केळी वेफर्स व्यवसाय

 केळीचे वेफर्स ही एक सतत मागणी असणारी खाद्य वस्तू आहे. असे वेफर्स तयार करण्याचा धंदा चांगला चालतो आणि त्यात फायदाही मोठा होतो. मात्र फायदा मिळवण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे. 

१. स्वस्त कच्चा माल

२. सुलभ आणि यांत्रिक उत्पादन पद्धती 

३. ग्राहकांच्या मागणीनुसार माल तयार करणे


१. कच्चा माल

महाराष्ट्रात केळी बर्‍याच प्रमाणात पिकतेे. पूर्वी केळीच्या उत्पादनासाठी ख़ानदेशातला जळगाव जिल्हा विशेष नावाजला गेला होता पण आता जळगावची मक्तेदारी राहिलेली नाही. मराठवाड्यातले  नांदेड, हिंगोली हे जिल्हे आणि प. महाराष्ट्रातले सोलापूर, नाशिक आदि जिल्ह्यातही केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. मी या जिल्ह्यांचा विशेष उल्लेख करीत असलो तरी महाराष्ट्रातल्या इतरही अनेक जिल्ह्यात केळीचे उत्पादन होत आहे आणि वेफर्स तयार करण्याचा उद्योग करण्यास पुरेल एवढे ते आहे. 


वेफर्स तयार करण्यास कच्ची केळी लागते. आपण मोठ्या प्रमाणावर वेफर्स तयार करणार असू तर स्वत: शेतात जाऊन शेतकर्‍यांकडून थेटच खरेदी करावी. त्यामुळे मुख्य कच्चा माल फारच माफक दरात मिळतो. व्यापार्‍याकडून खरेदी केल्यास केळी फार महाग मिळतात. 


आपल्याला कोणत्या प्रकारचे वेफर्स तयार करायचे आहेत यावर केळीची निवड अवलंबून असते.  साधारणत: वेफर्स गोलच असतात पण त्यातही वेगळेपणा म्हणून काही उत्पादक लांबट आकाराचे वेफर्स तयार करतात. काही लोकांना असे लांबट वेफर्स आवडतात. मात्र लांबट आकाराचे वेफर्स तयार करण्यासाठी दक्षिण भारतातले सरळ आकाराची केळे लागतात. महाराष्ट्रात तशी केळी पिकत नाही. पण आपण लांबट आकाराचे वेफर्स तयार करण्याबाबत आग्रही असू तर त्यासाठी आवश्यक अशा जातीच्या केळीची लागवड शेतकर्‍यांना सांगून करून घ्यावी लागेल. अन्यथा आहेत त्या जातींच्या केळीपासून गोल आकाराचे वेफर्स तयार करावे लागतील. 


केळीच्या वेफर्सला लागणारे दुसरा मोठा कच्चा माल म्हणजे तेल. द. भारतात खोबरेल तेल खाण्यासाठी सर्रास वापरले जाते आणि वेफर्सही त्याच तेलात तयार करतात. मात्र महाराष्ट्रात पाम ऑईलचा वापर केला जातो. काही लोकांना खोबरेल तेलातले वेफर्स आवडतात पण महाराष्ट्रात पाम ऑईल वापरले जाते कारण ते खोबरेल तेलापेक्षा स्वस्तही असते, ते तुलनेने जास्त काळ टिकतात आणि बर्‍याच लोकांना ते आवडतात.


२ .सुलभ आणि यांत्रिक उत्पादन पद्धती 
वेफर्स तयार करणे हे काही फार अवघड काम नाही. कच्चे केळे सोलून त्याची साल काढून टाकणे आणि आतल्या केळाचे काप करून ते तळणे असे हे सोपे काम आहे. त्यांना खारट चव यावी म्हणून तेल तळण्यासाठी चांगले गरम झाले की त्यातच मिठ टाकतात. त्यामुळे वेफर्स मध्ये मीठ चांगले समान मुरते. वेफर्सला चांगली चव यावी म्हणून कोणी त्यावर मसाला टाकतात तर काही लोक केवळ तिखट टाकतात. ते मात्र वेफर्स तळून बाहेर काढल्यानंतर त्यावर टाकले जाते. झाले वेफर्स तयार. आता पिशव्या भरा आणि त्यांना बाजारात पाठवा. 


वेफर्स तयार करण्याची क्रिया सोपी असली तरी त्यातले केळी सोलण्याचे काम मोठे चिकाटीचे आणि भरपूर मेहनतीचे आहे. हे काम हाताने करायला गेलो तर त्यासाठीच्या मजुरीवर बराच खर्च होईल आणि उत्पादन खर्च वाढून नफ्याचे प्रमाण कमी होईल. म्हणून यंत्राचा वापर केला पाहिजे पण अजून तरी साल काढण्याचे काम हाताने केले जाते अशी माझी माहिती आहे. काप करण्याचे काम मात्र हाताने करीत बसू नये त्यासाठी यंत्रे आहेत. 


बाजारात काही सेमी ऑटोमेटिक यंत्रे मिळतात तर काही यंत्रे पूर्ण ऑटोमेटिक मिळतात. त्यांच्या किेमती उत्पादन क्षमतेनुसार कमी जास्त असतात. ५० ते ६० हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत किंमती आहेत. पण आपली गुंतवणूक क्षमता, आपण किती माल तयार करणार आहोत आणि  आपण किती माल विकू शकतो याचा विचार करून यंत्रे ठरवावीत. एवढे मात्र खरे की शक्यतो हाताने कामे करून मजुरीचा खर्च वाढवणे टाळावे.


३ ग्राहकांच्या मागणीनुसार माल तयार करणे
वर उल्लेख केलाच आहे. लोकांची आवड आणि मागणी विचारात घेऊन आणि आपण जी बाजारपेठ गाठणार आहोत यांचा विचार करून गोल, लांबट, केवळ खारे की मसाला घातलेले याचा निर्णय करावा. बाजारात सध्या कोणाचा माल येेतो आणि तो काय भाव विकला जातो, दुकानदार आणि  लहान सहान विक्रेते आपल्याला काय भाव देतील याचा हिशेब करावा. आपल्याला तेल आणि केळी काय भाव मिळतील याचाही विचार करावा आणि आपण किती नफा मिळवू शकतो याचा ताळमेळ घालावा. मगच या व्यवसायाला सुरूवात करावी.
पॅकिंग मटेरियल आकर्षक निवडावे आणि तशा आकर्षक पाकिटात किंवा पिशव्यात माला ऑटोमेटिक भरला जाईल अशा पॅकिंग यंत्रांचा वापर करावा.


अगदीच घरगुती धंदा म्हणून दररोज १० ते १५ किलो माल तयार केला तरीही किलोमागे आताच्या भावानुसार पन्नास ते साठ रुपये एवढा नफा रहातो. आणि दरमहा १५ हजार ते २० हजार रुपये कमायी होऊ शकते. मात्र मोेठ्या प्रमाणावर धंदा केल्यास दरमहा दीड ते दोन लाख  रुपयांचा नक्त नफा राहू शकतो. 
यंत्रांच्या माहितीसाठी यंत्रांचे निर्माते लिनोवा आणि विक्रेते गुनगुनवाला यांच्या संकेत स्थळांचा शोध घ्यायला हरकत नाही. इतरही अनेक उत्पादक आणि विक्रेते आहेत. 

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

ई-स्टोअर

ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला गरज आहे एका व्हर्चुअल (आभासी) दुकानाची आणि यासाठी तुम्ही एकतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करू शकता किंवा Shopify सारख्या खास ई-स्टोअर सुरु करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी पुरविणाऱ्या जबरदस्त प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. एक यशस्वी नवउद्योजक होण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल तर उत्तम आणि किफायतशीर सुरुवात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि यासाठीच नव्याने जर तुम्ही एखादा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करत असाल तर आम्ही तुम्हाला Shopify चा वापर करा हे प्राधान्याने सुचवू. का ?

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेअर करा