आहेत जसे की इंस्टाग्राम स्टोरीज, इंस्टाग्राम लाईव्ह, इंस्टाग्राम फिल्टर्स ज्यांच्या वेळोवेळी वापराने तुम्ही तुमच्या फॉलोअर्सच्या उत्तम संपर्कात राहून त्यांना तुमच्या कामाची किंवा प्रमोशनची योग्य माहिती देऊ शकाल. आजचे फॉलोअर्स हे तांत्रिक बाबतीत निपुण असतात आणि त्यामुळेच त्यांचाही अपेक्षा असतात की तुम्ही सुद्धा तंत्रज्ञानाचा व उपलब्ध फीचर्सचा योग्य वापर केला पाहिजे.

  • तुमच्या क्षेत्रातील इतर इन्फ्लुएर्न्सला फॉलो करा व त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करा:

इंस्टाग्रामवर एकाच विषयाशी निगडित वेगवेगळ्या अकाउंटला फॉलो करणाऱ्यांची संख्याही अफाट आहे आणि म्हणूनच तुमच्या क्षेत्रातील इतर इन्फ्लुएन्सरशी तुमचे चांगले संबंध ठेऊन त्यांच्याही फॉलोअर्सला तुम्ही तुमच्या अकाउंटकडे आकर्षित करू शकता.

इंस्टाग्रामवर तुमचे किती फॉलोअर्स आहेत याला महत्व नसून त्यातील नक्की कितीजण तुमच्या पूर्ण प्रभावाखाली आहेत हे महत्वाचे आहे म्हणजेच एखाद्या अकाउंटला १ लाखाहूनही अधिक फॉलोअर्स असून १ हजार सुद्धा एंगेजमेंट्स (लाईक्स, शेअर्स किंवा परचेस) होत नसतील तर व्यावसायिकदृष्ट्या ते अकाउंट तितकेसे फायदेशीर समजले जात नाही पण याउलट जर १० हजार फॉलोअर्समधून ७ हजार एंगेजमेंट्स येत असतील तर त्या अकॉउंटला चांगली व्यावसायिक मागणी राहते. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स निवडताना व्यावसायिक कोणत्या विकल्पांना अधिक महत्व देतात ते या चित्राद्वारे समजून घ्या:

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 24

(Source – www.talkwalker.com/blog/instagram-influencers-india)

वर नमूद केलेले विविध पर्याय वापरून तुमची इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या वाढवून तुमच्या अकॉउंटकडे व्यावसायिकांना डिजिटल प्रमोशन करण्यासाठी आकर्षित करून त्याद्वारे खात्रीशीर आणि उत्तम कमाई करू शकता. पण इंस्टाग्रामद्वारे कमाई करण्याचा हा एकच मार्ग आहे का? नाही…इंस्टाग्रामद्वारे कमाई करण्याचे काही प्रमुख मार्ग पुढील मुद्द्यात सविस्तर दिले आहेत.

  • इंस्टाग्रामद्वारे पैसे कमविण्याचे प्रमुख मार्ग:

सध्या उपलब्ध असणाऱ्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैंकी इंस्टाग्राम हा पैसे व प्रसिद्धी मिळविण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील ७०% हून अधिक व्यावसायिक इंस्टाग्रामवर आपल्या विविध प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसचे प्रमोशन करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात कारण इंस्टाग्रामद्वारे १० पैकी ६ जण हे खात्रीशीर खरेदीदार असतात असे ठराविक आकडेवारीतून दिसून आले आहे. आकर्षक आणि उच्च दर्जाचे फोटो असणारे प्रॉडक्ट्स इंस्टाग्रामवर चांगला खप मिळवून देतात. जर तुम्ही उत्तम फोटोग्राफर असाल किंवा तुमच्या आवडीचे फोटो काढण्याची अथवा स्वतःचे फोटो काढण्याची कला तुम्हाला अवगत असेल तर इंस्टाग्रामद्वारे खाली दिलेल्या प्रमुख मार्गांनी तुम्ही उत्तम कमाई करू शकता.

  • इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर बनून स्पॉन्सर्ड पोस्ट टाकणे:

इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणजे ज्याचा आपल्या फॉलोअर्सवर उत्तम प्रभाव आहे. या व्यक्ती आपल्या पोस्टद्वारे फॉलोअर्सला प्रभावित करून त्यांना विविध प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसची खरेदी करण्यासाठी उत्तमरीत्या पटवतात. फॉलोअर्सच्या लेखी अशा लोकांच्या मताला, त्यांच्या सूचनांना विशेष महत्व असते आणि त्यामुळेच इन्फ्लुएन्सर्स ज्या ब्रँडचे प्रमोशन करत असेल त्यांची सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट खरेदी करायला फॉलोअर्स खात्रीने तयार होतात. विविध ब्रँड्स स्वतः लोकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी होतील का नाही याबद्दल साशंकच असतात आणि म्हणूनच इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सद्वारे ते आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचे प्रमोशन करायला प्राधान्य देतात.

(इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर कसे बनावे हे जाणून घेण्यासाठी आम्ही सादर केलेला हा सविस्तर लेख वाचा)

या मार्गाद्वारे कमाई करण्यासाठी खालील टिपा समजून घ्या व त्यांचा वेळोवेळी वापर करा:

  • तुमची फॉलोअर्स संख्या किती आहे, त्यांचा एंगेजमेंट रिपोर्ट कसा आहे आणि तुमचा एकंदरीत त्यांच्यावर कसा प्रभाव आहे या सर्व गोष्टी ब्रँड विचारात घेऊन तुमची निवड करू शकतात व यासाठी ही सर्व आकडेवारी तुम्हालाही माहिती असणे गरजेचे असते. Instagram Business Account द्वारे तुम्हाला ही सर्व आकडेवारी कोणत्याही तांत्रिक बाबी न वापरता अगदी सहज उपलब्ध होऊ शकते.
  • तुमचे विविध डिजिटल व सोशल माध्यमांवर प्रभावी वर्चस्व प्रस्थापित असेल तर अनेक ब्रॅण्ड्स तुम्हाला नक्कीच प्रमोशनसाठी विचारणा करतील पण या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः सुद्धा Influencer Marketplace, Fohr Card, Grapevine, Crowd Tap, indaHash या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला सोयीस्कर ब्रॅण्डशी संपर्क करून तुमच्या इन्स्ट्राग्रामवरील प्रभावाची त्यांना माहिती देऊन त्यांच्याशी व्यावसायिक संबंध जोडू शकता.
  • फक्त पैसे कमविण्याच्या मोहापायी तुमच्या फॉलोअर्सला रुची नसणाऱ्या, त्यांच्या गरजांशी निगडित नसणाऱ्या कोणत्याही ब्रँडचे उगाचच प्रमोशन करू नका. असे केल्याने तुमचे फॉलोअर्स कमी होऊन भविष्यातील चांगल्या संधी तुम्ही गमावून बसाल कारण एकदा फॉलोअर्सवर कमी झालेला प्रभाव परत प्रस्थापित करणे कठीण होऊन जाते.
  • ज्या ज्या वेळी तुम्ही प्रमोशनल किंवा स्पॉन्सर्ड पोस्ट टाकत असाल तेव्हा Sponsored Post किंवा Paid Partnership With हे टॅग तुमच्या फॉलोअर्सला नक्की दर्शवा. यासाठी पोस्टखाली किंवा कन्टेन्टमध्ये सुद्धा तुम्ही स्पॉन्सर्ड हॅशटॅगचा वापर करू शकता. उदाहरणसाठी या पोस्ट पहा:
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 25

(Source: https://www.oberlo.in/blog/make-money-instagram)

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 26

(Source – https://www.instagram.com/p/Bmv0M9DDFjD/)

काही निश्चित आकडेवारीद्वारे असे दिसून येते की या मार्गाने एका पोस्टसाठी साधारणतः २००$ ते ४००$ इतकी कमाई आरामात होऊ शकते पण त्यासाठी तुम्हाला आधी त्या दर्जाचे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स बनावे लागेल. एक लक्षात ठेवा इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स बनण्यासाठी प्रचंड मेहनत, चिकाटी, कल्पकता, आपल्या फॉलोअर्ससोबत चांगले संबंध आणि प्रभाव असणे गरजेचे आहे कारण हा प्रवास एकाच दिवसात नक्कीच पूर्ण होणार नाही.

  • Affiliate Marketing करा:

Affiliate Marketing हा ऑनलाईन विश्वातील पैसे कमविण्याचा सर्वात खात्रीशीर आणि फायदेशीर पर्याय आहे. Affiliate Marketing म्हणजे दुसऱ्यांचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसची खरेदी करण्यासाठी तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लोकांना प्रोत्साहित करणे आणि जर तुमच्या लिंकद्वारे कोणत्याही फॉलोअर्सने खरेदी केली तर त्या बदल्यात आकर्षक कमिशन मिळवणे. Influencer हे ब्रॅण्डचा प्रसार करण्यासाठी प्रामुख्याने निवडले जातात तर Affiliate Marketer हे प्रामुख्याने ब्रॅण्डचा सेल्स वाढविण्यासाठी निवडले जातात. उदाहरणासाठी ही पोस्ट पहा ज्याद्वारे प्रॉडक्टचे प्रमोशन करण्यात आले आहे.

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 27

(Source: https://www.oberlo.in/blog/make-money-instagram)

Affiliate Marketing द्वारे इंस्टाग्रामवर कमाई करण्यासाठी खालील महत्वाच्या टिपा लक्षात ठेवा:

  • इंस्टाग्राम वर affiliate लिंक ही फक्त bio मध्येच टाकता येत असल्याने एकावेळेस तुम्ही फक्त एकाच प्रॉडक्टचे प्रमोशन करू शकाल. याला पर्याय म्हणजे तुमच्या पोस्ट कन्टेन्ट मध्ये प्रोमोकोड्सचा योग्य वापर करणे हा आहे.
  • ClickBank, RewardStyle, Amazon Affiliate यासारख्या लोकप्रिय affiliate मार्केटप्लेसेसद्वारे तुम्ही थेट ऑनलाईन मर्चंट्सला संपर्क करू शकता.
  • तुमच्या फॉलोअर्सला आग्रह करण्यापेक्षा वेगवेगळ्या कल्पक युक्त्या वापरून ते स्वतःहून तुमच्या affiliate link द्वारे कसे खरेदी करतील याचा विचार करा. 
  • ज्या पोस्टद्वारे तुम्ही affiliate marketing करत आहात त्या पोस्टमध्ये तुमचा प्रोमोकोड किंवा वेबसाईट लिंक टाकायला विसरू नका म्हणजे कोणत्या पोस्टद्वारे किती सेल झाला आहे हे तुम्हाला आणि त्या प्रॉडक्टचा सेल करणाऱ्या कंपनीला समजणे सोपे जाईल.

Affiliate Marketing हे निश्चितच एवढे सोपे नाही पण एकदा का तुम्हाला या मार्गाद्वारे कमाई करणे जमले तर मग तुमच्या कमाईला आणि पर्यायाने भरभराटीला कोणत्याही मर्यादा नसतील. Affiliate शी संबंधित एखादी वेबसाईट बनवून किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांचा वापर करून तुम्ही या पर्यायाला तांत्रिकदृष्ट्या अजून समृद्ध करू शकता.

  • तुमचे फोटो विका:

इंस्टाग्राम हे फोटोचा महासागर असलेले एक सोशल अँप आहे आणि खास फोटोसाठीच अनेक लोक याचा व्यावसायिक वापरसुद्धा करत आहेत. तुमचे फोटो, पेन्टिंग, ऍनिमेशन्स, 3D फोटो किंवा भन्नाट व्हिडिओ इंस्टाग्रामवर विकून तुम्ही त्याद्वारे चांगली कमाई करू शकता. उदाहरणासाठी ही पोस्ट पहा:

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 28

(Source: https://www.oberlo.in/blog/make-money-instagram)

या मार्गाद्वारे चांगली कमाई करण्यासाठी खालील काही खास टिपा आवर्जून वापरात आणा:

  • तुम्ही जर उच्च दर्जाचे फोटो काढू शकलात किंवा उपलब्ध फोटोंना विविध सॉफ्टवेअर्स वापरून भन्नाट इफेक्ट देऊ शकलात तर अशा फोटोला इंटस्टाग्रामवर नेहमीच मागणी राहिली आहे.
  • तुमचे फोटो जितके ओरिजिनल, कल्पक आणि आकर्षक असतील तेवढी त्यांना जास्त मागणी राहील. असे फोटो पोस्ट करताना त्यांच्याशी संबंधित लोकप्रिय हॅशटॅग्स आवर्जून वापरा.
  • 500Pix किंवा Twenty20 यासारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचे फोटो प्रदर्शित करून विविध ब्रॅण्ड्सला तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओकडे आकर्षित करू शकाल.
  • तुमच्या फॉलोअर्सच्या मागणीनुसार Printful किंवा Teelaunch यासारखे प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमचे फोटो पोस्टर्स, फोन कव्हर, कॉफी मग, पिल्लो कव्हर किंवा इतर कशावरही छापून देऊन त्यांचे थेट तुमच्या ग्राहकांना घरपोच वितरण करतील.

अनेक नावाजलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार इंस्टाग्रामद्वारे आपला पोर्टफोलिओ जगभरात पसरवून फोटो आणि नवनवीन प्रोजेक्टसद्वारा चांगली कमाई करत आहेत.

  • इंस्टाग्राम शॉपद्वारे तुमची स्वतःची उत्पादने विका:

इन्फ्लुएन्सर किंवा Affiliate मार्केटिंग हे जर तुम्हाला थोडे अवघड वाटत असेल तर हा पर्याय खास तुमच्यासाठीच आहे असे समजा. ५०% इंस्टाग्राम यूजर्स हे कमीत कमी एक तरी बिजिनेस फॉलो करतात आणि गरजेच्या वेळी थेट इथूनच खरेदी करतात असे ताज्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

तुमचे स्वतःचे दुकान असेल किंवा तुम्ही डिस्ट्रिब्युटर असाल तर Instagram Shop द्वारे तुम्ही याची थेट ग्राहकांना विक्री करू शकाल. यासाठी तुम्हाला इन्व्हेंटोरी, प्रॉडक्टची उपलब्धता, त्यांचे वितरण, ग्राहक संबंध, रिटर्न प्रॉडक्टची व्यवस्था आणि आर्थिक देवाण-घेवाण यासर्व गोष्टींची तयारी विक्री करण्यापूर्वीच करून ठेवावी लागेल. उदाहरणासाठी खालील MVMT चे इंस्टाग्राम शॉप पहा:

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 29

(Source: https://www.oberlo.in/blog/setting-up-instagram-shop)

इंस्टाग्राम अँप व्यतिरिक्त कुठेही न जाता तुमचे फॉलोअर्स थेट इथूनच खरेदी करू शकतील आणि यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यास नक्कीच फायदा होईल. यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष फिजिकल उत्पादनांव्यतिरिक्त कोणतेही डिजिटल प्रॉडक्ट्स, गॅजेट्स, ई-बुक्स, तुम्ही बनविलेले ऑनलाईन कोर्सेस किंवा तुम्ही स्वतः काढलेले फोटो सुद्धा विकू शकता.

(ऑनलाईन कोर्सेस बनवून घरबसल्या चांगली कमाई कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख वाचा)

पण तुमचे दुकानही नाहीये, तुम्हाला इन्फ्लुएन्सर किंवा affiliate पण जमणार नाही असे वाटते तर मग तुम्ही कशी कमाई कराल? अशा लोकांसाठी खालील पर्याय कामी येऊ शकतो.

  • ड्रॉपशिपिंग किंवा प्रिंट-ऑन-डिमांड ची उत्पादने विका

ड्रॉपशिपिंग किंवा प्रिंट-ऑन-डिमांड म्हणजे तुमच्याकडे आलेल्या विविध उत्पादनांच्या मागण्या या तुम्ही ज्या उत्पादन पुरवठादारासोबत जोडलेले असाल त्याच्याकडे ड्रॉप करता आणि मग तो ती उत्पादने तुमच्यातर्फे त्या ग्राहकांना थेट घरपोच वितरित (शिप) करतो. ड्रॉपशिपिंग किंवा प्रिंट-ऑन-डिमांडद्वारे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करता, कोणत्याही मालाची साठवणूक न करता व उत्पादने वितरण करण्याची कोणतीही जबाबदारी न घेता तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या किंवा फॉलोअर्सच्या मागण्या सहज पूर्ण करू शकाल. उदाहरणासाठी खालील पोस्ट पहा:

Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती
Instagram द्वारे महिन्याला लाखो रुपये कसे कमवावे - संपूर्ण माहिती 30

(Source: https://www.oberlo.in/blog/make-money-instagram)

(प्रिंटऑनडिमांड या ऑनलाईन व्यवसाय प्रकाराबद्दल अधिक समजून घेण्यासाठी आमचा हा लेख आवर्जून वाचा.)

यामध्ये तुमच्या फॉलोअर्सच्या आवडी व गरजेनुसार तुम्हाला हे प्रॉडक्ट्स उपलब्ध करून द्यावे लागतील. यासाठी तुम्ही स्वतंत्र वेबसाईट किंवा शॉपीफाय सारख्या अतिशय सोप्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमचा व्यवसाय सुरु करू शकता व इंस्टाग्रामवरील विविध पोस्टद्वारे तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करू शकाल.

(ड्रॉपशिपिंग व्यवसाय करून यशस्वी उद्योजक कसे बनावे याची सविस्तर माहिती आमच्या या लेखात दिली आहे.)

काय मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आले असेलच की इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मचा वैयक्तिक व व्यावसायिक वापर करून कोणकोणत्या मार्गाने तुम्ही अतिरिक्त कमाई करू शकाल. फॉलोअर्स वाढविणे व ते टिकवून ठेवणे हे ज्याला जमले त्याला इंस्टाग्रामवर कमाई करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, म्हणूनच इंस्टाग्रामवर पोस्ट करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहू.

  • इंस्टाग्रामवर पोस्ट करताना कोणती काळजी घ्यावी?

इंस्टाग्रामवरील तुमचे अकाउंट आणि त्याला फॉलो करणारी संख्या याचे एका परिवाराप्रमाणेच नाते असते आणि म्हणूनच तुमचा परिवार कसा टिकवावा आणि वाढवावा यासाठी खालील टिपा नीट समजून घ्या:

  • वेगवेगळ्या पोस्ट बनविणे हे एक आव्हानच असते आणि म्हणूनच पोस्टच्या आयडिया मिळविण्यासाठी तुमच्या क्षेत्रातील Influencers च्या पोस्ट नियमितपणे पाहा व त्याचप्रमाणे चालू घडामोडींवरही लक्ष ठेवा.
  • दुसऱ्यांची पोस्ट आयडिया किंवा कन्टेन्ट हुबेहूब वापरू नका किंवा त्याची चोरी करू नका. त्यांची पोस्टची आयडिया समजून घेऊन ती तुमच्या पद्धतीने मांडा कारण तुमचे वेगळेपण जपणे तुम्हाला जमले तर तुमच्या कंटेन्ट सोबत तुम्ही विविध प्रयोग किंवा युक्त्या वापरून तुमच्या फॉलोअर्सवर अधिक प्रभाव पडू शकता.
  • तुमच्या फॉलोअर्सला समजेल अशा भाषेत सुटसुटीतपणे तुमच्या पोस्टची मांडणी करून तुमच्या वेबसाईटची किंवा affiliate ची लिंक अथवा प्रोमोकोड लक्षात येतील अशा पद्धतीने दर्शवा.
  • जर तुम्ही एखादा फोटो टाकला तर त्याबद्दलची विशेष माहिती (जागा, वेळ, त्या फोटोतील वेगळेपण), तुमच्या व्हिडिओमधील आकर्षक इफेक्ट्स, तुमच्या लिखाणातील आकडेवारी व त्याची मांडणी, तुमच्या बोलण्यात वापरले जाणारे तरुणाईचे लोकप्रिय शब्द या गोष्टींचा तुम्ही कसा वापर करता यानुसार तुमचे फॉलोअर्स हे टिकूनही राहतील व तेच Mouth Publicity द्वारे तुम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहचवतील.
  • तुमच्या फॉलोअर्सच्या कंमेंटला वेळोवेळी उत्तरे (रिप्लाय) देत जा. यामुळे तुमचे अस्तित्व हे खरे आहे हे कळणे त्यांच्यासाठी सोपे जाते. इंस्टाग्रामवर सुद्धा अनेक खोटी किंवा फसवी अकाउंट्स असतात आणि त्यामुळेच लोकांचा विश्वास संपादन करणे व तो जतन करणे हे आव्हान तुम्हाला पेलावे लागेल.
  • तुमच्या फॉलोअर्सचा तुमच्या पोस्टवर काही आक्षेप असेल तर तो शांतपणे समजून घ्या व जर तो योग्य असेल तर त्याप्रमाणे पोस्ट अद्ययावत करा आणि जर तो अयोग्य असेल तर प्रेमाने त्यांना समजवा. उगाचच त्यांच्याशी वाद घालू नका. तुमचा एक चुकीचा रिप्लाय तुमचे अनेक फॉलोअर्स तुमच्यापासून लांब करू शकतो.      
  • धार्मिक, राजकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करताना सखोल अभ्यास करूनच जी योग्य असेल ती बाजू समर्पकपणे मांडा. कोणतीही आक्षेपार्ह्य विधाने करून सामाजिक स्वास्थ बिघडवून स्वतःला व इतरांना अडचणीत आणू नका.

तुमच्या कंटेन्टचा ‘दर्जा’ हा तुमच्या फॉलोअर्सच्या ‘गरजा’ कश्या पूर्ण करतो ह्यावर तुमची फॉलोअर्स संख्या अवलंबून आहे.

शेवटी काय तर…

इंस्टाग्रामचा छंद म्हणून सुरु केलेला वापर तुम्ही पैसे कमविण्याचा अतिरिक्त मार्ग म्हणून सुद्धा तपासून पाहू शकता. कोणताही ब्रँड किंवा कंपनी Influencer किंवा affiliate marketer म्हणून तुमच्या नावाचा तेव्हाच विचार करेल जेव्हा तुमची फॉलोअर्स संख्या, त्यांच्याशी तुमची Connectivity, त्यांचा response टाईम आणि तुमचा त्यांच्यावर असलेला योग्य प्रभाव ह्यामुळे जर त्यांची सर्व्हिस किंवा एखादे प्रॉडक्ट याचा उत्तम खप होईल. याव्यतिरिक्त तुम्ही स्वतःचे इंस्टाग्राम शॉप किंवा ड्रॉपशिपिंग आणि प्रिंट-ऑन डिमांड याद्वारेही आपली उत्पादने विकून चांगली कमाई करू शकाल. आणि अगदी काहीच नाही तर आपले भन्नाट आणि उच्च प्रतीचे फोटोसुद्धा तुम्ही विकू शकता. मार्ग अनेक आहेत पण प्रत्यक्षात त्याचा अवलंब करणारे थोडेच आहे कारण झटपट कमाईची अपेक्षा ठेवून येणारे इथे सपशेल अपयशी ठरतात. शिस्त, नियमितपणा, कल्पकता, मार्केटिंग स्किल्स आणि फॉलोअर्सवर असलेले प्रभुत्व ही पंचसूत्री ज्यांनी जुळवून आणली त्यांनी इथून गाठोड भरून कमाई केली आहे. कारण शेवटी म्हणतात ना – ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही’ म्हणजेच लोकांना (इंस्टाग्रामच्या भाषेत फॉलोअर्स) काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय ते मान देत नाही.

शेअर करा

Leave a Comment