व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक जागेची निवड, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, दुकान किंवा कार्यालय यासाठी आवश्यक साधन सामुग्री उभी करणे अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. मात्र, बदलत्या काळात आपले कार्यालय घरातच थाटून व्यवसाय करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या आधुनिक संपर्क यंत्रणांमुळे कामाची वेळ आणि ठिकाण यामध्ये लवचिकता ठेवणे शक्य झाले आहे. घरात बसून काम करण्याचे अनेक मार्ग त्यामुळे खुले होत आहेत. त्यापैकी काहींसाठी घरातील एखाद्या खोलीमध्ये माल ठेवण्यासाठी काही जागा आवश्यक असते तर काही व्यवसाय पूर्णपणे ‘ऑनलाईन’ चालविता येतात. मात्र, या दोन्ही प्रकारात घरात उपलब्ध असलेली थोडीशी जागा पुरेशी ठरते.
घरातून व्यवसाय करण्याचे फायदे
* कमीतकमी गुंतवणुकीत असे व्यवसाय करता येऊ शकतात. व्यावसायिक जागा, साधनसामुग्री आणि गोडाऊनचे शुल्क याबरोबरच कर बचतही होऊ शकते.
* आपले उत्पादन व सेवा स्थानिक ग्राहक अथवा बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपलब्ध करून देणे शक्य होते.
* काम करतानाच कुटुंबियांना वेळ देता येणे शक्य असल्याने ‘वर्क- लाईफ बॅलन्स साधने सोपे होते. विशेषतः कुटुंबात लहान मुले अथवा वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांची देखभाल करणे सोयीचे होते.
* आपल्या व्यवसायात कुटुंबियांना समाविष्ट करून घेऊन व्यवसाय वाढविणे शक्य होते.
घरातून व्यवसाय करण्याचे तोटे
* कुटुंबाला अडथळा होणार नाही अशा प्रकारे घरातील जागा व्यवसायासाठी कार्यालय म्हणून अथवा गोडाऊन म्हणून वापरणे काहीसे आव्हानात्मक ठरते.
* व्यवसाय घरातूनच करणे शक्य असले तरी व्यवसायाच्या प्रकारानुसार काही साधनसामुग्रीचा जुळवाजुळव करणे व आवश्यक ते परवाने मिळविणे आवश्यकच असते. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक स्वयंपाकाची साधने आणि अन्न, औषध प्रशासन,स्थानिक प्रशासन यांच्याकडून आवश्यक परवाने मिळविणे गरजेचे आहे.
* व्यवसायाची सुरुवात घरातूनच केली तरी कालांतराने व्यवसाय वाढल्यावर नवी जागा घेणे आणि कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे ठरू शकते.
* घरातून काम करण्याने भरपूर स्वातंत्र्य मिळते हे खरे असले तरीही सतत माणसांमध्ये राहण्याची सवय असणाऱ्यांना त्यामुळे एकाकी आणि कंटाळवाणे वाटू शकते.
घरातून करण्याजोगे १३ व्यवसाय
१) वस्तूंची ऑनलाईन विक्री
अनेक मोठे व्यवसायही होलसेल भावाने खरेदी आणि रिटेल भावाने विक्री या अतिशय साध्या तत्वावर सुरू आहेत. आपण जर कधी परदेश वारी केली असेल तर त्या ठिकाणी उपलब्ध असलेली एखादी वस्तू, जी आपल्या देशातील बाजारपेठेत दुर्मीळ असेल, तर ती मोठ्या प्रमाणात खरेदी करून आपल्या स्थानिक बाजारपेठेत विक्री करणे. मात्र, अशी वस्तू निरखण्यासाठी तशी ‘नजर’ असणे गरजेचे आहे. अशा वस्तू मागविणे आणि साठविणे सोपे असेल तर घरबसल्या त्याच्या विक्रीचा व्यवसाय होऊ शकतो. त्यासाठी सुरुवातीला घराचाच वापर दुकानासारखा करून व्यवसाय करता येईल. व्यवसाय वाढल्यावर व्यावसायिक जागा आणि कर्मचारी यांच्याबद्दल विचार करता येईल.
२) घरगुती बनावटीच्या वस्तूंची विक्री
जर आपल्याकडे एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्याची कला व ज्ञान असेल तर घरबसल्या त्या वस्तूची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्याचबरोबर अशा प्रकारे वस्तू तयार करणाऱ्यांकडून घाऊक खरेदी करून त्याची विक्री करता येऊ शकते. स्वतः उत्पादक असलो तर उत्पादन खर्च कमीत कमी ठेवणे शक्य होते. दर्जा उंचावता येऊ शकतो आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार अचूक ग्राहकांपर्यंत पोहोचता येणे सुलभ होते. मेणबत्त्या, तयार कपडे, घरगुती बनावटीचे दागिने, ‘मेक अप’चे साहित्य यांची विक्री, घरगुती बनावटीचे खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू यांची ‘ऑनलाईन’ विक्री करण्याचा व्यवसाय घरबसल्या करता येणे शक्य आहे.
३) ‘ड्रॉपशिपिंग’ व्यवसाय
आपल्या घरात कोणत्याही मालाची साठवणूक न करता किंवा आपण कोणतेही उत्पादन न करता, ग्राहकांच्या दारापर्यंत न जाता त्रयस्थ उत्पादकांच्या उत्पादनाचे ‘मार्केटिंग’ करणे, कस्टमर सर्विस पुरविणे, उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधला दुवा म्हणून काम करणे आणि त्या बदल्यात पैसे कमावणे म्हणजे ‘ड्रॉपशिपिंग’! उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी उत्पादक अथवा अन्य व्यावसायिक घेत असतात. आपण ज्या उत्पादनाचे ‘मार्केटिंग करणार असू त्याचा उत्पादक अथवा वितरक स्थानिक असू शकतो किंवा विदेशातही असू शकतो. हा वितरक विश्वासार्ह असणे, त्याने ग्राहकांपर्यंत वेळेत उत्पादन अथवा सेवे पोहोचविणे, विक्रीपश्चात तत्पर सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यात हयगय झाल्यास आपली विश्वासार्हता पणाला लागण्याची वेळ येऊ शकते. ड्रॉपशिपिंग पद्धतीने व्यवसाय काही बाबी कटाक्षाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
* ग्राहकांची मागणी तत्परतेने पूर्ण करण्यासाठी विविध उत्पादनांच्या सक्षम वितरकांनी निवड करावी.
* दर्जेदार उत्पादने आणि तत्पर ग्राहकसेवा याच्या आधारे बाजारपेठेत स्पर्धा करा.
* जगाच्या ज्या भागात अन्य कोणी आपली उत्पादने पोहोचविली नसतील या भागात व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करा. मात्र, अशा वेळी वाहतूक खर्च अववख्यात असेल याची खात्री करावी.
* विशिष्ट ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ एलईडी शूजची विक्री संगीत महोत्सवाला जाणाऱ्या किंवा नियमितपणे धावण्याचा सराव करणाऱ्या ग्राहकांना करता येईल.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
४) ‘प्रिंटऑन ऑन डिमांड
ड्रॉपशिपिंग मॉडेलप्रमाणेच ‘प्रिंट व डिमांड’ व्यवसायासाठी कोणत्याही साधनसामुग्रीची आवश्यकता नसते. आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची सुविधाही गरजेची नसते. पुस्तके, टोप्या, टी शर्ट्स, पुस्तके, पिशव्या, ब्लँकेट्स, शूज, मोबईल कव्हर्स, घड्याळे, मग्स अशा अनेक वस्तू त्यावर ग्राहकांच्या मागणीनुसार प्रिटिंग करून विकल्या जातात. काही व्यावसायिक विशिष्ट प्रकारच्या वस्तू अथवा विशिष्ट डिझाईन प्रिंट करण्याचा व्यवसाय करतात. ग्राहकांना नेमके काय आवडते, लोकांना काय ‘मिरवणे’ आवडते हे लक्षात घेऊन या व्यवसायासाठी ग्राहक निश्चित करता येतात. पाळीव प्राणांबद्दल आस्था असणारे, क्रीडा क्षेत्रात रुची असणारे, शाकाहाराचा प्रसार करण्याची इच्छा असणारे असे अनेक प्रकारचे ग्राहकांचे गट त्यासाठी लक्ष्य करता येतील. आपल्या स्वतः:कडे जर डिझाईन करण्याची कला असेल तर चांगलेच आहे. अन्यथा ते करु शकणाऱ्यांचे सहकार्य घेऊन आपण हा व्यवसाय करू शकतो.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
५) ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणे
घरगुती व्यवसायाद्वारे उत्पादन करणे किंवा ती ग्राहकांना विकणे यापेक्षा सेवा प्रदान करणे अधिक सोपे आहे. सेवापुरविण्याचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेळेची कमतरता हीच मोठी अडचण आहे. ‘टाइम इस मनी’ ही महान सेवा व्यावसायिकांना तंतोतंत लागू पडते. ऑनलाईन सेवा पुरविण्याचा व्यवसाय करण्यासाठी मोठा जनसंपर्क असणे गरजेचे आहे. एक तर ज्या पद्धतीची सेवा आपण देणार आहोत, त्या प्रकारातील मनुष्यबळ उपलब्ध असणाऱ्यांशी संपर्क असणे आवश्यक आहे, तसेच ‘माऊथ पब्लिसिटी’ने आपला संदर्भ देणारे समाधानी ग्राहकही आवश्यक आहेत. घर, कार्यालयांची सफाई, लिखाण, व्यावसायिक प्रशिक्षण, आभासी सहकार्य (व्हर्चुअल असिस्टन्स), पाळीव पाण्याची देखभाल, मार्केटिंग, डिझायनिंग असे अशा अनेक सेवा ‘ऑनलाईन’ संपर्कातून उपलब्ध करून देता येतात.
६) ऑनलाईन क्लासेस
सध्याच्या काळात क्लासेसना मोठे महत्व आले आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समोर उभे राहून शिकविण्यापेक्षा ऑनलाईन क्लासेस घेणे अधिक सोपे झाले आहे. क्लासेस हे केवळ औपचारिक शिक्षणाचेच असतात असे नाही तर एखादे कला कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, ऍडव्हान्स मार्केटिंग, भाषा, घरगुती कामकाज अशा असंख्य प्रकारचे क्लासेस घेणे शक्य आहे. जर आपल्याला शिकविण्याची हातोटी असेल, समजावून देण्याची कला असेल तर हा कमाईचा मोठा मार्ग ठरू शकतो. ऑनलाईन क्लासेसच्या बाबतीत आपण आपल्या प्रशिक्षणार्थींच्या संख्या स्वतःच ठरवू शकता. एका वेळी एकाच व्यक्तीला शिकविण्यापासून एकाचवेळी हव्या तेवढ्या संख्येने प्रशिक्षणार्थींना सहभागी करून घेऊ शकता. या शिवाय आपण प्रशिक्षणामध्ये दिलेल्या व्याख्यानांचे ऑडिओ किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग करून त्याची विक्री करणे हा क्लासेसच्या जोडीने उत्पन्नाचा जादाचा मार्ग ठरू शकतो. व्याख्याने, प्रेझेंटेशन्स, आकृत्या याचा वापर करून इंटरनेटद्वारे डाऊनलोड करता येतील असे ‘ट्रेनिंग प्रोग्रॅम्स’ तयार करता येऊ शकतात. केवळ वेळेची गुंतवणूक करून घरबसल्या मोठी कामे करून देणारा हा व्यवसाय आहे.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
७) कौशल्यांचे डिजिटल उत्पादनात रूपांतर
आपल्याकडे असलेल्या कौशल्यांचे डिजिटल रूपांतर करून त्याची विक्री करणे हा मोठा व्यवसाय होऊ शकतो. विविध प्रकारचे कोर्सेस, डिझायनिंग, छायाचित्र, विविध विषयांचे अहवाल, टेम्प्लेट्स, पुस्तके असे अनेक प्रकार डिजिटल माध्यमाच्या साहाय्याने एकत्रित करून इंटनेटद्वारे आणि अप्लिकेशन्सद्वारे त्याची विक्री करता येते.
८) ब्लॉगिंग अथवा कन्टेन्ट क्रिएशन
जर आपण ‘कन्टेन्ट क्रिएटर’ असाल तर ब्लॉग, Youtube चॅनेल, Instagram अकाउंट किंवा Podcast च्या माध्यमातून आपल्या दर्शकांची संख्या वाढवून मोठी कामे करू शकता. एकदा काही उल्लेखनीय दर्शकसंख्या मिळाल्यावर प्रयत्नपूर्वक ती वाढविणे आणि नियमित दर्शक तयार करणे आवश्यक असते. मोठ्या संख्येने नियमित दर्शक मिळविणे आणि टिकविणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी संयम, सातत्य आणि परिश्रमांची आवश्यकता आहे. मात्र एकदा हे साधल्यानंतर उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. मोठ्या प्रेक्षकसंख्येमुळे चांगले उत्पन्न देणाऱ्या जाहिराती मिळू शकतात. प्रायोजित मजकूर प्रसिद्ध करून त्यामार्फत उत्पन्न मिळू शकते. इतरांची उत्पादने विक्री करण्यासाठी आपला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून कमिशन मिळविता येते. नियमित दर्शकांकडून वर्गणी आकारात येते. काही लोकप्रिय कन्टेंटची डिजिटल स्वरूपात विक्रीही करता येते. ‘Wait But Why’ हा अशाचप्रकारे ब्लॉगपासून सुरु झालेला उद्योग आहे. ३ लाख ७१ हजार सबस्क्रायबर्स आणि लाखो दर्शक मिळाल्यानंतर ती आता मोठी इ कॉमर्स वेबसाईट आहे. केरन कॅलिगॅरिफ आणि जॉर्जिया हार्डस्ट्रॅक यांनी फेसबुक ग्रुप्सचा उपयोग करून ‘माय फेवरेट मर्डर’ या पॉडकास्टला लोकप्रिय बनविले. दोन लाख सबस्क्रायबर्स मिळाल्यानंतर त्यांनी त्याचे रूपांतर ‘पेड कम्युनिटी’मध्ये रूपांतर केले. त्यांनी पुढे ए कॉमर्स वेबसाईटही सुरु केली.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
९) सुरू असलेल्या इ कॉमर्स व्यवसायात गुंतवणूक
गुंतणूक करण्यासाठी पुरेसे भांडवल असेल तर सुरू असलेल्या इ कॉमर्स उद्योग विकत घेण्याचा किंवा त्यात काही गुंतवणूक करण्याचा मार्ग प्रशस्त आहे. या उद्योगातून मिळणारे उत्पन्न, नफा मिळविण्याची क्षमता, इ मेल यादी आणि सोशल फॉलोईंग अशा सामग्रीची उपलब्धता अशा अनेक बाबींवरून या उद्योगाच्या खरेदीची किंमत ठरते. काही जण आपला उद्योग विकताना तो घेणाऱ्याला द्योग चालविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मार्गदर्शनही करतात. Exchange ही वेबसाईट असे इ कॉमर्स स्टोअर्स विकण्या- विकत घेण्यासाठी उपयुक्त आहे. काही जण अधिक किंमत मोजून चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय विकत घेतील किंवा काहींना कमी किमतीत डबघाईला आलेला व्यवसाय विकत घेऊन स्वतःच्या क्षमतांना तो वाढविण्यात रस असेल.
१०) सब्स्क्रिप्शन बॉक्स व्यवसाय
ऑनलाईन सब्स्क्रिप्शन बॉक्स या व्यवसायाने केवळ ५ वर्षात १०० वाढीचा वेग गाठला असून या व्यवसायात फार मोठा वाव आहे. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठो सेफोरा आणि वॊलमार्ट अशा मोठ्या ब्रॅण्ड्सनि देखील या व्यवसायात पदार्पण केले आहे. हा सब्स्क्रिप्शन व्यवसाय आपण घरातून करू शकता. सिल्विया सॉंग यांनी प्रसिद्ध कोरियन सौंदर्य प्रसाधने जगभरात ऑनलाईन विकण्याची सुरुवात केली. आता त्याचे मोठ्या उद्योगात रूपांतर झाले असून न्यूयॉर्क येथे मुख्यालय स्थापन करण्याचे काम सुरू आहे. व्यवसायातील कच्चे दुवे हेरणे आणि ते भरून काढणे हीच या व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. ‘बिर्चबॉक्स’ ने तेच केले. वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने वापरण्यासाठी ग्राहकांना ती मोठ्या पॅकींगमध्ये घ्यावी लागतात. त्यामध्ये बराच पैसे खर्च होतो, हे लक्षात घेऊन त्यांनी किफायतशीर किमतीत छोट्या पॅकींगमध्ये ती विकण्यास सुरुवात केली. आशेला रेनॉल्ड यांनी तर घरातील जुने कपडे आणि रद्दी कागद विकण्याचा व्यवसाय ऑनलाईन सुरु केला. सब्स्क्रिप्शन बॉक्सच्या माध्यमातून केवळ विक्री करणे जरुरी नाही. ‘हॅवरडॅश’ कपडे भाड्याने देण्याचा व्यवसाय या माध्यमातून करते.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
११) पेट एन्फ्लुएन्सर
सध्याच्या काळात पेट एन्फ्लुएन्सर मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमात दिसत आहेत आणि लोकप्रियही होत आहेत. आपल्याकडे जर पाळीव प्राणी असतील तर त्याचे फोटो समाजमाध्यमातून प्रसिद्ध करा. काही कालावधीत मोठे ब्रँड्स आपल्याकडे येतील आणि त्यांच्या प्रसिद्धीसाठी आपल्या लाडक्या ‘पपी’ किंवा ‘मनी’ला मागणी घालतील. ‘बोधी द मेन्सवेअर डॉग’ हा कुत्रा इन्स्टाग्रामवर तुफान लोकप्रिय झाला आहे. जगभरात त्याचे फॅन्स आहेत. बुकिंग डॉट कॉम, स्पॉटीफाय, पॉली अँड बारीक अशा मोठ्या ब्रँड्सच्या प्रसिद्धी मोहिमेत त्याचा सहभाग आहे. आपल्याकडे पाळीव प्राणी नसतील तर अशा प्राण्यांची काळजी घेणारे व्यावसायिक, डॉग हॉटेल्स आणि परगावी जाताना किंवा अन्य कारणाने पाळीव प्राण्यांना दूर ठेवण्याची गरज असलेले लोक यांच्यामधला दुवा म्हणून काम करा.
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा
१२) टाकाऊ वस्तूंची विक्री
सध्याच्या काळात नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढीला लागली आहे. त्यामुळे त्यांच्या खरेदीच्या आणि साठवणीच्या सवयीही बदलत आहेत. अनावश्यक खरेदी आणि वस्तूंचा पुनर्वापर करण्याकडे काळ वाढत आहे. त्यामुळेच जुन्या कपड्यांच्या व्यापाराची जगभरातील उलाढालीची रक्कम कित्येक कोटींमध्ये आहे. अशाच प्रकारे घरात नको असलेल्या अनेक प्रकारच्या वस्तूंचा व्यापार हा घरबसल्या करण्याचा चांगला व्यवसाय ठरू शकतो. कोल एन टेरी याने जुन्या दुर्मीळ वस्तू विकण्याचा व्यवसाय महाविद्यालयातील एका पडक्या खोलीतून सुरू केला. आज तो भरभराटीला आलेला व्यवसाय बनला आहे. Poshmark आणि Mercari ही ऍप्लिकेशन्स जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी उपयुक्त आहेत. तसेच Craigslist किंवा Facebook Marketplace चा वापरही यासाठी करता येईल.
१३) व्हिडीओ गेम खेळा आणि पैसे कमवा
अनेकांच्या दृष्टीने व्हिडीओ गेम्स हा वेळ वाया घालविण्याचा फालतू प्रकार आहे. मात्र हा छंद पैसे मिळविण्याचा मार्गही ठरू शकतो. त्यासाठी बसायला सोफा आणि समोर टीव्ही एवढेच पुरेसे आहे. Esports आणि Twitch सारख्या व्हिडीओ गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममुळे अनेक तरुणांना व्हिडीओ गेमचे अक्षरशः वेड लागले आहे. त्यामुळे त्यांना बहुतेकदा निंदा सहन करावी लागते. मात्र त्यात पारंगत झाल्यानंतर त्यातून पैसाही मिळू शकतो. एकट्या Esports ची वार्षिक उलाढाल १५० कोटी डॉलरची आहे. एका वेळी १ लाख जण त्याचा वापर करतात. स्पॉन्सरशिप हा त्यातून पैसे मिळविण्याचा मार्ग आहे. कंपन्या त्यांचे गेम खेळण्यासाठी आणि आपल्या मित्रांना त्या गेमकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला पैसे देतात.