मसाले उद्योग कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा निरंतर मागणी असलेला उद्योग

  थोडी पार्श्‍वभूमी  

हा कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. तो कोणालाही करता येतो. अगदी घरगुती उद्योग म्हणूनही तो करता येतो आणि मोठा उद्योग म्हणूनही करता येतो. मसाल्याशिवाय जेवण बेचव वाटते त्यामुळे ती सर्वांची गरज झाली आहे म्हणून हॉटेल्स मधून मसाल्यांना चांगली मागणी असते. मसाले तयार करण्यासाठी अनेक प्रकारचा कच्चा माल वापरला जात असतो आणि त्यांचे मसाल्यातले प्रमाण कमी जास्त करून अनेक प्रकारचे मसाले तयार करता येतात. या व्यवसायात विविधतेला मोठा वाव आहे. मसाले तयार करण्याचे कौशल्य भारतीयांनी पिढ्यान्पिढ्या जतन केलेले असल्यामुळे कोणताही भारतीय उद्योजक मसाल्याच्या उद्योगात यशस्वी होऊ शकतो .  

भारतात हळद, धने, जिरे, मिरे, बडीशेप यांचा मसाले म्हणून चांगलाच वापर होत असतो. आणि त्यातले बहुतेक प्रकार भारतातच पिकतात. त्यामुळे तो मसाले तयार करणारा सर्वात मोठा देश मानला जातो. जगात वापरल्या जाणार्‍या मसाल्यांपैकी ७५ टक्के मसाले एकट्या भारतात तयार होतात ते अमेरिका, चीन, व्हिएतनाम, मलेशिया, बांगला देश, श्रीलंका या देशात प्रामुख्याने पाठवले जातात.   

भारतात मसाले तयार करणारांना जगाचें मार्केट मोकळे आहे. अनेक देशांतून भारतीय मसाल्यांना वाढती मागणी येत असल्यामुळे दरसाल मसाल्यांच्या निर्यातीत वाढ होत आहे. २०१६ -२०१७ या आर्थिक वर्षात भारतातून ६० लाख टन मसाले निर्यात केले गेले आहेत. त्यात लसणाची पावडर आणि तिखट यांचा वाटा मोठा होता.    शेवटी खाण्याच्या वस्तूला निरंतर मागणी  असते. म्हणजे या व्यवसायात कधी मंदी येणार नाही.

पूर्वी लोक आपल्या सोयीनुसार घरात स्वत:च मसाले तयार करीत असत पण आता आता महिला वेळेत बचत करण्यासाठी बाजारातून तयार मसाले आणायला लागल्यामुळे  मसाल्याच्या उद्योगाला चालना मिळाली आहे. त्यातच मसाले म्हणून वापरल्या जाणार्‍या वस्तूंना औषधी मूल्य असल्याचा प्रचार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तर एरवी मसाले न वापरणारे लोकही आयते मसाले वापरायला लागले आहेत आणि त्यातूनही मसाल्याचे मार्केट सतत वाढत चालले आहे.   

सर्वत्र एकच मसाला वापरण्याऐवजी प्रत्येक पाककृतीसाठी स्वतंत्र मसाला वापरण्याची प्रथा आता पडली आहे. मटण मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, चिकन मसाला, पाणीपुरी मसाला, चहा मसाला, असे हे प्रकार आहेत आणि त्याहीमुळे मसाल्यांचे मार्केट वाढत आहे.२०१७ साली भारतातून परदेशात १७ हजार ९८० कोटी रुपयांचे मसाले निर्यात झाले होते. त्याच्या दुसर्‍याच वर्षी ही निर्यात १९ हजार ५०५ कोटी रुपयांवर गेली. म्हणजे ही निर्यात वाढ वर्षाला ८ टक्के एवढी आहे. एकंदरीत हा सतत चालणारा, जागतिक बाजारात भारताचे वर्चस्व असणारा आणि मोठी वाढ असणारा धंदा आहे.   

गुंतवणूक  

मसाल्याच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य असे की, तो ५० हजार रुपयांपासून सुरू करता येतो. भांडवल दोन प्रकारचे असते. स्थिर भांडवल आणि  खेळते भांडवल स्थिर भांडवलात जागा, यंत्रसामुग्री, इमारत, परवाने आणि नोंदणीसाठी येणारा खर्च समाविष्ट असतो.  खेळत्या भांडवलात कच्चा माल, वेतन, विक्री व्यवस्था, करांची तरतूद इत्यादींचा समावेश होतो.   

या गोष्टी विचारात घेऊन प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो आणि कर्ज मागणीचा अर्ज करताना तो बँकेला सादर केला जात असतो. (पहा : प्रकल्प अहवाल)  

हा उद्योग सुरू करण्यापूर्वी काही परवाने आवश्यक आहेत.   कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी  AADHAR ,GST हा परवाना आणि Shop act नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची अनुमती गरजेची असते.(जीएसटी बाबतच्या माहितीसाठी लिंक). मसाले तयार करणार्‍या कंपनीची नोंदणी करणे  हाही एक उपचार असतो. तोही करावा लागतो.  

या शिवाय मसाल्याच्या उद्योगाला अन्न आणि औषध प्रशासनाचा (Food Safety and Standard Authority of India (FSSAI)) परवाना आवश्यक असतो.कारण मसाले हा खाण्याचा पदार्थ आहे.   मसाले तयार करताना काही पथ्ये पाळावी लागतात अन्यथा मसाल्यात काही दोष राहून ती खाणारांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल. या दृष्टीने या खात्याचे काही कडक नियम आहेत. ते समजून घेऊन पाळले पाहिजेत. मसाले तयार करण्याच्या उद्योगात  कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी असून चालत नाही.  

हा परवाना काढणे ही बाब आता सोपी झाली आहे. कारण या साठीचे form हे Onlineभरले जात असतात. आपल्याला हे तंत्र माहीत असेल तर आपण हे फॉर्म स्वत:च आपल्या संगणकावर  भरून सबमिट करू  शकतो. मात्र ही गोष्ट आपल्याला शक्य नसेल तर अशा कार्यालयाच्या परिसरातच आवश्यक ते फॉर्म ऑनलाईन भरून देणारे एजंट बसलेले असतात. त्यांची मदत घ्यावी.      

कच्चा माल

मसाले तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल भरड स्वरूपात मिळत असतो. हळदीचे खोंब मिळतात. तर काही पदार्थ कच्चा स्वरूपात मिळतात. काही भुकटीच्या रूपात मिळतात. आपण हे घटक पदार्थ कोणत्या स्वरूपात मिळवतो यावर आपल्या मसाल्याची गुणवत्ता अवलंबून असते.  उदाहरणार्थ. हिेंग हा पावडर आणि खडे या दोन्ही स्वरूपात मिळतो. आपण पावडर वापरली तर  तिच्यात भेसळ असण्याची शक्यता असते. लाल तिखट याचीही पावडर मिळते आणि आपणच मिरच्या खरेदी करून स्वत:च पावडर तयार करू शकतो. मसाल्यातल्या सगळ्या घटकांच्या बाबतीत आपण या दृष्टीने सावध असले पाहिजे कारण आपल्या मसाल्याची गुणवत्ता त्यावरच अवलंबून असते.  

खालील घटक पदार्थ मसाल्यासाठी आवश्यक असतात. 

० तिखट

० धने

० लवंग

० जिर

े ० काळे मिर

े ० मेथीचे बी

० हिेंग

० मोहरी डाळ

० जंगली विलायची

० बडीशेप

० पुदिना

० दगडफूल

० दालचिनी

० लसूण

० वाळलेला कांदा

० कडीपाला पावडर

० चिंच

या शिवाय मसाल्यासाठी आपण काय काय वापरू शकतो हे आपण ठरवायचे आहे. भारतात  प्रत्येक प्रांतात वेगळे मसाले तयार केले जातातच पण काही जातींचे मसाले निरनिराळे असतात. त्या त्या मसाल्याच्या घटक पदाथार्र्ंचे प्रमाण आणि ते तयार करण्याची रीत ही परंपरेने जतन केली गेली आहे. आपण ती समजून घेतली पाहिजे. प्रत्येक गृहिणीला त्याचे ज्ञान असते.

मसाले तयार करण्याची पद्धत   वॉशिंग:

मसाल्यासाठी आणले गेेलेले घटक पदार्थ खरेदी करून आल्यावर ते स्वच्छ धुवून ़घेतले पाहिजेत आणि नीट वाळवून घेतले पाहिजेत. घटक पदार्थात माती, छोटे दगड आणि अन्यही काही घाण असते. ते धुण्यातून निघून जातात. त्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचे प्रमाण आपण स्वत:च अंदाजाने ठरवावे. मसाल्याचे घटक पदार्थ धुण्यासाठी यंत्रांचाही वापर करता येतो पण अशी यंत्रे महाग असतात. धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी स्वच्छ असावे.    

ड्राइंग  

धुतल्यानंतर त्यांना वाळवून घेतले जाते. कारण ते सगळे नीट वाळवलेल्या स्वरूपात मिळतीलच असे नाही. ते उघड्यावर उन्हातही वाळवता येतात. पण नेहमी ऊन पडेलच असे नाही. शिवाय उन्हासाठी त्यांना उघड्यावरच टाकावे लागते. आणि तसे करताना वारा आला तर वार्‍याने त्यात पुन्हा घाण जमा होते. या वाळवण्याच्या पद्धतीला खर्च काहीच येत नाही हे खरे पण ती धोकादायक आहे.    तेव्हा घटकद्रव्ये वाळवण्यासाठी ड्रायर वापरले जातात. ते दोन प्रकारचे असतात. इलेक्ट्रीक म्हणजे विजेवर चालणारा ड्रायर आणि सोलर ड्रायर. (ही यंत्रे पुरवणार्‍या कंपन्यांची नावे या लेखाच्या शेवटी दिली आहेत.) सोलर ड्रायरही पावसाळ्यात नीट चालेल याची काही खात्री नसते पण त्याचा अंदाज घेऊन त्याच्या वापराचे वेळापत्रक ठरवता येते.  

रोस्टिंग

स्वच्छ धुतलेले आणि वाळवलेले घटक पदार्थ नंतर छान खरपूस भाजून घेतले जात असतात. मसाल्याचा स्वाद त्यावर अवलंबून असतो. शिवाय चव आणि रंगही अवलंबून असतो. ही प्रक्रिया आवश्यक आहे. भाजायला घेताना प्रत्येत घटक द्रव्य स्वतंत्रपणे भाजले पाहिजे.  

दळणे  

सर्वात शेवटी मसाल्याचे प्रमाण निश्‍चित करून ते दळून घेणे.  

मसाल्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामुग्री ही खालील प्रमाणे असते.   

इम्पॅक्ट पल्व्हरायजर – या प्रकारचे दळण यंत्र हे मीठ आणि हळद दळून घेण्यासाठी वापरले जाते आणि विशेष करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो.   

डबल स्टेज पल्व्हरायजर – हे यंत्र वर उल्लेख केलेल्या यंत्रासारखेच मीठ आणि हळदीसाठी वापरतात पण ते कमी प्रमाणात उत्पादन करावयाचे असल्यास वापरले जातेे.  

हॅमरमील  – कांडप यंत्र. ते मिरची, ऍझोवन, धने, दगडफूल, कडीपाला, तुळशीच्या मंजिर्‍या, काही औषधी वनस्पती, जिरे, मिरे, मोहरी हे कुटण्यासाठी वापरले जाते.  

स्पाईस मिल   – हे यंत्र वर उल्लेख केलेल्या बहुतेक पदार्थांना तर वापरले जातेच पण बडिशेप, मेथीचे दाणे, खसखस, तुळशीची पाने, पुदिना, लवंग, यांची कांडण करण्यासही वापरता येतेे.  

पाऊं डिंग मशीन – लहान आकाराच्या आणखी काही मसाला पदार्थांसाठी ही वापरतात.   

पॅकेंजिंग  अशा रितीने मसाला तयार झाला की, त्याची पाऊचमध्ये पॅकिंग केली जाते. त्यासाठी ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २०० ग्रॅम आणि ५०० ग्रॅम असे विविध आकाराचे पाऊच करावेत. पॅकिंगचे काम मशीननेच करावे. ते वेगानेही होते आणि माणसाचे हात लागून मसाले अशुद्ध होण्याचा धोका टळतो. आपल्या मसाल्याच्या पाऊ चवर मसाल्याचे नाव, वजन, पॅकिंग केल्याची तारीख एक्स्पायरी डेट, किंमत, उत्पादकाचे नाव, पत्ता हा मजकूर लिहिला पाहिजे. मसाले शाकाहारी असल्याची हिवरी खूण केली पाहिजे.

मनष्यबळ – मसाल्याच्या कारखान्यात काम करणारे मजूर किंवा कामगार हे फार प्रशिक्षित असण्याची गरज नाही. मसाले भाजणे आणि घटक पदार्थ बरोबर प्रमाणात मिसळणे या गोष्टी मात्र त्यांना जमल्या पाहिजेत. हे तंत्र तसे सोपे आणि एकदा कामावर घेतल्यानंतर कामगारांना  प्रशिक्षण देता येते.  

डिजिटल मार्केटिंग

मसाले तयार करणे एकवेळ सोपे पण मसाल्याचे मार्केटिंग बर्‍यापैकी अवघड असते. कारण मसाल्याच्या धंद्यात जाहिरातीची प्रचंड स्पर्धा असते. मोठ्या कंपन्या करोडो रुपये खर्चुन आपल्या जाहिराती करतात. त्यांच्या समोर लहान किंवा मध्यम आकाराच्या कंपन्यांचा पाड लागत नाही. मात्र आता डिजिटल मीडिया सर्वांच्या हाताशी आहे आणि त्यावर अगदी नगण्य खर्च करून जाहिराती करता येतात. तेव्हा लहान मसाले उत्पादकांनी या माध्यमाचा वापर करून व्हॉटस्ऍप, फेसबूक, बल्क स्केलवरील एसएमएस, ट्विटर अशा सगळ्या माध्यमांचा वापर करून आपली जाहिरात करावी. 

इंटरनेट युजर्सची संख्या ज्या वेगाने वाढते आहे ते पाहिले तर काही काळात बहुसंख्य जनता त्यांच्या खरेदीच्या गरजा पूर्ण होण्यसाठी इंटरनेटचाच वापर करेल असे म्हटले तरी ते गैर नाही.यामुळेच डिजिटल मार्केटिंग हे काळाची गरज बनले आहे 

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल माध्यमांचा प्रभावी वापर करून लोकांपर्यंत अगदी सहजरीत्या आपले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पोहचवू शकतात आणि यालाच सोप्या भाषेत डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

काही वेगळे मुद्दे : – 

१. धोके – मसाले थोड्या प्रमाणावर खाणे सुसह्य आहे पण कायम त्यात काम करणे हे मसाल्याच्या तिखट वासामुळे असह्य होत असते. परिणामी या व्यवसायात काम करण्यास साधारणत: तयार होत नाहीत. काही दिवस काम करून निघून जाण्याचे प्रमाण मोठे असते.  म्हणून मसाले तयार करणारांना सतत नवी माणसे शोधावी लागतात.  

२. मसाल्याचे ग्राहक विखुरलेले असतात आणि ते कमी प्रमाणातच खरेदी करीत असतात.  तेव्हा थोडी क्षमता आणि ग्राहकांची संख्या जास्त असे चित्र या व्यवसायात असते. अनेक दुकानांत माल ठेवावा लागतो. उधारीचे प्रमाण जास्त आणि वसुलीचे काम अवघड असते.

  ३. लहान प्रमाणात हा धंदा करणारांना हाताने पॅकिंग करावे लागते. कारण स्वयंचलित पॅकिंग मशीन महाग असते. हातांनी पॅकिंग केल्यास पुड्या फुटणे आणि असा माल परत येणे अशी स्थिती येते. तिला तोंड द्यावे लागते.  

४. या व्यवसायाचा विस्तार करणे अवघड जाते कारण तसे केल्यास स्वयंचलित यंत्रे आणावी लागतात आणि ती फार महाग असतात. तंत्रज्ञानातही सतत बदल होत असतात.  ते बदल आत्मसात करावे लागतात.  

५ मसाले तयार करणे तसे सोपे आहे आणि परिश्रम केल्यास ते जमते. शिवाय ग्राहक कायमच उपलब्ध असतात. त्यामुळे फार तांत्रिक कौशल्य आवश्यक नसल्याने या व्यवसायात शिरण्याचा मोह अनेकांना होतो. घराघरात हा धंदा चालतो परिणामी या व्यवसायात स्पर्धा मोठी असते. तिचा सतत विचार करावा लागतो आणि सतत बदल करून स्पर्धेेत रहावे लागतेे.  

विविध यंत्रे मिळण्याच पत्ते.    पल्व्हरायजर्स – काही चायजिन कंपन्या तयार करतात. जर्मन कंपन्याही आहेत भारतात   अहमदाबादेत अशी यंत्रे तयार होतात. 

शेअर करा